रोज रोज चविष्ट भाज्या काय कराव्यात

Submitted by madevi on 3 September, 2012 - 04:30

रोजच्या जेवनात चविष्ट भाज्या काय कराव्यात ह्याचा विचार करुन डोक्याची पार कढी होते अगदी.
कोणी सुचवाल का रोजच्या लागणारया भाज्याची रेसीपीज्
१० वर्षाचा मुलगा आणि ५ वर्षाची मुलगी जोडीला नवरा सगळ्याना वाटत रोज छान छान भज्या कराव्यात (अर्थात मलाही तसच वाटत )
प्लीज कोणीतरी रेसीपीज् सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. चांगला धागा. रोज भाजी आणायला गेले की भाजीवाल्याकडे त्याच त्याच भाज्या पाहून वीट येतो.
वांगी, कोबी, भेंडी, दोडका, टोमॅटो, दुधी.......बा.....स.
खरंच ह्यातून कोणी काही इंटरेस्टींग बनवत असेल तर सांगा.
मी शोधलेला उपाय.
२ दिवस उसळ + कोशिंबीर
२ दिवस पराठे + कोशिंबीर
३ दिवस भाजी + आमटी (आलटून पालटून नेहमीच्या यशस्वी भाज्या वापरून) Happy

निरजा आणि सुमेधा... खरं तर नेहमीच्या भाज्या पण जरा वेगळ्या पद्धतीने करुन बघितल्या, तर चवीत, रंगरुपात
फार फरक पडतो. मला कधी कधी तर कोबी सप्ताह साजरा करावा लागतो, पण मी एक भाजी महिनाभर तरी परत
( रिपिट ) करत नाही.

कोबीचेच किती प्रकार करता येतात ते बघा..~~

१) चण्याची डाळ घालून
२) उडीद आणि लाल मिरच्या फोडणीला
३) गुजराथी पद्धतीने, अर्धी कच्ची, लिंबू पिळून
४) भानोले
५) हिरवे वाटाणे, हिरवी मिरची
६) दह्यातली कोशिंबीर
७) कोबी डोलमा (भात, बडीशेप घालून)
८) फ्रेंच व्हीनिग्रेट घालून, कोशिंबीर
९) तूरीची डाळ घालून, घोटून
१०) कोबी / बटाटा + मसाल्याची
११) कोबीची रबडी
१२) कोबीचे पराठे

मंगला बर्वे यांच मेजवानी पुस्तक, अशा वेगवेगळ्या पकारांचे संकलन आहे, शिवाय मायबोली आहेच.

पालक
१. पीठ पेरून
२. मुगाची डाळ घालून
३. ताकातला पालक
४. पालक कॉर्न बेक
५. दाल पालक

दुधी
१. चण्याची डाळ घालून
२. दुधी कोफ्ते
३. दुधी मुठीया
अजून आठ्वले की लिहीन

दिनेश्दा,दीप्,अवल खुप छान माहिती सुचवलीत पण मला काय वाटत आपण रोजचा किवा पाच दिवसाचा मेन्यु (भाज्याचा)
टरवला तर ....

आज माझ्याघरी सिमला मिर्ची आणि दुधी आहे. नेहमी मी सिमला मिर्ची ,दुधी डाळ घालुन/ बेसन पीथ घालुन करते
नविन पध्द्तीने कोणाला माहित आहे का?
मुलाला आवडायला हवी
मला उद्या करयची आहे.सुचवा ना प्लीज

पाकृ टाळूनच पुढे जातो नेहमी पण शीर्षकाने लक्ष वेधून घेतलं.

हा प्रश्न हॉटेलवाल्यांनाही पडला असावा असं वाटतंय. कुठल्याही हॉटेलात जा मेन्यूवरून भाजी ओळखता येत नाही. पूर्वी जसे पालक पनीर, मटर पनीर, आलू मटर, भेंडी मसाला असे भाजीच्या नावावरून जिन्नस असत त्याच्या जागी मिक्स भाज्यांची पद्धत आलीय. नावं वेगवेगळी पण भाजी तीच मिळते. एखाद्या ठिकाणी व्हेज ६४ या नावाने डिश ऑर्डर केली कि त्याच त्या मिक्स भाज्या व्हेज ६४ च्या मसाल्यात डुबवून मिळतात. मिक्स व्हेज कोल्हापुरी मागितलं कि मसाला वेगळा, नवरतन, व्हेज मोगलाई, राजस्थानी मिक्स व्हेज...काहीही मागा. पत्ताच लागत नाही काय खाल्लं ते.

सिमला मिर्ची कापुन घ्या, कांदा , टोमॅटो बारीक चिरुन फोडणी घाला , मिर्ची घाला वरुन तिखट/ हिरवी मिर्ची घाला. मीठ, हळद, दाण्याचे कुट घालुन वाफवुन घ्या. >> साबा असं करतात.. आता माझी पण तीच पध्दत.

सिमलामिरची ची पिझ्झा भाजी हा एक आमचा आवडता प्रकार
कांदा, टोमॅटो तेलावर परतायच आणि मग सिमलामिरची बारीक चिरून घालायची, शिजली की मीठ, बेताचे तिखट, थोडी साखर आणि मिश्र हर्ब झाली तयार ! मस्त लागते.

किरण, परत इथे फिरकणार का ते माहित नाही, पण सध्या हॉटेल्स्मधे ग्रेव्हीज तयार ठेवायची पद्धत आहे.
खुपदा फ्रोझनही असतात. शिवाय काही कॉमन भाज्या, उकडून तयार असतात. ऑर्डर आल्यावर, त्या भाज्या
त्या त्या गेव्हीत घालून शिजवून देतात.
नावावरुन मिळणार्‍या भाज्याही असाव्यात. नेहमी मागणी असणार्‍या भाज्याच, अशा तयार ठेवल्या जातात.

पण मिक्स कोल्हापुरी, मिक्स जयपुरी, व्हेज ६४ अशी सबगोलंकार नावे, सर्व भाज्या मिळून करता याव्यात, याच हेतूने दिलेल्या असतात. खुपदा जी गेव्ही अगदी मॅश केलेली असते, त्यात सहसा न खाल्ल्या जाणार्‍या भाज्या असतात. (पडवळ, लाल भोपळा, कोहळा वगैरे )

दिनेशदा

या बाफमुळे आताच एका प्रसिद्ध हॉटेलव्यावसायिकाला ही शंका विचारली. त्यांनी सांगितलं कि सध्या भाज्या मिळणे/ मिळवणे हे अवघड होत चाललंय. म्हणूनच मेन्यु कार्डेच नवी बनवलीत सर्वांनी. बरेचदा स्पेसिफिक भाजी मागितली कि ती भाजी नाहीये हे सांगणं रिस्की असतं. काही वेळा ग्राहक समंजस असतं, तर काही उठून जाणारेही असतात. म्हणून ही क्लृप्ती !

शिवाय काही कॉमन भाज्या, उकडून तयार असतात. ऑर्डर आल्यावर, त्या भाज्या
त्या त्या गेव्हीत घालून शिजवून देतात.>
मी एका हॉटेलच्या मागच्या बाजुने दुसर्‍या ऑफीसला जात होते. तर तिथे वेगवेगळ्या मोठ्या चाळण्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्या उकडुन ठेवलेल्यात. आणि बाहेरच मिक्सर वर ग्रेव्ही बनवण चालु होत.

भला मोठा मेन्यू आपल्याकडचीच खासियत दिसतेय.
स्विस किंवा नायजेरियातही, आजचे ताजे पदार्थ म्हणून २/३ पदार्थच दिलेले असतात. केनयात मात्र आपल्यासारखाच मोठा मेन्यू असतो. पण तिथे निव्वळ भजी विकणारी पण दुकाने आहेत.

रीमा, हॉटेलचे किचन कधीही बघू नये !

खरच रोज डबा काय करवा हा रोजचा मोठा प्रश्न्न पडतो.
नवरयाला सुकि भाजि चालत नाहि का तर सुका घास उतरत नहि,
कड्धान्य आवडत नाहि करायचे तरि काय

सुशांत, वाचली जाहिरात.

रावी रोजच्या डब्याचा पण एक बीबी होता. रोज रोज चपाती भाजी करण्यापेक्षा, वन डिश मिलचे अनेक पर्याय असतात. ते होतातही पटकन आणि त्याचा कंटाळा येत नाही. हवाबंद डबे वापरले तर ग्रेव्हीवाले पदार्थही देता येतात. अन्न बराचवेळ गरम राहील / किंवा करता येईल, असेही डबे मिळतात आता. आठवड्यातून एक दिवस,
हक्काने डब्याला रजा द्यायची आणि बाहेरचे खायचे... याने विश्रांती तर मिळतेच शिवाय घरच्या अन्नाचे महत्व आणि मोलही कळते.

हॉटेलचे किचन कधीही बघू नये ! Lol

बालगंधर्वच्या परिसरात अशी काही हॉटेल्स आहेत ज्यांच्या वरच्या मजल्यावरच्या ऑफीसेसमधे मागच्या बाजूने जावं लागतं.

कुणालाही दुखवायचा हेतू नाही. पण जे डबा घेऊन जातात त्यांनी पण फार चिकित्सक असू नये. काही भाज्या आवडत नाहीत वगैरे मान्य आहे. पण डबा करणारीची पण सोय पाहिली पाहिजे. हल्ली अन्न गरम रहाणारे, हवाबंद डबे असतात. आणि त्यात पोळी-भाजी ताजी, गरम रहाते. सहसा आठवड्याला भाज्या रीपीट होतच नाहीत. शिवाय एक भाजी दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारात करता येतेच. फळभाजी, पालेभाजी, उसळी, पिठलं, डाळ-कांदा असे विविध प्रकार असतातच. तेव्हा डब्यात तेचतेच खातोय असं काही होत नाही. त्याबरोबर शक्य असेल तर थोडं सलाड, फळं द्यावीत किंवा ताक/दही. फक्त जी भाजी कराल ती सकाळ-संध्याकाळच्या जेवणात नसावी एवढं बघायचं.
पोळीभाजी नको असेल तर वरती दिनेशदांनी लिहिलंय त्याप्रमाणे वन डीश मील पण मस्त ऑप्शन आहे.

मी डबा नेणारी आणि नियमितपणे करणारी या दोन्ही भूमिकेतून लिहिलंय.

हो दिनेशदा अगदी खर. पण अगदी समोरच ठेवलेल असल्याने लक्ष गेलच.

हल्ली अन्न गरम रहाणारे, हवाबंद डबे असतात. आणि त्यात पोळी-भाजी ताजी, गरम रहाते. >>
असा कोणत्या ब्रँड चा चांगला डबा मिळतो. कुठे मिळतो? मा वे वर डॉ ने बंदी आणली आहे. त्यामुळे सध्या थंडगार खाण खात आहे. इथे विषय बदलेल म्हणुन योग्य बिबी वर टाकलात तरी चालेल.

हो वरदा, मी आता डबा नेत नाही, कारण ऑफिसमधेच पण स्थानिक जेवण असते. अजिबात मसाले नसतात त्यात, आणि बदल म्हणून मला आवडतेय. स्वतःला हवे तसे पदार्थ, मी घरी करतोच.

रीमा, मला वाटते मिल्टनचे आहेत असे डबे. मी एक डबा बघितला होता, त्यालाच वायर होती. जेवायच्या आधी १०/१५ मिनिटे ती जोडली, कि सगळा डबाच गरम होतो.

पण मला स्वतःला कधीकधी, थंड पदार्थ आवडतात. दहीभात, खमंग काकडी मला थंडच आवडतात. गाजर हलवा, दुधी हलवा, खिरी पण मला थंडच आवडतात. त्यामूळे हे सर्व, ऑफिसमधल्या फ्रिजमधे ठेवत असे.

पापड वगैरे भाजून नेले तर त्यासाठी आणखी वेगळा डबा. ताजी लोणची आणि कोरड्या चटण्या, ओफिसमधेच ठेवलेल्या असत. कोरड्या चटण्यांमधे लसणाची / कढीपत्त्याची / कारळाची / दाण्याची / तिळाची असे अनेक पर्याय आहेत. त्यातली अगदी चमचाभर घेतली, तरी जेवणाला लज्जत येते.

मी ज्यावेळी डबा नेत होतो त्यावेळी तो ३ कप्प्याचा असायचा. चपाती / डाळ / भाजी (भात मी खात नसे.) शिवाय एक वेगळा डबा जो खिर / सलाद / दही साठी. अनेकजण ताक बाटलीतून नेतात. त्यातही पुदीना / आले घातले असेल, तर उत्तमच. आता असे सगळे हवे तर, डबाही थोडा मोठा असणारच !

( बाहेरदेशात घर ते ऑफिस अशी गाडीच असल्याने हे सहज शक्य असते. मुंबईत आणि तेही सार्वजनिक
वाहनाने प्रवास करताना, याचा थोडा त्रास होणारच. )

अरेच्चा हाच प्रश्न आपल्या आईलाही पडलेला असायचा.:) पण आता नवनविन भाज्या कॉमनली अ‍ॅवेलेबल आहेत आणि सगळ्यांना चांगल्या माहित आहेत. जरा महाग पडतात, पण तरीही विकली मेन्युमधे लिस्ट करायला हरकत नसावी. त्याच त्याच भाज्या खावुन कंटाळा आला म्हणजे हॉटेलमधे खाल्लं जातं. त्यापेक्षा या भाज्या स्वस्तच पडतील. Happy

बेबी कॉर्न-बटाटा, बेबी कॉर्न-मटर, बेबी कॉर्न-कांदा टोमॅटो ग्रेवी
मश्रुम- मटर, ऑलिव ऑइलमधे लसुण मिरची फोडणी घालुन केलेले मश्रुम, मश्रुम इन 'मॅगी भुना' ग्रेवी
कोबीची भाजी फार बकवास लागते, पण कॅबेज्/कॅरट पराठे महायम्मी असतात. शिवाय भाजी आणि पोळी वेगवेगळं बनवायचा वैताग/वेळ वाचतो.
पनीर्-मटर, पनीर भुर्जी, चिली पनीर, ग्रेवी पनीर, पनीर पराठा
बेबी पोटॅटोज - चिक्कार कॉम्बीनेशन्सने बनवता येतो.
टिंडा, परवल (पडवळ नाही) आता आपल्याकडे सहज मिळतात. वेगळी भाजी म्हणुन घरी आवडायलाही हरकत नाही.

नेहमीचे केप्र, प्रविण आणि एवरेस्ट सोडुन हल्ली MTR, परंपरा, संजीव कपुर, मंगल, शान असे मसाले पण आहेत. तीच भाजी फक्त मसाला बदलला तरी एवढी वेगळी आणि इंटरेस्टिंग होते. ट्राय करा. Happy

रीमा, हवाबंद डबा ( लिक्विड पदार्थ नेण्यासाठी) फक्त लॉक & लॉक. अगदी एक थेंबही बाहेर येत नाही. मी भाजीचा डबा दर वर्षी बदलते कारण तो मावेमधे डायरेक्ट ठेवुन त्यात भाजी गरम केल्यामुळे तो पिवळा पडतो. शेवटी प्लास्टीकच त्यामुळे तो दरवर्षी बदलणं चांगलंच. अगदी गरम नाही रहात, पण वॉर्म फुड साठी मिल्टनचा डबा चांगला. माझ्या पहिल्या जॉबमधे, आम्ही जेव्हा डेस्कटॉप युजर्स होतो आणि ऑफिसमधे मावे नव्हता, तेव्हा आम्ही एका जंगली पद्धतीने जेवण गरम ठेवायचो. भाजी स्टील डब्यात आणायची आणि तो डबा CPU वर ठेवायचा. दुपारी जेवताना, गरमागरम भाजी. Happy

भाजी स्टील डब्यात आणायची आणि तो डबा CPU वर ठेवायचा. दुपारी जेवताना, गरमागरम भाजी>>
मस्त आयडीया.
पण जोक्स अपार्ट तु म्हटल्याप्रमाणे प्लास्टीकचे डबे खरच पिवळे पडतात शिवाय त्याला त्या त्या भाजीचा वास चिकटुन रहातो. मग तो टपरवेअर असो किंवा लॉक अँड लॉक किंवा इतर कोणताही ब्रँड. मी पण भाजी सध्या स्टीलच्याच डब्यात आणते.
दिनेशदा मी पण मिल्टनच्या डब्ब्याच्या शोधात आहे. पण हल्ली तो पण मिळत नाही. तुम्ही सांगु शकाल कुठे मिळेल तो??

<रोजच्या जेवनात चविष्ट भाज्या काय कराव्यात ह्याचा विचार करुन डोक्याची पार कढी होते अगदी.>
हे आवडले. तुम्हाला सगळे पदार्थ चविष्टच लागत असणार हे कळले. Lol

Pages