केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि... [२]

Submitted by मी-भास्कर on 16 September, 2012 - 06:43

केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.

अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.
Anna and corruption.jpgवरील चित्रातील बच्चा-सुमो म्हणजे केजरीवाल

आता
आदरणीय केजरीवालजी [अण्णाजीं ऐवजी ],
सप्रेम नमस्कार.
आपण आपल्या नव्या टीमसह आंदोलनाची तयारी केल्याचे वाचले [१६-९-१२]. त्यात नव्या टीममधील ज्येष्ठांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे हा एक नवा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे दिसते. ज्येष्ठांची जी कांही नावे बातमीत आहेत तीही आशादायक आहेत. फक्त ती कायम टिकोत म्हणजे झाले.
माझ्या तसेच लाखो लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.
माझा फक्त इतकाच आग्रह आहे की आंदोलनाचे लक्ष्य केवळ 'भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई' एवढेच असावे.
त्या लढाईत लिंग, पक्ष, व्यक्ती, धर्म, जात, मागास, गरीब, श्रीमंत, सेक्युलर, जातीयवादी, संघ, सेवादल असले मुद्दे घुसडू पाहाणार्‍यांना ठणकावून सांगावे की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत जो कोणी मनापासून साथ देईल त्या सर्वांचा पाठींबा आम्ही घेऊ.
याचे कारण भ्रष्टाचार कोठलाही भेदभाव न करता सर्वांनाच पिडतो.
-- मी-भास्कर
[पुढील प्रगति]
दि.म.बा.('दिव्य मराठी'-बातमी :१९-९-१२): अण्णा समाजकारणात राहाणार. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हे ध्येय समोर ठेऊन केजरीवालांना योग्य वाटेल त्या मार्गाने जाण्याचा सल्ला. पुन्यातल्या बैठकीला माधव गाडगीळ, नरेंद्र दाभोळकर, धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी उपस्थित होते. जनजागरणासाठी अण्णा देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार.

२८ सप्टेंबर २०१२
अण्णा, जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.
४ ऑक्टोबर २०१२:
२ ऑक्टोबर २०१२ या गांधीजयंतिच्या मुहूर्तावर केजरीवालांनि नवा पक्ष काढून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचे 'आम आदमी'ची टोपी घालून ठरविले. इरादे तर प्रामाणिक दिसतात पण या आखाड्यात त्यांना धोबीपछाड बसण्याची शक्यताच अधिक. त्यांना शुभेच्छा तर देऊयात.
मिडिया भासविते तशि मनोमन फूट अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये पडलि नसल्याचे अण्णांच्या वक्तव्यांमुळे जाणवले. लढाईच्या दृष्टीने हे एक सुदैवच म्हणायचे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केजरीवालांच्या 'आम आदमी पार्टी'ला शुभेच्छा! >>>> अनुमोदन. आजचा प्रतिसाद पाहिला तर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाहि. देशद्रोहिंना योग्य ती शिक्षा मिळेलच

आम आदमी पार्टीला शांतिभूषण यांनी १ कोटी रुपयांची देणगी दिली ही गोष्ट विषेश उल्लेखनीय.
आणखी कोणीतरी दिल्लीतील आपल्या घरी पक्षाचे कार्यालय चालवू दिले आहे.
या गोष्टी राजकारणासाठी उपयुक्त असल्या तरी निवडणुका लढवायला मात्र सध्याच्या जमान्यात अपुर्‍याच!

केजरीवालांनी केंद्रातील सत्तारूढ पार्ट्यांना आपले लक्ष्य केले पाहिजे कारण भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या सगळ्या महत्वाच्या यंत्रणा त्यांच्या हाती आहेत. त्या यंत्रणांचा उपयोग केंद्रसत्ता विरोधकांविरुद्ध आपली सत्ता टिकविण्यासाठी गैरमार्गांनी वापरते. स्वपक्षियांचा भ्रष्टाचार पाठीशी घालते आणि देशाचे सर्वांगांनी महाभयंकर नुकसान करीत आहे. तपासयंत्रणांना स्वायत्तता देण्यास केंद्रसत्ता त्यासाठीच नकार देत आहे. म्हणून केजरीवालांनी आपले जे काय मर्यादित बळ आहे ते सद्ध्यातरी एक रण्नीती म्हणून केंद्रीय सत्तेविरूद्धच वापरावे असे मी नेहमी लिहीत आलो आहे.
त्या दृष्टीने त्यांनी स्वाभिमानी संघटनेबरोबर जे सहकार्य केले आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. राजु शेट्टी यांनी महाराष्ट्रातील सूमोंना आव्हान दिले आहे. त्यांनाही दिल्लीतील त्यांच्या मोर्चावर त्यामुळे बळ मिळणार आहे. शेट्टी व केजरीवाल यांना शुभेच्छा देऊयात.

केजरीवालजी,
मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की तुमचा भ्रष्टाचाराविरोधी लढा प्रामाणिक असला तरी त्यासाठीची रणनीति हारण्यासाठी लढण्याची आहे.
तुमची शक्ति जेमतेम.
सगळ्यांनाच भ्रष्टाचारी ठरवण्याच्या नादात तुम्ही तुमची असलेली ताकद देखील गमावता आहात. केंद्रात सत्तेवर असलेले पक्ष सिबिआय, इनकम्टॅक्स आदी शस्त्रांनी सुसज्ज असतो. त्यांच्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी अति दक्ष असतो. तेव्हा केंद्रातील सत्तारूढ पक्षालाच सर्व कवच कुंडले असतातच. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर आणायलाच कुणी उरलेला नाही. तेव्हा तुम्ही त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करा. तरच थोडे कांही होईल.
सत्ताभ्रष्ट पक्ष तुम्हाला उघडपणे पाठिंबा देतील वा न देतील, पण हस्ते परहस्ते का होईना , सत्तापक्षाची प्रकरणे तुमच्यापर्यंत येतील अशी काळजी घेतिल. शेवटी भ्रष्टाचाराच्या महामेरूला वेसण घातली की इतरांनाही थोडी बसेलच की.
कालचेच उदाहरण घ्या. बोफोर्स, वढेरा, सलमान खुर्शिद, टूजी, कोलगेट्,कॉमनवेल्थ गेम्स, आदर्श असे भयानक घोटाळे बासनात बांधून ठेवून केंद्रातील सत्तारूढ पक्षाने चौटलाच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मात्र लावून धरले आणि त्याचा काटा काढला. आता गडकरींचा निघेल. मायावती, लालू, मुलायम यांचे घोटाळे ते पाठिंबा देताहेत तोवर दुर्लक्षित राहातील. त्यांनी पाठिंबा काढला की त्यांचा काटा काढण्याचे काम आपोआप वेगात सुरू होईल.
थोडक्यात, केंद्रातील सत्ताधारी पक्ष त्यांच्या राजकीय विरोधकांचा भ्रष्टाचार बाहेर आणण्याचे काम जागरूकतेने, नेटाने व नैसगिकपणे करीत असतांना तुमी त्यांचेच काम करण्यात वेळ आणि शक्ति कशाला वाया घालवता?
सत्तारूढांनाच वेसण घालायलाच कोणी तरी हवा आहे. त्यावरच लक्ष द्या.

सध्या केजरीवालांबद्दल माध्यमांमध्ये फारसे येत नाही. त्यांनी एकाच वेळी सगळ्यांशीच (हारण्यासाठी )लढण्याची रणनीति अवलंबिली असल्याने त्यांना विरोधकांच्या भ्रष्टाचाराविषयी माहिती देणारे ( अद्याप कोणत्याही प्रकरणात न अडकलेले) भ्रष्टाचारीही प्रकरणे देईनासे झाले असावेत.
चोरांच्या वाटा चोरांना ठावूक असे म्हणतात. कोणतीही गुपिते त्यांच्या आपाअपसातील हेव्यादाव्यांपोटीच बाहेर दिली जातात.
ओमप्रकाशजी, तुम्ही आता 'मेलेली कोंबडी जाळाला भीत नाही' हे लक्षात घेऊन केंद्रातील सत्ताधारी पक्षाची तुम्हाला ज्ञात अशी प्रकरणे हस्ते परहस्ते वेगाने केजरीवालांना द्या. त्यांनाही योग्य काम मिळेल आणि तुमचाही एकटेपणा दूर होऊन सोबतीस आणखी कांहीजण येतील.' मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' याचाही तुम्हाला पर्याय राहील.
घ्या जरा मनावर!

केजरीवालच्या ऑफिसचे भाडे तटले. बंद होणार, अशी बातमी होती ना? त्याचे पुढे काय झाले? ( कुलुप आणायलाही पैसे नसल्याने बहुदा तेही काम तसेच रहाणार की काय? Proud )

@आंब्या
अरे ज्याचे भाडे तटले आहे तो आणील की कुलुप. आपण कशाला काळजी करताय?
ऑफिस नस्ले तरी त्यांचे काम चालूच राहाणार. थोड्या ऊष्णतेने त्यांचे काम काय नासून जाणार आहे काय?

शान्तिभूषनने दिलेले १ कोटी संपले काय? की दिलेच नाहीत? आता भाजपकडून येणारा पैसा थाम्बला असावा. कारण आता केजरीवाल काँगी बरोबर भाजपचाही स्पर्धक झाला आहे. काँग्रेसवर भुंकायला उपयोग होता तोवर पैसा ,माणसे पुरवणे भाजपकडून चालू होते.....

@पादुकानन्द | 26 January, 2013 - 12:13
. काँग्रेसवर भुंकायला उपयोग होता तोवर पैसा ,माणसे पुरवणे भाजपकडून चालू होते.....
<<
राजकारणाचा भाग आहे. भाजप सत्तेत असता तर अर्थातच काँग्रेसने असेच केले असते.

भ्रष्टाचार बाहेर येऊन भ्रष्टाचार्‍याला शिक्षा आणी त्याने असा मिळवलेला पैसा सरकारजमा होण्यात आम्हाला स्वारस्य,

केजरीवालजी,

तिकडे अण्णांच्या सभेकडे बागपतमध्ये लोकांनी पाठ फिरवल्याची बातमी आहे आणि दुसरीकडे तुम्ही १४ दिवसांचे उपोषण करूनही कोणी त्याची दखल घेत नाही हे पाहून वाईट वाटते.
पण तुम्ही टोपीवाल्यांच्या सापळ्यात अडकलात.
तुम्ही आणि अण्णा भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत एकत्र राहिला नाहीत त्यामुळे आधीच मर्यादित असलेली शक्ती विभागली गेली. तुम्हा दोघांची रणनीतीही जणू हरण्याकरताच आखली गेल्यासरखे वाटले. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे सध्यातरी पानिपत झाल्यासारखी स्थिती आहे.

तरीही तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!

केजरीवालजी
सर्व भ्रष्ट लोकांनी तुम्हाला राजकारण्यांच्या आखाड्यात ओढून नगण्य करून टाकले.
इतके सर्व सभोवताली घडत असूनही चुकीच्या रणनीतीने तुम्ही स्वताला नगण्य करून घेतलेत याचे दु:ख होते.

@sunilt | 7 May, 2013 - 13:48नवीन
पण तुम्ही टोपीवाल्यांच्या सापळ्यात अडकलात
टोपी पांढरी आणि काळी दोन्ही!!
बरोबर ना?!
<<
केजरीवालना राजकारणाच्या आखाड्यात ओढणार्‍या मुख्यत्वे करून सर्व रंगांच्या राजकीय टोप्या!
एवढेच नव्हे तर हाच उद्योग ज्यांनी [विशेषतः राजकीय विश्लेषक] केला ते बिन टोपीवाले देखील!

केजरीवालजी तुम्ही शीला दिक्षितांविरुद्ध निवडणूक लढविणार म्हणजे केंदीय सत्तेविरुद्धच ना?
भ्रष्टाचाराविरुद्ध कांही ठोस काम करण्यासाठी तेच करावे लागणार असेच आम्ही म्हणतो आहोत.
मग जिंकायचे असेल तर त्या सत्तेविरुद्ध दोन हात करणार्‍यांशीच हातमिळवणी करणे तुम्हाला भाग आहे. तसे केले नाहीत तर तुमची इच्छा असो वा नसो, शीलाजींनाच निवडून येण्यास मदत करीत आहात.

केजरीवाल जिंकला........?????

नक्की ? काँग्रेस हरली याचा अर्थ केजरीवाल जिंकले असा होतो ?

ही लढाई जिंकली आहे पण युध्द नाही.

कोणीही सरकार बनवु शकले नाही तर केजरीवाल यांना विरोधी पक्ष म्हणुन सुध्दा बसता येणार नाही.

एका वर्षाच्या आत एक नवीन पार्टी आपली पोझीशन बनवु शकते. ३०% मते घेऊन चमत्कार घडवु शकते इतकेच.

अण्णांना अपेक्षीत नसलेले पार्टीचे राजकारण केले ( स्वतः दिल्लीत तडजोड करुन सत्तेत बसले तरी आणि बाहेरुन पाठींबा देऊन भाजपला राज्य करु दिले तरी ) तर आम आदमी आणि इतर पक्ष यात फरक तो काय ?

पुन्हा निवडणुका हा एकच पर्याय असा आहे की ज्यात खर्च तर आहेच पण जनता खात्रीने कुणा एका पक्षाला बहुमत देईल याची खात्री काय ?

फेसबुकवर वाचलेल्या २ पोस्ट इथे शेअर कराव्याश्या वाटल्या (त्यातली एक देवकाकांची आहे)

१. केजरीवाल प्रमाणिक आहेत यात शंका नाही त्यांचे यश हे त्यांच्या व्यापक विचारांचे आणि तरुणाई ला भावलेल्या नव्या प्रचार शैलीचे आहे तथापि संसदीय राजकारणा मध्ये उतरल्या नंतर ' आणखी एक निवडणूक होवू दे ; होवू दे खर्च ' हि भूमिका तुमच्या विरोधात जाणारी असते त्या पेक्षा दगडा पेक्षा वीट मऊ असे म्हणून जर त्यांनी भा. ज. पा . ला पाठींबा देवू केला आणि आपले संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करण्या करिता आपली रणनीती सत्तेच्या परिघात राहून नव्याने आखली तर भविष्यात किमान दिल्लीमध्ये त्यांची सत्ता येणे अवघड होणार नाही !

२. केजरिवाल ह्यांची कालची मुलाखत पाहिली आणि अगदी खरं सांगायचं तर त्यांच्या बोलण्यात प्रत्येक वेळी...आम आदमीही सब कुछ करेगा...मैं कोन हूँ? मेरी हैसियतही क्या है? वगैरे बोलणं विनयशीलता वगैरेच्या नावाने जरी खपणार असलं तरी...एका राजकीय नेत्याकडे जे काही धोरण, योजना इत्यादि असाव्यात आणि ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय त्यांच्यासाठी काही ठोस काम करू असे आत्मविश्वासाने म्हणायला हवे...ते तसं मला काहीच दिसलं नाही...अर्थात म्हणून इतक्यात मी त्यांना बाद ठरवणार नाहीये...पण हा माणूस नक्की काही वेगळं करेल अशी खोटी आशाही मनात बाळगत नाहीये..हेही निश्चित...पुढे काय होणार हे पाहायला नक्कीच आवडेल.!

नितीनचंद्र

केजरीवालच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी २८-२९ जागा मिळवल्या ते ही सर्व नेत्यांनी त्यांना मुर्खात काढले असताना, अण्णानी त्यांच्या ह्या निर्णयावर तोंड सुख घेतले असताना,

आपा चा हा कारनामा विजया पेक्षाही महत्वाचा आहे.

संपुर्ण भारतात फक्त एक केजरीवाल जादु करु शकेल असे नाही, त्यासाठी अनेक केजरीवाल लागतील आणि त्या क्रांतीचे बीज ह्या निवडणुकात पडले आहे.

केजरीवालच्या ह्या एका प्रयत्नाने देशात अजुन नविन केजरीवाल पुढे यावेत.

ह्या धाग्यावरील अगोदरच्या प्रतिक्रीया वाचल्या तर त्यात केजरीवालवर कितीएक आरोप केले आहेत
कसे त्याला कमी लेखले आहे हे कळेल.

ह्या प्रतिक्रीया ईथल्या मबो वरील वाचकांच्या आहेत. जर त्या एखाद्या नेत्याच्या, पार्टीच्या असत्या तर एक वेळ समजु शकले असते.

विवेक नाईक जी , आपला आणि माझा मुद्दा समान आहे.

लोकसभेत निर्णायक बहुमतासाठी आआप ला किमान २ निवडणुका दिल्ली सारख्या अटी तटीने लढवाव्या लागतील. यात जेव्हा ही क्षमता निर्माण होईल तेव्हा सर्व विरुध्द आआप हा सामना सुध्दा करावा लागेल.

माझ्या मते आआपचा विजय तेव्हाच होईल जेव्हा लोकसभेत भ्रष्ट नसलेला पक्ष ( लोक ) सत्तेत येतील आणि अनेक वर्ष राज्य करतील.

Kejriwal na kharech aam aadmi Che dukkh samjat asel ani paishacha dhur karaycha nasel, tar parat elections hou deu nayet. Tyani konala saath deun satta sthapan karavi ani janatecha paisa wachavava hich apeksha

गुजरातेत आलं की नाही लोकपाल अजून ?
केंद्रातल्या लोकपाल कायद्याची अंमलबजावणी कशी होते ते पहायचं. बहुमत असल्याने जनलोकपाल देखील आणता येईल.

Pages