तंदूरी चिकन

Submitted by अवल on 3 September, 2012 - 03:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन १ किलो
वाटणासाठी :
आलं १ इंच
लसून २०-२५ पाकळ्या
मिरच्या ४
हळद १ चमचा
तिखट २ चमचे
मीठ १ चमचा
लवंग ४
दालचिनी मोठे ५-६ तुकडे ( हे जास्तच हवेत)
मीरे ५-६
खसखस १ चमचा
धणे १ चमचा
बडिशेप १ चमचा
शहाजिरे १ चमचा
दही पाव किलो
लाल रंग २ चिमुट ( ऑप्शनल पण मजा आणणारा )
ओवा ( ऑप्शनल, कधी घाला कधी घालू नका, जरा व्हरायटी )
सजावटीसाठी :
लिंबू हवे असल्यास वरून
२ कांदे उभे चिरून व्हिनिगार, मीठ घालून + थोडा उभा- पांतळ चिरलेला कोबी

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. सर्व तुकड्यांना सुरीने मध्ये मध्ये हाडापर्यंत छेद द्यावेत. सर्व फ्रिजमध्ये ठेवावे. (फ्रिजर नाही)
वाटणासाठीचे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटुन घ्यावेत. खसखस वाटायला जरा वेळ लागतो. त्यामुळे जरा जास्त वेळ फिरवावे.
आता हे सगळे वाटण चिकनला चोळावे. छेद दिलेल्या ठिकाणी आत पर्यंत जाईल असे पहावे. हे सर्व फ्रिजमध्ये ६-८ तास ठेवावे.

ओव्हन १५० तपमानाला ५-७ मिनिटे प्रिहिट करत ठेवा. आता प्रत्येक तुकडा फॉईलमध्ये गुंडाळून ट्रे मध्ये ठेवा. आता ओव्हनमध्ये १५० तापमानावर साधारण २० मिनिटे शिजवा.
वाढताना प्रत्येक तुकडा फॉईलमधून काढून त्यावर १ छोटा चमचा ( भातुकलीतला) अमूल बटर टाकून चिमट्यात पकडून गॅसवर धरा. मस्त धूर झाला, तुकडा जळकट दिसायला लागला की ताटलीत घ्या. सोबत लिंबू, कांदा घ्या, फस्त करा Happy

वाढणी/प्रमाण: 
माझा लेक अन त्याचे तीन दोस्त फस्त करतात. पण किमान सहा जणांना पुरावी.
अधिक टिपा: 

१. मॅरिनेट करण्यासाठीचा वेळ यात धरलेला नाही
२. चिकन बाहेर ठेवणार असाल तर ४ तास ठेवावे. भारतात शक्यतो बाहेर ठेऊ नये. हवा बदलती असल्याने उगाच टेन्शन नको. मी शक्यतो रात्री लावून फ्रिजमध्ये टाकते. दुसर्‍या दिवशी ९ वाजता बाहेर काढून १२ वाजता करायला घेते.
३. फॉईलमध्ये गुंडाळल्या मुळे चिकन सुके होत नाही, रबरीही होत नाही.
४. दही घातलेले असल्याने लिंबू वरून पिळताना सांभाळून. दही किती आंबट आहे याचा अंदाज येत नाही, म्हणून.
५. हे सर्व प्रमाण झणझणीत खाणा-यांसाठी आहे, कृपया नोंद घ्यावी. त्यातून कोणी हे लक्षात न घेता केले अन तिखट लागले तर मला फोन करावा. मी अन माझा लेक हाजीर होऊ Proud
६. माझ्याकडे हॉकिन्सचे इन्फ्रामॅटिक्स असल्याने त्यात फार भारी अन भराभर होते तंदुरी Happy

माहितीचा स्रोत: 
फार फार पूर्वी एका ढाब्यावरचे खाऊन त्याची चव आठवून आठवून तयार केलेली माझीच पाककृती :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाल रंग म्हनजे कोणता. ब्र्यान्ड बिन्ड सांगा बुवा. नाहीतर भलताच टॉक्सिक कलर यायचा.

बाजो ब्रँडची गरज नाही. खुठल्याही किराणा मालाच्या दुकाणात मिळेल. पावडर स्वरुपात मिळतात हे फुड कलर Happy

अवल, धाड पडायची हो, घरी खवैयांची.

बाजो, कुठलाही प्रमाणित खाद्यरंग चालेल. चांगल्या कंपनीचा घ्यायचा.
अशा प्रकारांसाठी बिक्सा अनोटा ( म्हणजे कोकणातील कुंकवाचे झाड ) किंवा रतनज्योत ( यावर बरीच चर्चा आहे मायबोलीवर. पातळ दालचिनीसारखे असते, याला फक्त रंग असतो, स्वाद नसतो) वापरतात.

दिनेशदा, Biggrin मला तीच भीती वाटतेय.
आता रविवारी सा-या घरालाच बुरखा घालावा म्हणते Proud की त्या मुळेच ओळखतील सारे Uhoh Happy

अवल, बुरखा घालण्यापेक्षा घराच्या मापाचा इन्व्हिजिबिलिटी क्लोक मिळाला घाल घराला Wink सॉरी, अवांतर प्रतिसाद

अहो टकाटक, मान्य आहे मला की हे चिकन टकाटक आहे पण म्हणुन हा अशी रिक्षा Uhoh
अमि फोटोसाठी रविवार पर्यंत थांबा Happy

एक नंबर....अवल अशी रेसिपी नुसती वाचण्यात मज्जा नाही. गटग ठरवा कुणीतरी पट्कन >> Tharawa bara..

mi ravivarchi wat pahatoy.. Happy

दिलेल्या शब्दाला जागून Happy
व्हेजवाल्यांना फोटो त्रासदायक वाटू शकतात, क्षमस्व.
छेद दिलेले लेग पिसेस
1347206388361.jpg

वाटण
1347206752655.jpg

वाटण चोळलेले चिकन
1347206783401.jpg

इन्फ्रामॅटिक्स मध्ये भाजले जाताना
xxxxxxxxxxxxxx.jpg

तयार तंदूरी चिकन
1347206874831.jpg

Pages