स्वैर त्याची ही कहाणी...

Submitted by बागेश्री on 15 September, 2012 - 00:42

आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
जरी सखा हा लाडका
पण नाठाळ गं भारी,
सांभाळून वाट चाल
आहे लबाड रंगारी..

स्वैर रूप तो धारिता
राधा तूही रंगशील,
रंग त्याचा तुझा एक
कशी विलग होशील?
बरसेल आसुसून
तुज करील बेधुंद,
परि सावर स्वतःला
नको होऊस बेबंद..

क्षणी भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
वारा मदतीस त्याच्या,
तुझा पदर ढाळाया..
धाव- धावशील कोठे?
चराचरी त्याची माया

तुझे वेड त्याला आहे,
जशी त्याची तू दिवाणी
परि जप तुज सखे,
लाज राखूनिया मनी...
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!

-ब्लॉगवर पूर्वप्रकाशित- http://venusahitya.blogspot.in/2012/09/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्व्वा..!!! मस्तंच... Happy

प्रत्येक कडव्यानिशी डोळयासमोस एखादं सुंदर चित्र यावं... इतकं गोड रचलं गेलय.... Happy

जबरी गोड आहे कविता. खुप महिन्यांनी पावसावर लिहिलंस. Happy जाम आवडली.

आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!! >>> सुंदर !

मस्तच...... हळुवारपणे उलगडत जाणारी कविता.
उनाड, द्वाड, नाठाळ ही पावसाला लाडिकपणे लावलेली विशेषणे मोहक आहेत.
अगदी सहजगत्या(अप्रत्यक्षरीत्या) पावसाला कृष्ण म्हणणे खूप आवडले.

अत्त्त्त्तिशय सुंदर!
मला फार फार आवडली..
बरेच दिवसांनंतर बागेश्री रॉक्ड!! Happy

आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
>>
फास्ट गुणगुणताना यातली गतिमानता (मराठीचे जाणकार लोक्स, चुकीचा शब्द वापरला असल्यास क्षमा! :))
आवडली.

"लबाड रंगारी" - व्व्व्वाह!! फार मस्त शब्द!

पण भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
>> 'मनाजोगते' शब्दाचा वापर फार आवडला!

चराचरी त्याची माया
>>> ये ब्बात!

आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!
>> झक्कास!

पु.ले. शुभेच्छा! Happy

व्वा बागेश्री सूपर्ब!!!

राधा तूही रंगशील,>>>>
तुझे वेड त्याला अहे >>>>>>
यावारून माझा एक शेर आठवतोय

राधरंगी रंगला काळा
कृष्णभोळा फाग होती ती

धन्स बागेश्री खूप मस्त कविता लिहिलीस

धन्यवाद मित्रांनो... Happy

भारती, शशांक आणि आणखी एक तै तिघांनीही "हर मुळ, हर कंद" खटकल्याने कविता थोडी भरकटल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने थोडा बदल केला आहे
तिघांनीही दिलेल्या सूचनेबद्दल खूप खूप आभारी आहे... शाम तुझेही आभार!
असेच लक्ष असू द्यात, लोभ असू द्यात, इतकेच म्हणते Happy

फारच सुरेख ओघ आहे या कवितेला, त्यात काही नटखट वळणेही आहेत, एक वेगळाच रंगही ज्यामुळे नितांत सुंदर झालीये ही.....

बागेश्री,... जहबहरीही...
केवळ अप्रतिम जमलीये... अगदी रोजच्या बोली भाषेत सखीनं सखीला दिलेला सावधपणाचा इशारा...
मजा आया

शशांक, रणजित, कविन, वर्षूतै, बिनधास्त, दाद आभारी आहे..

हम्म, दाद, सखीने सखीची म्हणा, किंवा सखीने स्वतःच्याच मनाची समजूत म्हणा Happy

Pages