पालक मकई

Submitted by दिनेश. on 26 September, 2008 - 04:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालकाची एक जूडी, एक टीन स्वीट कॉर्न किंवा ताजे स्विट कॉर्न दोन वाट्या, अर्धी वाटी काजू, अर्धी कप दुध पावडर, चार पाच ओल्या मिरच्या, एक मध्यम कांदा, एक मध्यम बटाटा, थोडी दालचिनीची पूड, मीठ व तूप

क्रमवार पाककृती: 

पालकाची पाने खूडून घ्यावीत. थोडे तूप गरम करुन त्यात हिरव्या मिरच्या टाकाव्यात व पालक घालावा. झाकण न ठेवता तो परतून घ्यावा. त्याचा रंग बदलला कि लगेच उतरुन घ्यावा.
कांदा उभा बारिक चिरावा. बटाटा सोलुन त्याचे छोटे चौकोनी तूकडे करावेत. थोडे तूप तापवून त्यावर कांदा परतावा, तो सोनेरी झाला कि बटाट्याच्या फोडी सोनेरी कराव्यात. मग मक्याचे दाणे घालावेत. टिन मधले पाणी किंवा साधे पाणी घालून ते शिजू द्यावेत.
तोवर पालक, काजू आणि दूधाची पावडर असे सगळे बारिक वाटून घ्यावे. लागलेच तर थोडे पाणी घालावे. ते मक्यामधे घालावे. मिठ घालुन झाकण न ठेवता मंद आचेवर शिजवावे. मग गॅस बंद करुन दालचिनीची पूड घालावी. मग वाटलीच तर तूपाची जिर्‍याची फोडणी द्यावी. हव्या तर फोडणीत थोड्या लाल मिरच्या घालाव्यात.
हा प्रकार हमखास जमतो. उत्तम चव येते. बाकि कुठलाही मसाला वापरु नये.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

या भाजीचा हिरवागार रंग छान दिसतो. हवे तर थोडे मक्याचे दाणे वेगळे ठेवून वरुन घालावेत.

माहितीचा स्रोत: 
आस्मादिक
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपी वाटतेय. करून बघेन. Happy

पालक मला मनापासून आवडत नाही, पण इलाज नसेल तर खाऊ शकते एखाद्यावेळेस>>>>>>>>>.तू शेपू मकई कर. Wink Light 1

मी आत्ताच वाचली ही रेसिपी. दा, तुमच्या सगळ्या सेसिप्या एकत्र कुठे बघता येतील?
बाय द वे, मस्त आहे कृती! नक्की करून बघणार.

वत्सला, अजून आठ्वण ठेवलीय ? छान वाटलं.

शांकली.. आता ते संकलन माझ्याही कुवतीबाहेर गेलेय. लिहित गेलो पण माझ्याकडे बॅक अप ठेवलाच नाही.

फोटो पाय्जे आमाला !!!!:दिवा:
त्याला बघुन जिभल्या चाटल्या की तुमच्या हातची रेसेपी खाल्ल्याचा आनंद मिळतो Happy म्हणून !!!

शांकली,

काजूच्या जागी मगज / कलिंगडाच्या बिया वाटून त्याचे गाळून घेतलेले पाणी / कच्चे शेंगदाणे चालतील.
ते पूर्णपणे वगळून दूध पावडर जरा जास्त घेतली तरी चालेल.

वैभव, इथे पालक नाही मिळाला. दुसरी कसलीतरी पालेभाजी वापरून करेन आणि अवश्य फोटो टाकेन.

दिनेशदा, तुमच्या रेसिपिज माझ्यासारख्या kitchen phobic ला पण एक दिवस kitchen मधे ढकलणार नक्की. Happy
कस्लं यम्मी आणि सोपं वाटतं वाचूनच. अर्थात ते वाचणार्‍यांसाठी. त्यामागं तुमचे खूप experiments, passion आणि patience असणार. मस्तच.
btw, आधी मला संशय होता पण आता खात्री आहे की guys are better cooks than girls.. Happy

आजच एका मायबोलीकरणीची मेल आली होती. मी दिलेल्या प्रोत्साहनाने तिने एकटीने २५/३० जणांच्या पार्टीचे जेवण तयार केले. अर्थात माझे फक्त शब्दच, मेहनत आणि श्रेय तिचेच.

आजच एका मायबोलीकरणीची मेल आली होती. मी दिलेल्या प्रोत्साहनाने तिने एकटीने २५/३० जणांच्या पार्टीचे जेवण तयार केले. >>>>>>>>>>>>> ही खरी पावती आहे दा तुम्हाला!! Happy

अरे देवा! एकटीने करायला प्रोत्साहन.. नवर्‍याला मदत तरी करायला लावायची!
अजून बायांचं लक्ष गेलं नाही वाटतं इथं. Wink

ईथे दालचिनी पुड म्हणजे काय वापरलं मंडळी? दाल्चिनी घेऊन तिची पुड केली कि इथे मिळणारी cinnamon powder चालेल? ती जनरली गोड पदार्थांच्या कामाची असते.......

मला ही भाजी इतकी आवड्ते... करायला सोप्पी, चविष्ट आणि कलरफुल. हिरव्या भाजीवर पिवळे कॉर्नचे दाणे.
पाहुणे , पार्टी असली की हमखास. ही एक भाजी नक्की असतेच.

सानुली.. दालचिनी दोन प्रकारची असते. आपल्याकडची जाड मिळते ती खरी दालचिनी नव्हे. पण आपल्याला तिचाच स्वाद आवडतो.
दुसरी असते ती पातळ असून तिची वळकटी असते. गोड पदार्थांसाठी ती वापरतात. आपल्या चवीप्रमाणे कुठलिही वापरली तरी चालेल.

भारतात केली त्यात दोन विघ्न आली....
१. मक्याचे दाणे शिजता शिजेनात...
२. दुधाची पावडर गोड असल्याने भाजी अती गोड जाली..

अमेरिकेत २/३ दा केली.
उत्तम होते, सगळ्याना आवडली.

स्वीट कॉर्न कच्चेही लगेच शिजतात.. काय झालं असेल ?

सानुली, आपली दालचिनी वापरली तर जास्त छान.
भाऊ, तूमचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा.. माझ्या शेजारी वगैरे असता तर मीच पाठवली असती.

मी गेल्या ५ वर्षापासून मायबोलीची नियमित वाचक आहे . आज प्रथमच लिहिते आहे. दिनेशजी मी नेहमी तुमच्या पाककृती करते. घरी सर्वाना आवडतात .

Pages