स्पर्धेकरता नसलेले तों. पा. सु. - कपकेक्स, डोनट्स, कॅन्डीज - लारा (मामी)

Submitted by मामी on 23 September, 2012 - 11:34

हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.

मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे. Happy

मुळात हे केक्स तिनं या स्पर्धेकरता केले नाहीयेत. हे तिचे उन्हाळ्याच्या सुटीतले उद्योग आहेत. सुटीत हॉबी आयडिया मध्ये जाऊन बरेचसे क्ले, त्यावर हल्ली डेकोरेशन करायला आयसिंग टाईप अनेक प्रकार मिळतात ते सगळे असं आणून तिनं हे जुन-जुलै मध्ये केलेले प्रकार आहेत. आणि यामागची कल्पना आणि डिझाईन्स पूर्णपणे तिची आणि तिचीच आहे. मी केवळ दुकानातून साहित्य आणून देण्याची भुमिका बजावली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लारा मामी !
तुमच्या लेकीला शाबासकी आणि खुप खुप शुभेच्छा !
संयोजक १२ वर्षानंतरचीच मुलं सहभागी होऊ शकतील अशी अट का आहे ?

छान

वॉव मामी, लारा एकदम आपल्या ,'आई' च्या पावलावर पावलं टाकतीये..
सुबक सुबक दिस्तायेत सगळ्या वस्तू..
A big hug from me!!!!

Pages