Submitted by बागेश्री on 15 September, 2012 - 00:42
आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
जरी सखा हा लाडका
पण नाठाळ गं भारी,
सांभाळून वाट चाल
आहे लबाड रंगारी..
स्वैर रूप तो धारिता
राधा तूही रंगशील,
रंग त्याचा तुझा एक
कशी विलग होशील?
बरसेल आसुसून
तुज करील बेधुंद,
परि सावर स्वतःला
नको होऊस बेबंद..
क्षणी भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
वारा मदतीस त्याच्या,
तुझा पदर ढाळाया..
धाव- धावशील कोठे?
चराचरी त्याची माया
तुझे वेड त्याला आहे,
जशी त्याची तू दिवाणी
परि जप तुज सखे,
लाज राखूनिया मनी...
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!
-ब्लॉगवर पूर्वप्रकाशित- http://venusahitya.blogspot.in/2012/09/blog-post.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज इथे उद्या नाही, स्वैर
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!
<<<
छान
सगळीच सुरेख!
सगळीच सुरेख!
शेवटच्या ४ ओळी विशेष आवडल्या
शेवटच्या ४ ओळी विशेष आवडल्या मला.
व्व्वा..!!! मस्तंच...
व्व्वा..!!! मस्तंच...
प्रत्येक कडव्यानिशी डोळयासमोस एखादं सुंदर चित्र यावं... इतकं गोड रचलं गेलय....
पहिल्या शब्दापासून ते
पहिल्या शब्दापासून ते शेवटापर्यंत - अगदी जमलीये ही रचना.......
जियो, जियो....
पजो, मग होऊन जाऊ देत डिजीटल
पजो, मग होऊन जाऊ देत डिजीटल आर्ट्स
कविता खुपच छान, स्वैर
कविता खुपच छान, स्वैर त्याची ही कहाणी ---> हे शिर्षक पण खुप छान योजले आहे.
जबरी गोड आहे कविता. खुप
जबरी गोड आहे कविता. खुप महिन्यांनी पावसावर लिहिलंस. जाम आवडली.
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!! >>> सुंदर !
अथपसून इतिपर्यंत वादळतं
अथपसून इतिपर्यंत वादळतं सौंदर्य, फक्त,
>>त्याच्या तालावर नाचे
हर मुळ, हर कंद! >>
हे खटकलं.
सुंदर! शेवटचे कडवे मस्त!
सुंदर! शेवटचे कडवे मस्त!
मस्त! आवडली
मस्त! आवडली
गोड वाटली कविता.
गोड वाटली कविता.
छान आहे कविता...
छान आहे कविता...
मस्तच...... हळुवारपणे उलगडत
मस्तच...... हळुवारपणे उलगडत जाणारी कविता.
उनाड, द्वाड, नाठाळ ही पावसाला लाडिकपणे लावलेली विशेषणे मोहक आहेत.
अगदी सहजगत्या(अप्रत्यक्षरीत्या) पावसाला कृष्ण म्हणणे खूप आवडले.
छानै कविता... भारतीताई + १
छानै कविता... भारतीताई + १
सुंदर रचना
सुंदर रचना
अत्त्त्त्तिशय सुंदर! मला फार
अत्त्त्त्तिशय सुंदर!
मला फार फार आवडली..
बरेच दिवसांनंतर बागेश्री रॉक्ड!!
आला आला हा पाऊस
नको एकटी जाऊस,
सखे, उनाड हा द्वाड
तुज पाडेल भरीस...
>>
फास्ट गुणगुणताना यातली गतिमानता (मराठीचे जाणकार लोक्स, चुकीचा शब्द वापरला असल्यास क्षमा! :))
आवडली.
"लबाड रंगारी" - व्व्व्वाह!! फार मस्त शब्द!
पण भान तू हरता
त्याचे आयते फावेल,
चिंब तुजला करून
मनाजोगते साधेल...
>> 'मनाजोगते' शब्दाचा वापर फार आवडला!
चराचरी त्याची माया
>>> ये ब्बात!
आज इथे उद्या नाही,
स्वैर त्याची ही कहाणी
मग झुरशील पुन्हा
गात विरहाची गाणी...!!
>> झक्कास!
पु.ले. शुभेच्छा!
सूपर्ब लिहिलेयेस........
सूपर्ब लिहिलेयेस........ बर्याच दिवसांनी. आवडली.......
व्वा बागेश्री सूपर्ब!!! राधा
व्वा बागेश्री सूपर्ब!!!
राधा तूही रंगशील,>>>>
तुझे वेड त्याला अहे >>>>>>
यावारून माझा एक शेर आठवतोय
राधरंगी रंगला काळा
कृष्णभोळा फाग होती ती
धन्स बागेश्री खूप मस्त कविता लिहिलीस
आयाचा प्रतिसादही आवडला.
आयाचा प्रतिसादही आवडला.
सुंदर कल्पना...आवडली
सुंदर कल्पना...आवडली
धन्यवाद मित्रांनो... भारती,
धन्यवाद मित्रांनो...
भारती, शशांक आणि आणखी एक तै तिघांनीही "हर मुळ, हर कंद" खटकल्याने कविता थोडी भरकटल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने थोडा बदल केला आहे
तिघांनीही दिलेल्या सूचनेबद्दल खूप खूप आभारी आहे... शाम तुझेही आभार!
असेच लक्ष असू द्यात, लोभ असू द्यात, इतकेच म्हणते
फारच सुरेख ओघ आहे या कवितेला,
फारच सुरेख ओघ आहे या कवितेला, त्यात काही नटखट वळणेही आहेत, एक वेगळाच रंगही ज्यामुळे नितांत सुंदर झालीये ही.....
अप्रतिम.... जस्ट
अप्रतिम.... जस्ट अप्रतिम....!!
____/\____ !
खास
खास
बागेश्री,... जहबहरीही... केवळ
बागेश्री,... जहबहरीही...
केवळ अप्रतिम जमलीये... अगदी रोजच्या बोली भाषेत सखीनं सखीला दिलेला सावधपणाचा इशारा...
मजा आया
बागुडे.. अप्रतिम... इतकी
बागुडे.. अप्रतिम... इतकी सुर्रेख जमलीये.. वाह वाह!!! खूपच आवडली!!!
फारच सुन्दर!
फारच सुन्दर!
शशांक, रणजित, कविन, वर्षूतै,
शशांक, रणजित, कविन, वर्षूतै, बिनधास्त, दाद आभारी आहे..
हम्म, दाद, सखीने सखीची म्हणा, किंवा सखीने स्वतःच्याच मनाची समजूत म्हणा
खुप आवडली
खुप आवडली
Pages