सुपरि बहद्दर

Submitted by vilas naik on 14 September, 2012 - 21:12

सुपारी बहाद्दूर
तो कुणी संत नव्हता, साधू तर अजिबात नव्हता. परिस्थितीनी बनलेला क्रिमीनल नव्हता. थोडक्यात सहानभूती वाटावं असं काहीही त्याच्यात नव्हते.
उंचपुरा, स्मार्ट, बोलण्यात सफार्इदारपणा, उच्चारात स्पष्टता. वागण्यात गर्व, भार्इगिरी नसानसात ठासून भरलेली. स्वभाव धांदरट. गॅन्गवारमधला तापटपणा गरज म्हणून दाखविणारा. ‘सारी दुनिया मेरी मुठ्ठीमे’ समजणारा- वकीलालाही स्वत:चे वटीक समजणारा.
मला जेल मधून निरोप येत होते. मी मुंबर्इत काही महत्वाचे खटले हाताळत होतो. काही सिनियर वकील ‘तुम्ही सुरेश भगत मर्डर केसमध्ये येताय का?’ अशी विचारणा करू लागले. माझे तर काहीच ठरले नव्हते.
पण हरीषचा निर्णय पक्का झाला होता. त्यांनी मी केस घेतल्याचे आधीच जग जाहीर करून टाकले होते. कोर्टात तो माझे वकीलपत्र दाखल करायला मुदती मागत होता. अशा पराकोर्टाचा आत्मविश्वासानेच तर त्याची कबर त्याने खोदून घेतली होती.
हरीषची आणि माझी एकदाची भेट झाली. त्यापूर्वी हस्तकांकरवी मला कागदही पोहचले होते. प्राथमिक बोलणीही झाली होती. खटला एकदम वार्इट म्हणजे कोणताही शहाणा वकील टाळेल असा. पण तरीही खरे अव्हान देणारा. अडचण ह्या आरोपीचा स्वभाव. अनेकांनी मला सावध केलेले पण पक्षकाराची श्रद्धा आणि विश्वास. या व्यवसायात तोच तर पायाचा दगड असतो. आरोपी गुन्हेगार आहे म्हणून पळ काढणार कसा? फौजदारी वकिली कशी करणार? मला तर नाव कमवायचे होते. मोठे व्हायचे होते. त्यामुळे अशी आव्हाने मला भूलावत होती. त्यांचे जणू मला व्यसनच लागले होते.
एकतर मोठया मोठया नावाजलेल्या वकिलांसोबत मला काम करायची संधी मिळणार होती. नाव होणार होते. आणि आर्थिक गणीतही सांभाळले जाणार होते.
गेली दोन अडीच वर्षे मी या केसमध्ये ‘झुंज देतोय’. खटला न्यायप्रविष्ठ आहे. अजून आरोप सिद्ध झालेला नाही. नेहमी प्रमाणे माझा आरोपी निर्दोष असल्याचा बचाव मी घेतलाय. सारं कसब पणाला लावलेय. पक्षकाराच्या मधले न्यायप्रविष्ठ संवाद आपल्या समोर मांडणे संकेताचे विरूद्ध आहे. पण तरीही हरीषच्या रूपाने एक विलक्षण माणूस माझे आयुष्यात आला.
हरीष शान शौकीत राहणारा. कांदीवलीच्या गल्लीत वाढलेला. मुंबर्इ वाढली, व्यापार वाढला. मुलांच्या अंगातील डेरींग वाढले. हरीष क्रिकेट खेळायचा. नेतेपणाची त्याला भारी हौस. समोरच्याला नडायचेच ठरवून तो अंगावर जायचा. मारामार्यार करायचा. रॉबीन हूड बनायला जायचा.
पोरांना तो रक्षणकर्ता वाटायचा. गल्लीत गोविंदा काढायचा. स्वत:चे पथक तयार करायचा. त्यासाठी खूप मेहनत करायचा. मोबार्इल नावाचे जादूचे यंत्रासोबत खेळायचा. दोस्ताना वाढत गेला. भार्इगिरी वाढत गेली. हात पसरायच्या आधीच वर्गणी जमा होऊ लागली. भीक मागण्यापेक्षा दबदबा महत्वाचा. मुंबर्इत असे आदर्श जागोजागी होतेच. त्यांच्याकडे पहात हरीष मोठा होत होता.
साधारण मराठी, गुजराथी कुटूंब घरून काही डबोले मिळण्याची आशा नाही. त्यामुळे पैशाची भूक स्वत:लाच भागवायची होती. शान शौकीपणा करायची हौस आणि हौस भागवायला दोस्ताना. साध्या लार्इटचे सामानाच्या दुकानातला वायरमन बघता बघता कॉन्ट्रॅक्टर झाला, भार्इ झाला.
त्याला ‘कॉन्ट्रक्टकिलर’ ही पदवी अद्याप मिळायची होती. गाडीत एका दोघाना फारतर चपटवण्यापर्यंत मजल गेलेली. पण त्याच्यावर काहींची नजर स्थिरावली होती. त्या नजरा अनुभवी होत्या.
असाच कधीतरी तो क्रिकेट खेळताना भार्इ झाला. डोकी फूटली. पोलीस स्टेशनची पायरी चढली असणार.हे एक काल्पनिक चित्र पण अनुभवाने रंगविलेलं.
हरीष आता गुन्हेगारीच्या पाठशाळेत दाखल झाला होता. पोलीसांनी त्याला फोडलेही असेल पण तो मार एकदा सहन करायची सवय झाली की पुढची प्रगती कठीण नसते. खार्इत लोटणारी दरी दिसण्यापेक्षा पैशांची वहाती गंगा विलोभनिय असते. आत्महत्येचे दुख: करायला वेळ नसतो. त्यापेक्षा बारमधला किणकीणणारा आवाज अधिक मोहक असतो. तो सहवास, पायांचे थीरकणे नशा आणते, कैफ चढवते. पुन्हा पुढचे गुन्हे त्या नशेतच घडत जातात.
हरीष वेडा नक्कीच नव्हता. लोकांना मुर्ख समजत नव्हता. आपण काय करतोय त्याची त्याला पूर्ण माहिती होती. त्याला नेता बनायची हौस होती आणि समोर आदर्श गॅन्गवॉरचे होते. भार्इनाच दुनिया सलाम करते या सिद्धांतापर्यंत तो आलेला होता.
पैसे देऊन काहीही विकत मिळते. यावर त्याचा विश्वास जडला होता. तो समज खोटा आहे हे ठरवणारा सोबत कुणी साथीदार नव्हता. आर्इ बापाला पोरगा इतका डेरींगवाला का व कसा बनतोय ते पहायला वेळ नव्हता. घरात मोठा टी.व्ही. आला होता. आणखी चांगले चांगले मोबार्इल येत होते. पोराला भेटायला लांबून लांबून माणसे येत होती. आतातर पोरानी वेगळी व्यवस्था करून ऑफिस थाटले होते. पोरगा यावेळी नगरसेवक होणारच असे शेजारी पाजारी बोलत होते.
हरीष पण रात्री बेरात्री चाळकर्यांेना उपयोगी पडत होता. हवालदारालाही वेळ प्रसंगी दम भरत होता. कुणाचा हात पाय मोडला तर औषधे आणून देत होता. हॉस्पीटलची बिले भरत होता. पोलीसही कधी कधी चाळीत येत, पण हात ओले झाले की परत जात.
हरीष प्रेमात पडला. पुन्हा त्याच्या स्वभावामुळे एकटा पडला. आता त्याच्या मैत्रीणी वाढू लागल्या. घरच्यांना सुन पाहीजे होती. पण हा फाटक्या तोंडाचा. धंदा काय करतोय कुणी विचारले तर सरळ ‘भार्इगिरी करतो’ असे सांगायचा. खंडणी मागतो सांगायला त्याला अभिमान वाटायचा.
हरीषचा दोस्ताना वाढत होता. त्यात पोलीस खबरे होते. पोलीसांशीच दोस्ती करून त्यातच मांडवली करणारा पुजारी नावाचा दलाल त्याला मोठया भावासारखा वाटू लागला. पुजारी म्हणजे एकदम टिप टॉप माणूस. शान शौकीत रहाणारा. पोरी फीरवणारा, गाडया बदलणारा. मंत्र्यांचा पी.ए. म्हणून मिरवणारा. दिल्लीला ऑफीस आहे सांगणारा. सतत मंत्रालयाच्या गोष्टी करणारा. पोलीसांच्याही बदल्या फिरवून देणारा. सतत दौर्याणवर असायचा आणि गेम ही मोठे मोठे वाजवायचा. त्याला धंद्याचे नवीन गणीत सापडले होते.
पुजारीनी स्वत:चीच वेगळी ओळख बनवलेली होती. रेशन दुकान वाले, काळा बाजारवाले, अमली पदार्थवाले, पेट्रोल भेसळवाले यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचायची. मग तो रितसर पोलीसांना खबर द्यायचा. पोलीसांचा सिक्रेट मनी असतो म्हणे. अशा खबर्यांीना त्यातून पोसले जाते. पोलीस धाड टाकायचे. पुजारीची पत वाढायची. केस झाली तरी फायदा. पुन्हा प्रकरण मिटवायचे असेल तर मोठी तोड व्हायची. पुजारीच ‘मांडवली’ करायचा. पैसाही चांगला मिळायचा. पुजारी मंत्र्यांच्या गाडीतूनही फिरायचा. त्यामुळे पोलीसांना तो हवाहवासा वाटायचा. कधी कधी मंत्रीही धाड टाकायचे. खूप प्रसिद्धी मिळायची. सर्व जण पोटभर जेवायचे.
पुजारीला आता डेरींगवाल्या मुलांची गरज होती. नेटवर्क भारतभर पसरवायचे होते. सभ्यपणा, शिक्षण, पोलिस आणि मंत्रालय हातात इतके सर्व योग त्याच्या कुंडलीत होते. तो इतरांनाही या जाळयात ओढत होता. पोलीसांमध्येही काही हेर असतातच. त्यांची तीरकी नजर अशा समाजसुधारकांवर होतीच. ते फक्त वाट पहात होते.
सुरेश भगतचे नाव तो पर्यंत सर्व दूर पसरल होते. मटका किंग म्हणून तो प्रसिद्ध होता. दिवसाला लाखो रूपयांची उलाढाल होती. त्यामुळे सर्व काही पायाशी लोळण घेत होते. पण त्याच्या लक्ष्मीला दृष्ट लागली होती. तो स्वत: अमली पदार्थाच्या अहारी गेला होता. त्याला त्याशिवाय जगणेच अशक्य झाले होते. शिवाय घरचेच भेदी झाले होते. अब्जावधीची प्रॉपर्टी खुणावत होती. पैशापार्इ रक्ताची नाती पातळ होत होती. भाऊ भावाच्या जिवावर उठला होता. घरातच दोन भावांचा अकाळी आणि संशयास्पद अपघाती मृत्यू झाला होता. लक्ष्मी पांढर्याआ पायांनी घरात येत होती आणि कुंकू पुसून जात होती.
अशा अनौरस संपत्तीला पळवाटही फार असतात. तिजोरीलाच बिळे पडतात. त्याची भगदाडे व्हायला वेळ लागत नाहीत. मग एकदा का तो संपत्तीचे मोहाचा पडदा डोळयावर चढला की मग सुपारी निघायला वेळ लागत नाही.
पोलीसांचे म्हणणे हि तेच होते. घटस्पोटीत पत्नीला पैशाचा मोह सुटला. मटक्याचा धंद्यावर कब्जा करण्यासाठी ती वेडीपीसी झाली होती. चार्टशिट प्रमाणे आणि नातेवार्इकांचे साक्षीप्रमाणे त्यासाठी बॉडीगार्ड मित्राला गाठले. मित्रांनी पुजारीला गाठले. पुजारीनी हरीषला गाठले. सुपारीची बोलणी झाली. पोलीसांचा तपास सांगत होता की हरीषने तीस लाखाची सुपारी घेतली. अजमुद्दीन नावाच्या मित्राचा ट्रक वापरायला घेतला. एकदा मे महिन्यात प्रयत्न फूकट गेला. मग कोर्टाचे तारखेच्या दिवशी गेम वाजवायचे ठरले. पुन्हा 13 जूनला मुहूर्त ठरला. मोबार्इलच्या मदतीने निगराणी ठेवली गेली. टारगेट सुरेश भगत होता. तो अलिबाग कोर्ट सोडून निघाला. त्याच्या मागावर मारेकरी होतेच.
वडखळ पर्यंत ट्रक होताच. भगत आपल्या बॉडीगार्ड, वकील, साथीदार निघाल्यावर ट्रकही निघाला. ऑर्डर मिळाल्यावर ट्रक सुसाट सुटला. धरमतर पूल उतरून सरळ येवून स्कॉर्पीओवर आदळला. सहा जण जागीच ठार झाले. एक जण जीवंत होता. त्याला लोकांनी खाजगी गाडीने जिल्हा रूग्णालयात हलवले. तेथून मुंबर्इला हलवले तेथे त्यानीही प्राण सोडला.
इकडे पोलीस आले. दरवाजे तोडून प्रेते बाहेर काढली. क्रेनने गाडया रस्त्यावर घेतल्या. बघ्यांचे जाब जबाब झाले, जागेचा पंचनामा झाला. ट्रकवरच्या नबंरवरून मालकाशी संपर्क साधण्यात आला. तो अजमुद्दीन निघाला.
त्याला उचलल्यावर, ड्रायव्हर मिळाला. त्यांना गोंजारल्यावर हरीष मिळाला, साथीदार मिळाले. मोबार्इल मिळाले. मयतांचे ठावठिकाणे मिळाले. गुन्ह्याचा उद्देश समजला.
कोर्टातून अधिक तपासासाठी पोलीस कोठडी मिळाली. सुपारीची रक्कम जप्त झाली. गुन्ह्यातल्या गाडया जप्त झाल्या.
तपास अचानक मुंबर्इ क्राइम ब्रांच कडे गेला. एका माहितगार आणि डोकेबाज तपासी अंमलदाराकडे तपास आला. जुने शत्रूत्व उकरून काढले गेले. कट कारस्थान उघड करण्यात आले. ‘मोक्का’ लावण्यात आला. संघटीत गुन्हेगारी ठरवण्यात आली. मयताचे पत्नीला, मुलाला कटाचे भागीदार बनविण्यात आले.
कोर्टात खटला उभा राहीला. पोलीसांचा पहिलाच प्रयत्न फसला. उच्च न्यायालयाने ‘मोक्का’ उठवला. पण या बहूचर्चित खटल्यात जामिन नाकारले. काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले पण काही उपयोग झाला नाही. खटला रोजचे रोज चालविण्याचा आदेश झाला. तसा तो सुरूही झाला.
सर्वच आरोपींनी गुन्हा नाकारला. साक्षीपुरावा सुरू झाला. आरोप प्रत्यारोप झाले. बहुचर्चित खटल्यात एकेका साक्षीदारांची पिसे निघाली. उलट तपासात पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उभे केले गेले. माफीचे साक्षीदार दोन आरोपी झाले. त्यांना कायद्याचे संरक्षण मिळाले. साक्षी नंतर त्यांना जामिनही झाले.
प्रसार माध्यमांनी हा खटला डोक्यावर घेतला. दूरदर्शनच्या वाहिन्यांना चार दिवस चघळायला विषय मिळाला. चोथा झाल्यावर ते सर्व दुसर्याी विषयाकडे वळले. मजल दर मजल करत आता खटला शेवटच्या टप्प्यावर आलाय.
न्यायालय आपले काम करेल. आम्ही वकील मंडळी प्रयत्नांची शिकस्थ करू. निकालाचा अंदाज वर्तवायला नसतो. आणि न्यायदानात अडथळा येर्इल असे भाष्यही करायचे नसते.
पण या खटल्यानी बरेच काही अनुभवायला मिळाले. निकाला नंतर त्यावर मुल्यांकनही करता येर्इल पण कोर्टातला आरोपींचा थाट माट पहायला मिळाला. या खटल्याने मला वारेमाप प्रसिद्धी दिली. गावचा वकील मुंबर्इतही कसा प्रभावी ठरू शकतो. हे दाखविण्याची संधी मिळाली. सरकारी वकील म्हणून केलेले काम आणि जिल्हा न्यायालयाचा अनुभव पोलीस तपासाचे आणि कागदांचे उलट तपासात पंचनामे मांडताना कामाला आले.
हरिष शेवटचा भेटला तेव्हा एव्हडेच म्हणाला, ßनार्इक साहेब. मी मुर्ख म्हणून नाही तुम्हाला इतक्या लांबून आणून उभे केले?Þ
त्याचा मा÷यावर विश्वास होता.
तेच विश्वास शेवटपर्यंत कायम राहील. इतकी मेहनत मी या खटल्यात घेतली.
पक्षकारांची बाजू समर्थपणे मांडली. महाले नावाचा पोलीस अधिकारी या खटल्यात आहे. त्याच्या कामाची पद्धत अनुभवास आली. मुंबर्इ पालीस अशा काही मेंदू मुळेच अजून टिकून आहे. याची खात्री झाली. शक्य तेव्हा हा माणूस जातीने कोर्टात हजर राही. सर्वांशी प्रेमाने वागे, आरोपींच्या पोटात शिरे. त्याचे इमान त्याच्या कागदांशी होते. एक जिद्दी पोलीस अधिकारी काटा करू शकतो ते या खटल्यात अनुभवायला मिळाले.
या खटल्यात अनेक प्रश्न उपस्थित झालेत तो गूंता आता कोर्टाला सोडवायचाय पण तरीही पोलीसांच्या अनेक चुका या सुनावणीत दाखविणेत आले. तीन पातळीवर या तपासात सुरू होतो. मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी या तपासात सहभागी होते. थोरा मोठयांचे मार्गदर्शन त्यांना लाभात होते. तरी सात पडताळून पाहण्यात आला नव्हता. तपास फक्त एकाच दिशेने झालेला होता. मयतांना दुसर्या् कुणापासून धोका नव्हता हे समोर आणलेच गेले नाही. मयता जवळील एक संशयीत बॅगेचा पंचनामा केला गेला नाही. मयताच्या भावा विरूद्ध तपासच झाला नाही. मयताचे भावानी स्वत:वरच गोळया झाडून घेण्याचा नंतर कांगावा का केला ते तपासले गेले नाही, जीवंत राहीलेले जखमीचा शक्य असूनही मृत्यूपूर्वी जबाब नोंदविला नाही. नेहमीचेच पंच पुन्हा पुन्हा वापरले गेले. त्यांनी शपथेवर सरकार पक्षाच्या विरूद्ध स्पष्ट दिली. माफीचे साक्षीदार करायची वेळ सरकार पक्षावर आली. जप्तीचे पंचच भर कोर्टात फूटले. फिर्याद आणि जागेच्या पंचनाम्यावरच शंका उपस्थित झाल्या. फिर्याद सरकार आणि त्यांना आरोपींना शिक्षेला पाठवण्यात का गरजेचे वाटते ते चित्र समोर आलेय. आता सव्र वाट पहाताहेत ती न्यायदानाची या पुढे बरीच चिरफाड होर्इल. पुन्हा काही दिवस बातमी झळकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users