सार्वजनिक गणपती

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 03:49

sarvajanik ganapati_0.jpg

नमस्कार मंडळी,

गणराज हे उभ्या महाराष्ट्राचं आद्यदैवत.
गणेशभक्त त्याची विविध रंगात आणि विविध ढंगात स्थापना व आराधना करतात. ह्या विविध सार्वजनिक बाप्पांचे, भव्यदिव्य देखाव्यांचे मायबोलीकरांना घरबसल्या 'इ-दर्शन' घडवणे तुमच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही.

मग चला तर मंडळी, लागा कामाला. आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.

त्यासंबधीचे थोडेसे ---

१) त्या त्या गणपतीची माहिती थोडक्यात द्यावी.
२) प्रकाशचित्र आवश्यक आणि ते प्रताधिकार मुक्त असावे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users