आयुष्य संपलं राजे...

Submitted by हर्षल_चव्हाण on 5 September, 2012 - 03:14

वेडं व्हावं, प्रेमात पडावं,
आतल्या आत कुणासाठी तरी झुरावं...
वय निघून गेलं राजे,
आता एकटंच चालंत जावं...

वेळ होती तेव्हा, हिंमत नव्हती,
हिंमत आली त्याला नंतर किंमत नव्हती,
निघून गेलेल्या मुशाफिराच्या आठवणी घेऊन,
फक्त कुढत कुढत जगावं,
वय चाललंच आहे राजे,
आता एकट्यानेच चालावं...

जमून आल्या वेळा तेव्हा जमल्या नाही रेषा,
जवळ असता डोळ्यांची तुज कळली नाही भाषा,
दूर गेल्यानंतर तुजला सुचले नाहीत शब्द,
वाट पाहून; थकून गेली निघून ती; जातांना,
पाऊलखुणा ठेवून गेली; त्यांना पाहतच रहावं,
वय राहिलं नाही राजे,
आता कुठवर आपणही चालावं???

ओले डोळे, दुखरा घसा आणि;
सोनेरी दिवसांची सोबत,
इतक्या शिदोरीवरती बसा दिवस फक्त मोजत...
एक एक क्षण, तीळ-तीळ मरण,
डोळ्यांमध्ये छबी तिची, श्वास घेण्याचे कारण...
आयुष्य संपलं राजे,
निघावं...
------------------------------------------------------------------------------------
हर्षल (५/९/१२ - दु. १२.४०)
------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users