रोज रोज चविष्ट भाज्या काय कराव्यात

Submitted by madevi on 3 September, 2012 - 04:30

रोजच्या जेवनात चविष्ट भाज्या काय कराव्यात ह्याचा विचार करुन डोक्याची पार कढी होते अगदी.
कोणी सुचवाल का रोजच्या लागणारया भाज्याची रेसीपीज्
१० वर्षाचा मुलगा आणि ५ वर्षाची मुलगी जोडीला नवरा सगळ्याना वाटत रोज छान छान भज्या कराव्यात (अर्थात मलाही तसच वाटत )
प्लीज कोणीतरी रेसीपीज् सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीमा, भारतात नाही ना मी ! पण मोठ्या दुकानात मिळायला हवा तो.

माझी वहीनी, चपाती भाजीचा रोल करुन तो झिप लॉक बॅगमधे नेते. ओझे कमी होते आणि मग डबा धुवायची कटकट नसते.

रीमा, D mart, Big Bazar मधे आहेत. ऑन लाईन पण आहेत रु.८०२/- रीहिटिंग ३ डबे. मी फक्त जाहिरात पाहिली. मी भारतात नाहि.

रोजच्या जेवनात चविष्ट भाज्या काय कराव्यात ह्याचा विचार करुन डोक्याची पार कढी होते अगदी.

तीच भुरकायची मग. चविष्टच भाजी हवीय का? नाहीतर ढेमस मिळत त्याला चव नसते ते रोज करता येते.

मा वे वर डॉ ने बंदी आणली आहे. त्यामुळे सध्या थंडगार खाण खात आहे

हे समजलं नाही.
डॉक्टरांनी मायक्रोवेव्ह वापरायला बंदी केली आहे?? का??

नवर्‍याच्या ऑफिसात मावे आहे. त्याला तिथे ठेवायला एक कॉर्निंगवेअरची प्लेट, बाऊल, चमचा (स्टीलचा), पापडाचा पुडा, सुकी चटणी (या वेगवेगळ्या असतात), छोटी बरणी मुरांबा असे देऊन ठेवले आहे. मावेमध्ये घरून नेलेले अन्न गरम करता येते, पापड भाजता येतो. आपल्याला कधितरी बरे वाटत नसल्यास पोळ्या दिल्या की काम होते. यामुळे टपरवेअरमध्ये अन्न गरम करावे लागत नाही. पायरेक्सच्याही छोट्या डब्या देत असते. फक्त प्लेट, बाऊल, चमचा तिथे रोज स्वच्छ करून ठेवावा लागतो. मी एक दिवसाआड हिरवी भाजी व फळभाजी करते. आमटीचेही वेगळाले प्रकार. एक चिंच गुळाची, दुसरी वरणाला मिरच्याची फोडणी व कांदा टोमॅटो घालून, एक पातळ भाजी, कढी, मुगाच्या डाळीची आमटी, पिठले. नाहीतर तेच ते पाहूनही कंटाळा येतो. काल तर कोणतीही डाळ पहायचाही कंटाळा आला म्हणून फ्लॉवर भात केला होता. अठवड्यातून एकदा रात्रीच्या जेवणात डाळ ढोकळी, एकदा मुगाची खिचडी करतेच. एखाद्या दिवशी भाजी कमी पडणार असली तर कोशिंबीर जास्त करते. अठवड्याच्या शेवटी एखादे केळे, एखादे संत्रे, एखादे सफरचंद उरलेले असते. त्याची एकत्रीत कोशिंबीरही करते. मुलांना ती आवडते. Wink पावभाजी हाही एक पर्याय आहे पण नंतरच्या दिवशी सगळ्या भाज्या करून झाल्याचा फील येतो. घरीच राजमे भिजत घालून त्यात कायकाय घालून बर्गर (घरगुती पद्धतिचे) करते. सध्या आमचा मुलगा पास्ता करायला शिकलाय म्हणून आठ पंधरा दिवसातून तो सराव म्हणून पास्ता करतो. त्यानेच केला असल्याने तक्रार करण्यास जागा नसते. Wink

धन्यवाद अंजली. ट्राय करुन बघते.
इल्बीस माझी तब्येत १ महीन्यापुर्वी खुप बिघडली होती. तेव्हापासुन डॉ ने मनाइ केलेली आहे मावे अन्नावर. क्ले अव्हन च अन्न चालत पण ते शक्य नाही.

दिपाली तुझ्या पध्द्तीने काल सिमला मिर्चीची भाजी केली होती मस्त झालेली मुख्य म्हणजे मुलाला खुप आवड्ली

दिनेशदा मझ्यकडे रुचिरा पुस्तक आहे पण मला पुस्तकी भाज्यातरी नको.
तुम्ही भाज्याचे काही यशस्वी प्रयोग केले असतील तर लिहा ना इथे.

मोहिनी डेमस म्हणजे काय ग . तु नेहमी करते का?

नीरजा ते डेमस नाही ढेमसं आहे. मोहीनीला खूपच आवडतं असं दिसतयं.:फिदी: मोहिनी तू तुझी पण पद्धत लिही.

मला नाही आवडत कारण थोडी पाणचट चव असते. त्याला हिंदीत टिंडा असे म्हणतात. रंग पिस्ता, आकाराने गोल.

ते बारीक चिरुन त्याचे तुकडे नेहेमीसारख्या फोडणीत परतायचे, दाण्याचे कुट, मसाला, तिखट, मीठ आणी वरुन चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजी तयार. ते वांग्यासारखे भरुन पण करतात.

http://nishamadhulika.com/sabzi/sabzi_stuffed/bharwa_tinda_recipe.html

ही लिंक बघ कळेल तुला.

निरजा, इथेच बरेच प्रकार आहेत, काही मी लिहिलेले पण.
रुचिरातल्या भाज्या, आणि भाज्यांचे प्रकार अगदी त्यानुसार केल्या तर अप्रतिम होतात, हेही खरेय.

रुचिरातल्या भाज्या, आणि भाज्यांचे प्रकार अगदी त्यानुसार केल्या तर अप्रतिम होतात, हेही खरेय.>>>१००००

रीमा, प्लॅस्टीक डबे वापरू नका... काही कारणासाठी मावे वापरत नसाल तरी प्लॅस्टीक ही नका वापरू.छान काचेचे हवाबंद डबे मिळतात की मॉल मध्ये.(पुण्याच्या आहात का, असलात तर कँपात मिळतात.. दुकानाचे नाव विसरले).

अमा, ठेवत होते. बचपन की बात है. Happy आता नाही. आता लॅपटॉप युजर आहे, त्यामुळे ती सोय डिसकंटिन्यु झाली. शिवाय ऑफिसमधे मावे आहेत.

झंपी बरोबर गं. रीमा, कॅम्पमधे महाराष्ट्र चीप स्टोअर्स किंवा 'हंस'मधे जा. प्रचंड वरायटी आहे.

झंपी आणि मनिमाउ मी मुंबइत रहाते. काचेचे डबे पर्याय चांगला आहे. पण प्रवासात फारच जड आणि जास्त केअरफुल रहाव लागेल ना? ट्रेन चा प्रवास माहीतच असेल तुम्हाला.

कोणि मंगला बर्वे यांच्या पुस्तकातिल रेसिपि लिहल का वेगवेग्ळ्या भाज्या वैगरे
एका भाजीचे अनेक प्रकार.

रीमा, मुंबईत रहाता. ह्म्म..
मला वाटले पुण्यात. कँपात खूप वरायटी आहेत.

रीमा, आजकाल मिळणारे काचेचे डबे इतके जड नाहीयेत. एक डब्याची पिशवी पण मिळते, ते मस्त डबे आत धरून ठेवतात. अश्या बघा मिळतत का मुंबईत..
http://www.google.com/imgres?q=lunch+bags+for+work+in+mumbai&um=1&hl=en&...

मी पण सध्या त्या मिरवणीच्या भाज्या खाऊन बोअर झाले आहे. कधि एकदा महिना संपतोय आणि रोजच जेवण जेवते अस झाल आहे.

तेव्हा आम्ही एका जंगली पद्धतीने जेवण गरम ठेवायचो. भाजी स्टील डब्यात आणायची आणि तो डबा
>> CPU वर ठेवायचा.>> महान वापर Happy

जागुशी सहमत ( मी नाही) आमच्या घरातील बाकी पुरुष मंडळी.:डोमा: कारण श्रावण आणी अधिक त्याबरोबर येणारे गणपती त्यामुळे नॉनव्हेज संपुर्ण बंद.:फिदी: मी शाकाहारी त्यामुळे बारा महिने तिन्ही त्रिकाळ वनली व्हेज.

टुनटुन , जागू गोड कारणामुळे मिरवणी म्हणजे मिरचीचे तिखट न वापरता मिर्याचे तिखट घालून केलेल्या भाज्या खातेय सध्या. Happy
पुरूष मंडळिना हा अनुभाव या जन्मात तरी येणार नाही. Wink

पुरूष मंडळिना हा अनुभाव या जन्मात तरी येणार नाही. >> आं, मेथीचे / डिंकाचे लाडु आवडीने खाणारे आहेत . ते खाल्लेलं चालतं तर पुरुषांनी पण महिनाभर मिरवणी खायला काय हरकत नाही. नाहीतरी सिम्पथी प्रेग्नंसी म्हणत १०-१२ किलो वजन वाढतच असतं बर्‍याच लोकांचं Happy

पुस्तकातील पाककृती कृपया इथे लिहू नये. प्रताधिकाराचा प्रश्न येइल. आपल्याला माहीत नसेल म्हणून लिहीले आहे. खरेदीविभागात असेल तर पुस्तक घेता येइल.

Pages