केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि... [२]

Submitted by मी-भास्कर on 16 September, 2012 - 06:43

केजरीवाल , जिंकण्यासाठी लढताय कि..[२]
छोटा सुमो आता अण्णा-सुमो नसून केजरीवाल-सुमो आहे.

अण्णा आणि केजरीवाल , तुमच्या प्रत्येकासमोर आता असे १०० अगडबंब सुमो कुस्तीसाठी उभे आहेत. आणि ते तुमच्याकडे या चित्रातील सूमोप्रमाणेच 'बच्चा है' अशा आविर्भावात पाहाताहेत हे नक्की.
केजरीवाल, तुम्ही राजकारणात उतरण्याचे ठरविल्यापासून तुमच्याकडे तर ते अधिक निर्विकारपणे पाहाताहेत, कारण तुम्ही त्यांना हव्या असलेल्या जागी कुस्तीसाठी आपणहून गेलेले आहात.
Anna and corruption.jpgवरील चित्रातील बच्चा-सुमो म्हणजे केजरीवाल

आता
आदरणीय केजरीवालजी [अण्णाजीं ऐवजी ],
सप्रेम नमस्कार.
आपण आपल्या नव्या टीमसह आंदोलनाची तयारी केल्याचे वाचले [१६-९-१२]. त्यात नव्या टीममधील ज्येष्ठांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी टाकली जाणार आहे हा एक नवा उपक्रम हाती घेतला जाणार असल्याचे दिसते. ज्येष्ठांची जी कांही नावे बातमीत आहेत तीही आशादायक आहेत. फक्त ती कायम टिकोत म्हणजे झाले.
माझ्या तसेच लाखो लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.
माझा फक्त इतकाच आग्रह आहे की आंदोलनाचे लक्ष्य केवळ 'भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई' एवढेच असावे.
त्या लढाईत लिंग, पक्ष, व्यक्ती, धर्म, जात, मागास, गरीब, श्रीमंत, सेक्युलर, जातीयवादी, संघ, सेवादल असले मुद्दे घुसडू पाहाणार्‍यांना ठणकावून सांगावे की भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत जो कोणी मनापासून साथ देईल त्या सर्वांचा पाठींबा आम्ही घेऊ.
याचे कारण भ्रष्टाचार कोठलाही भेदभाव न करता सर्वांनाच पिडतो.
-- मी-भास्कर
[पुढील प्रगति]
दि.म.बा.('दिव्य मराठी'-बातमी :१९-९-१२): अण्णा समाजकारणात राहाणार. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था हे ध्येय समोर ठेऊन केजरीवालांना योग्य वाटेल त्या मार्गाने जाण्याचा सल्ला. पुन्यातल्या बैठकीला माधव गाडगीळ, नरेंद्र दाभोळकर, धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी उपस्थित होते. जनजागरणासाठी अण्णा देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार.

२८ सप्टेंबर २०१२
अण्णा, जनजागरणासाठी आपण देशभर बैठका घेउन विचारविनिमय आणि मार्गदर्शन करणार असे कळते.
महाराष्ट्राचे एक चीफ इंजिनियर श्री पांढरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे लवासाप्रमाणे उडून जाण्याची शक्यता दिसत असतांना या वयात तुम्ही देशभर प्रवासाला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच ठाण मांडून बसणे आवश्यक दिसते. इथेच १०० पेक्षा जास्त सुमो तुमच्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा समाचार घेण्यासाठीच तुमची शक्ति तुम्ही राखून ठेवायला हवी.
४ ऑक्टोबर २०१२:
२ ऑक्टोबर २०१२ या गांधीजयंतिच्या मुहूर्तावर केजरीवालांनि नवा पक्ष काढून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचे 'आम आदमी'ची टोपी घालून ठरविले. इरादे तर प्रामाणिक दिसतात पण या आखाड्यात त्यांना धोबीपछाड बसण्याची शक्यताच अधिक. त्यांना शुभेच्छा तर देऊयात.
मिडिया भासविते तशि मनोमन फूट अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये पडलि नसल्याचे अण्णांच्या वक्तव्यांमुळे जाणवले. लढाईच्या दृष्टीने हे एक सुदैवच म्हणायचे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“The country needs revolution and it is the duty of those who feel so to rebuild the society,” Shaheed Bhagat Singh.

२ ऑक्टोबर २०१२ या गांधीजयंतिच्या मुहूर्तावर केजरीवालांनि नवा पक्ष काढून निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्याचे 'आम आदमी'ची टोपी घालून ठरविले. इरादे तर प्रामाणिक दिसतात पण या आखाड्यात त्यांना धोबीपछाड बसण्याची शक्यताच अधिक. त्यांना शुभेच्छा तर देऊयात.
मिडिया भासविते तशि मनोमन फूट अण्णा आणि केजरीवाल यांच्यामध्ये पडलि नसल्याचे अण्णांच्या वक्तव्यांमुळे जाणवले. लढाईच्या दृष्टीने हे एक सुदैवच म्हणायचे!

 

@ भास्कर - तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे. कुमार केतकर हा माणुस अतिशय biased आहे आणि त्याचा bias रष्ट्रवादी आणि काँग्रेस साठी आहे.

टीवी वरच्या कुठल्याही चर्चे मधे भ्रष्टाचाराच्या मुद्या ला बगल देवुन दुसरे च काहितरी बोलुन विषय भरकटवायचा असे तो करत असतो.

टीवी वरच्या कुठल्याही चर्चे मधे भ्रष्टाचाराच्या मुद्या ला बगल देवुन दुसरे च काहितरी बोलुन विषय भरकटवायचा असे तो करत असतो.>>>>>>> +१

त्यासाठीच तर त्याला congress ने नेमले आहे

आ. अण्णा,
तुमच्या कार्याला थोडा जरी सेट बॅक आला तरी इथे टिंगल टवाळीला ऊत येतो आणि नेहमीप्रमाणे मग अपयशी माणसाच्या पाठीशी कोणीच नसते याचे प्रत्यंतर येते.
क्षते प्रहाराः निपतन्ति अभिक्ष्णं धनक्षये दीप्यति जठराग्निः।
आपत्सु वैराणि समुल्लसन्ति, छिद्रेषु अनर्था: बहुली भवन्ति॥
म्हणजे जखमेवरच प्रहार होतात, पैसा गेला कि भूक पेटते, शत्रूंचे वैरभाव उफाळून येतात. अशा रितीने आपले कोठे कांही उणे असेल तर त्याचा फायदा घेऊन पुष्कळजण आपल्यावर संकटाचा मारा करतात.

तुम्ही राळेगण मध्ये कार्यकर्ता-शिक्शण्-केंद्र सुरु करणार असल्याचि वार्ता आहे. मग तर तुम्ही राळेगण आणि महाराष्ट्रातच राहून मार्गदर्शन करणे अधिक आवश्यक आहे.
कार्यकर्ते तयार करण्याचे काम तर फार मूलभूत आणी टिकाऊ आहे. तुम्ही समोर असण्यानेच शिकाऊ कार्यकर्त्यांना खरी प्रेरणा मिळेल.
शिवाय महाराष्ट्रातच तुमच्यासमोर उभे ठाकणार्‍या सूमोंची संख्या रोज वाढते आहे.
.

केजरीवालअण्णा,
आता नव्या सापळ्यात ( कोर्टात जा हा सापळा ) अडकू नका.
भ्रष्टाचार्‍यांनी तुम्हाला निवडणूकीच्या आखाड्यात खेचून अर्धी लढाई जिंकली च आहे. आता निदान त्यांच्या नव्या सापळ्यात ( कोर्टात जा हा सापळा ) अडकू नका.
तुम्ही सोनिया-जावई वड्रा याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची मागणी केली नि तमाम काँगी आणी राष्ट्रवादी काँगी चवताळून तुमच्या अंगावर आली आहे. चर्चा झडताहेत. वडरा नावाचा एनेस्जीच्या सिक्युरिटी मध्ये फिरणारा, विमानतलाम्वर ज्याला महत्वाचि व्यक्ति म्हणून तपासण्यांशिवाय आतबाहेर करता येते तो स्वतःला 'आम आदमी' म्हणवतो आणि तो निर्दोष असल्याची प्रमाणपत्रे तमाम काँगीजनांकडून मिळवतो. तो तुम्हाला कोर्टात जाऊन आरोप सिद्ध करायचे आव्हान देतो पण तुमच्याविरूद्ध कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करायला मात्र कचरतो. तुम्हि कोर्टात गेलात कि मामला कोर्टात आहे असे म्हणून कोणत्याही अडचणीच्या प्रष्नाला ते सर्वजण बगल देऊ शकतात व चर्चेला पूर्णविराम देऊ शकतात. वड्रा म्हातारा झाला तरी कोर्टात निकाल लागायचा नाही.
येत्या निवडणुकीत तो उभा राहुन निवडून येईल आणि जनतेने त्याला निर्दोष ठरवल्याचा दावा करेल.
तेव्हा चौकशीच्या मागणीवरच ठाम राहा.

देशाचे कायदामंत्री सलमान खुर्शिद आणि त्यांच्या पत्नीवर त्यांनी विकलांगांकरिता स्थापन केलेल्या ट्रस्टला मिळालेल्या पैशाचा दुरूपयोग केल्याचा पुरावा म्हणून कांही कागदपत्र इंडिया टुडे, टाइम्स ऑफ इंडिया व केजरीवाल यांनी जाहीर केले. त्याबाबत खुलासा करण्यासाठी दोघांनी पत्रकार परिषद बोलावली होती. तिचे थेट प्रक्षेपण पाहिले. त्यात एरवि तुलनेने सौम्य आणि शांत भासणार्‍या मंत्री महोदयांचे जे दर्शन घडले ते सुन्न करणारे होते. त्यात खटकणार्‍या खूप बाबी होत्या. त्या आठवतील तशा येथे नमूद करणार आहे. मंत्रीजी इंग्रजीतही बरेचदा बोलले.
(१) 'ईंडिया टुडे चे ईंडिया येस्टर्डे होईल' असे कायद्यामंत्र्यांनी म्हणणे हे सरळसरळ नियतकालीक बंद पाडू असे ध्वनित करीत नाही काय? हा फार गंभीर प्रकार म्हणावा लागेल.
आता इंदिया टुदे च्या मागे हरएक प्रकारच्या झंझटी लवकरच लागणार.
(२) एका वार्ताहाराशि ते ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहून खुद्द त्यांची पत्नी आणि आसपासचे लोक त्यांना आवरायचा प्रयत्न करीत होते. सत्तेची नशा कशी असते त्याची छोटीशी झलकच पहायला मिळाली.
(३) पत्रकार मात्र धीटपणे दबावाखाली न येता प्रश्न विचारित होते. मंत्रिजी मध्येच कोणाला तरी चिडून गेट ऑऊट म्हणाले. इंडिया टुदे च्या वार्ताहराला बोलावण्याची त्यांना इच्छा नव्हती असेही त्यांच्या बोलण्यात आले.
(४) श्रवणयंत्र मिळाल्याचे एका बहिर्‍या माणसाने सांगितल्यावर त्यांच्या भोवतालच्या ताफ्याने जणू केस जिंकल्यागत हर्षवायू झाल्याप्रमाणे जो टाळ्यांचा गजर केला त्याचे आश्चर्य वाटले.
वाहिन्यांनी अशा माणसांच्या मुलाखती दाखवल्याबद्दल मात्र 'थोडी लालूच दाखवून असे करता येते' अशी टिप्पणी त्यांनी सुरुवातीस केली होती त्याचा त्यांना विसर पडला होता. मग एवढा शक्तिशाली माणुस तसेच करू शकणार नाही का ही शंका इतरांना येणारच!
आणि अशा कितितरी बाबी.

>>केजरीवालाचा खैरनार होणार आहे. <<
ते होईल का नाही हे भविष्यात ठरेल. पण सध्यातरी निर्ढावलेल्या भ्रष्टाचार्‍यांना केजरी'वार' झेलावे लागताहेत हे खरे.
केजरीवाल यशस्वी होतील वा न होतील पण ते निदान ज्या त्वेषाने लढताहेत त्याला आमच्या शुभेच्छा आणि सलाम.

ते होईल का नाही हे भविष्यात ठरेल. पण सध्यातरी निर्ढावलेल्या भ्रष्टाचार्‍यांना केजरी'वार' झेलावे लागताहेत हे खरे.
केजरीवाल यशस्वी होतील वा न होतील पण ते निदान ज्या त्वेषाने लढताहेत त्याला आमच्या शुभेच्छा आणि सलाम. >> शुभेच्छा आणि सलाम आणि पाठिंबा सुद्धा. अगदी कसली हि पर्वा न करता हा माणुस लढत आहे.

@प्रिया७ | 15 October, 2012 - 21:44 नवीन
शुभेच्छा आणि सलाम आणि पाठिंबा सुद्धा. अगदी कसली हि पर्वा न करता हा माणुस लढत आहे.<<
१०० % सहमत .
फेल्युअर इज नो क्राईम. लो एम इज कोवार्डिस.
यश मिळाले कि लोक तोंड फाटेस्तोवर स्तुती करतात नि अपयशी माणसावर मात्र हिंस्त्र पणे तुटून पडतात.

इब्लिस हे असले तिरकस बोलण्याची काही गरज आहे का ? बाजू घ्यायची नाही तरी निदान असले टोमणेवजा तिरकस, कुजकट तरी बोलू नका.

केजरीवालाचा खैरनार होणार आहे.>>>>> नाहि,

केजरीवाल जसा फार निर्भीड आहे तसाच हुषार आहे.
------- सभोवतालची दल-दल आणि भ्रष्टाचाराची खोली (? ?) लक्षात घेतल्यावर निव्वल निर्भिड आणि हुषार राहुन चालणार नाही. सोबत कमालीची मुत्सद्देगिरी पण असायला हवी. खैरनार (किंवा अण्णा हजारे) हे स्वत: खुप प्रामाणिक होते पण मुत्सद्देगिरी मधे कमी पडतात. येथे दिग्विजय सिंग, किंवा सिब्बल (नावे महत्वाची नाही आहे, हे प्रत्येकच पक्षांत आहे) यांच्या सारख्या प्रभुतींशी सामना आहेच...

केजरीवालांना शुभेच्छा देण्यात काहीच हरकत नाही. टिंगल करणार्‍यांकडे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काय उपाय आहेत ? किती ठिकाणि त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे ? किती भ्रष्टाचार्‍यांना कायद्याचा वापर करुन उघडे पाडले आहेत ? बंगारु लक्ष्मण वगळता न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याच्या घटना अपवादानेच मिळतांत.

कायदामंत्री सलमान खुर्शीद यांना प्रथम टार्गेट कुणी केल ? केजरीवालांनी का ? मला वाटत नाही. राष्ट्रपती निवडणुकीत सि.बी.आय ची भिती दाखवुन मुलायमसिंगांना काँग्रेसने ममताची साथ सोडायला लावली त्यात सलमानजींचा हात असावा. त्याचे उट्टे अखिलेश यादवांनी सरकारी कागदपत्रे उघड करुन असे फेडले असावे. केजरीवालांना फक्त वापरले गेले असण्याची शक्यताच जास्त आहे.

@नितीनचंद्र | 16 October, 2012 - 07:17 नवीन
..................राष्ट्रपती निवडणुकीत सि.बी.आय ची भिती दाखवुन मुलायमसिंगांना काँग्रेसने ममताची साथ सोडायला लावली त्यात सलमानजींचा हात असावा. त्याचे उट्टे अखिलेश यादवांनी सरकारी कागदपत्रे उघड करुन असे फेडले असावे. केजरीवालांना फक्त वापरले गेले असण्याची शक्यताच जास्त आहे.<<

नाहीतरी अशी कागदपत्रे सुंद उपसुंदांच्या आपापसातील झगड्यातूनच लीक केली जातात. ती ज्याच्या हाती द्यायची तोही निर्भय, बुद्धिवान आणि प्रामाणिक कार्यकर्ता असावा लागतो. तो त्यांना केजरीवालांमध्ये दिसला असेल. कोणाच्याका कॉबड्याने असेना सूर्य उगवला म्हणजे झाले!

सत्तेतील माणसांना कोणीही जाब विचारला तर ते तीनच पर्याय तुमच्यासमोर ठेवतात :
१)त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक असे मानून चुप बसायचे,
२)त्यांनी सल्ला द्यायचा : आरोप करून अपप्रचार करू नका. कोर्टात जा.
३)निवडणूक लढवून निवडून या.
सर्वसाधारण माणसाला, संस्थेला किंवा छोट्या समुहाला मुळात जाब विचारण्याचे धाडसच नसते. धाडस केलेच तर फक्त ऐकून गप्प बसणे इतकेच शक्य असते.

महेश | 16 October, 2012 - 00:14 नवीन
इब्लिस हे असले तिरकस बोलण्याची काही गरज आहे का ? बाजू घ्यायची नाही तरी निदान असले टोमणेवजा तिरकस, कुजकट तरी बोलू नका.
<<

कुजकट? तिरकस?
तुमच्या बाजूचे नसतात त्यांनी नुसते तोंड उघडले की ते कुजकट किंवा तिरकसच असते असे का वाटते तुम्हाला?
अन समजा मी तुमचा विरोधक आहे, तर विरोधातच बोलणार, अन सर्व प्रकारे बोलणार. बोलू नका असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? विरोधकांची अशी मुस्कटदाबी/गळचेपी होणारे का केजरीवाल 'आदर्श' पं.प्र. झाल्यावर?

>>तुमच्या बाजूचे नसतात त्यांनी नुसते तोंड उघडले की ते कुजकट किंवा तिरकसच असते असे का वाटते तुम्हाला?
वाटण्याचा संबंध नाही, वर तशाच प्रकारे लिहिले आहे तुम्ही.

>>अन समजा मी तुमचा विरोधक आहे, तर विरोधातच बोलणार, अन सर्व प्रकारे बोलणार. बोलू नका असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? विरोधकांची अशी मुस्कटदाबी/गळचेपी होणारे का केजरीवाल 'आदर्श' पं.प्र. झाल्यावर?

म्हणजे केजरीवाल आणि त्यांच्या बरोबरचे लोक चूक आहेत वाईट आहेत आणि बाकीचे खुप चांगले आणि बरोबर आहेत का ? म्हणुन तुम्ही त्यांचे विरोधक आहात का ? (माझे विरोधक असण्याचा प्रश्नच येत नाही कारण आधी पण सांगितले होते की आपली कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाहीये.)
बोला ना तुम्ही जे येतील त्यांच्या विरोधात बोला पण निदान त्यांची बाजू तरी समजाऊन घ्या.

कालच टिव्हीवर दमानिया बाई दमा दमाने सांगत होती की सर्वच पक्ष हे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत (पडद्यामागे). तसे तुम्ही आम्ही सुद्धा असु शकतो येथे कितीही वाद असले तरीही.

केजरीवालांना शुभेच्छा देण्यात काहीच हरकत नाही. टिंगल करणार्‍यांकडे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काय उपाय आहेत ? किती ठिकाणि त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे ? किती भ्रष्टाचार्‍यांना कायद्याचा वापर करुन उघडे पाडले आहेत ? >>>>>> +१

महेश + १

इब्लिस या आयडिला फाट्यावर मारण्यात यावे!

महेशजी,
असू शकतो नव्हे आहोतच. अन वाद कसले? तुमच्या माझ्यात कोणताच व्यक्तीगत वाद नाही.
तसेच,
भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन म्हणा किंवा इतर काही म्हणा केलेच पाहिजे यात दुमत नाही. पण त्या मुखवट्याखाली चाललेली ही तद्दन भंकसगिरी आहे असे मला तरी वाटते.
अण्णांच्या पहिल्या दिल्लीवारीतून बर्‍याच आशा पल्लवीत झाल्या होत्या, पण याच केजरीवाल प्रभृतींनी जी काय वाट लावली ती पाहून मग या लोकांबद्दल एक आढी मनात बसलेली आहे. यांनी काही खरे चमकदार करून दाखविल्याशिवाय ती आढी जाणार नाही हे ही तितकेच खरे.
एकंदर भारतीयांना व्यक्तीपूजेची सवयच आहे, अन त्यांना एक शेंदूर फासलेला दगड तरी लागतोच. अन एकदा शेंदूर फासला गेला, की मग त्या दगडाला देवाइतके महान अन कायम सत्य मानायचे अशी वृत्ती दिसते. अन असे दिसले की चिमटे काढावेसे वाटतात. इतकेच Wink

एकंदर भारतीयांना व्यक्तीपूजेची सवयच आहे, अन त्यांना एक शेंदूर फासलेला दगड तरी लागतोच. अन एकदा शेंदूर फासला गेला, की मग त्या दगडाला देवाइतके महान अन कायम सत्य मानायचे अशी वृत्ती दिसते. अन असे दिसले की चिमटे काढावेसे वाटतात. इतकेच >>>>> + १

इब्लिस ह्यांचा पंखा ......

आता अण्णा आणि केजरीवाल वेगवेगळ्या मार्गाने जाताहेत आणि केजरीवाल राजकारणात उतरल्याने या धाग्याला केजरीवाल, जिंकण्यासाठी लढताय कि ..... [२] म्हणणे जास्त योग्य होईल. म्हणुन तसा बदल केला आहे.

रोज नविण आरोप जाला कि हा बाफ अपडेत होतो आज गदकरिंवर आरोप जाले म्हनुन पाहिल तर बोटखिळ बसलि का ? असं काहि जरि केलं तरि माजा आयदि मी भासकरसुताला देनार नाहि.

सकाळ न्यूज नेटवर्कः१७-१०-१२:
"इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी केलेले आरोप:
१)नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागातील गजानन घाडगे व अन्य बाधित शेतकऱ्यांची 100 एकर जमीन सरकारने संपादित केली. शेतकऱ्यांनी 2000 मध्ये जमीन मिळण्यासाठी केलेली मागणी राज्य सरकारने 2002 मध्ये फेटाळली. त्यानंतर 4 जून 2005 ला गडकरींनी तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांना संबंधित जमीन आपल्याला मिळावी, असे पत्र लिहिले. त्यानंतर चारच दिवसांत राज्य सरकारने कारवाई केली. 22 जूनला विदर्भ पाटबंधारे विभागाच्या बैठकीत ती जमीन देण्याचा निर्णयही झाला. एका अधिकाऱ्याने कायद्याचा उल्लेख करताच तत्कालीन मंत्र्यांनी "कायद्याचे नंतर बघून घेऊ, आधी ही जमीन गडकरींना द्या,' असे फर्मावले. 37 हेक्‍टर जमीन गडकरींच्या संस्थेला व 11 एकर जमीन "जेम्स ऑफ इंडिया'ला देण्यात आली. या दोन्ही आदेशांवर अजित पवार यांची सही आहे .
२)वडगाव धरणाचे पाणी लुटले.
३)गडकरी यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दुरुपयोग स्वतःच्या 17 व्यवसायांचे साम्राज्य वाढविण्यासाठी केला आहे.

गडकरींनी त्यांचा खुलासा करून आपल्यावरील आरोप फेटाळून सर्व प्रकारच्या चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे.
चौकशी तर १०० % व्हायलाच हवी . पण या एकाच प्रकरणाची नाही तर सरकारने आपल्या अधिकारात अशा जमिनि ज्यांना ज्यांना , ज्या ज्या कारणांसाठी , दिल्या आहेत त्या वैयक्तिक लाभासाठि वेगळ्याच कारणासाठी वापरल्या जाताहेत का असा मोठा शोध घ्यायला हवा.
गडकरींना दिली तशा जमीनी आणखी शेकडोंना विविध कारणांसाठी दिल्या असतील आणि त्यातील कित्येकांनी आपल्या स्वतःच्या फायद्यकरिता वापरल्या असतील. त्यामुळे अशा सर्वच प्रकरणांची एस आय टी बसवून व्यापक चौकशीची मागणी केजरीवालांनी करायला हवी, जशी सिंचन घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.
केजरीवालांनी आता जी प्रकरणे हाती घेतली आहेत त्याचाच पाठपुरावा करण्यात त्यांनी शक्ति खर्चावी.
ही सर्व प्रकरणे लावून धरली आणि त्यातून २जी प्रमाणे काहीतरी निष्पन्न झाले तर त्यांच्या चळवळीला भविष्य आहे. नाहीतर सर्वच वाया जाईल आणि अशी चळवळ नजिकच्या भविष्यात उभि राहू शकणार नाहि. लोक आणखी नवनवीन प्रकरणे घेऊन आले तरी त्यांनी त्यांना त्यांच्या त्यांच्या बळावर ती उघड करण्याबद्दल मार्गदर्शन करावे. तरच चळवळ पसरेल.

भ्रष्टाचार्-आरोप सत्र राजकारणासाठी जर ते वापरत असतील तर त्यांना राजकारणात तरी फारसे भवितव्य दिसत नाही. निव्वळ भ्रष्टाचाराचा मुद्दा [आणि दहशतवादाचा मुद्दा देखिल] जनतेला निवडणुकीच्या वेळेस फारसा गंभीर वाटल्याचे आतापर्यंत आढळून आलेले नाही. हे चूक कि बरोबर हा वेगळा विषय आहे.

सर्वांना विनम्र आवाहन

काही मजकूर, वाक्ये, कल्पना इकडून तिकडून घेतलेल्या असल्यास त्याचा प्रांजळपणे उल्लेख करणे गरजेचे आहे.

Pages