प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? Wink
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.

उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
Zabbu_003.jpg
आणि नवीन क्लू दिला- होडी

तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
IMG_1339.JPG
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)

चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)

*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks for moderation Max Proud

हे घ्या चार साठी - four burners just to clarify Wink

char.jpg

ल्कु - पुस्तक...

आणि अशा प्रकारे स्वयंपाकघराची आठवण आल्याने माझी फायनळ कल्टी.....मजा आली....

बिल्वा Happy

मी बाद Happy

सशल, तो खांबांचा, धबधब्याच्या प्रतिबिंबाचा (yosemite मधला आहे का?) आणि हिरव्या शालूचा फोटो प्रचंड आवडले. छायाचित्रकाराचे (म्हणजे त्याने काढलेले) आणखी फोटो असतील तर बघायला नक्की आवडतील.

बुलेट ट्रेन्ची बार्शी लाईट झालीये आज त्यामुळे चान्स मिळाला Wink DSCN5425.JPG

ह्या जपानी उंच खडावा!
माझा क्लू - जपानी

मामे, माझ्याकडे अथेन्समधे रहात होते तेव्हाचा फॉल कलरच्या पाचोळ्याचा फोटु आहे. याचवर्षी एका कुठल्या तरी झब्बूत लावला होता.

क्लू जपानी.... अरे सामान्य माणसांना झेपणीय क्लू द्या रे Wink

मुदलात या ़खडावा ऊंच टाचांच्या वाटत नाहीयेत. सेमच उंची आहे दोन्ही बाजुला.

मुदलात या ़खडावा ऊंच टाचांच्या वाटत नाहीयेत. सेमच उंची आहे दोन्ही बाजुला.
>>
अनुमोदन

Pages