नैवेद्यम् समर्पयामि!!!

Submitted by संयोजक on 1 September, 2012 - 14:14

Naivedya_2_1.jpg

तुंदिलतनू, लंबोदर आणि त्यात लाडका..अशा सर्वेशा साठी नैवेद्य करायचा या कल्पनेनीच उत्साहाचं भरतं येतं. तसंच निमीत्तांची सुध्दा किती विविधता... कूळाचार, रितीरिवाज, यांचा आगळा, त्यांचा वेगळा, घरची पद्धत, गावची पद्धत, हा या राज्याचा विशेष, तो त्या देशाचा खास, हे पंचखाद्य, ती मोदकांची रास, ही आज्जीची खासियत...हा पहिल्या दिवसाचा, हा गौरींबरोबरचा, ही बाप्पाला निरोपाची शिदोरी...

देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं... नव्हे, आमचा आग्रहच आहे तसा.
नैवेद्याची प्रकाशचित्रे, खास आठवणी इथे प्रतिसादात भरभरून द्या. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतीच्या धाग्यावरच टाका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमच्या बाप्पाचा नैवेद्य.
टीव्हीवर चॉकलेटचे सारण भरून केलेले आणि तुपात तळलेले मोदक दाखवले होते. ते लगेच केले.
हे आधी नुसते सारण भरून ठेवलेले मोदक

Photo0367.jpg

हे तळल्यानंतरचे

Photo0372.jpg

छान छान आहेत सर्वांचेच मोदक. भूक चाळवली आणि स्वतः मेल्याखेरीज स्वर्ग नाही..या विकांताला काही तजवीज करावी लागेल..

लाजोचं चांदी कलेक्शन खूप सुरेख आहे आणि त्यातल्या पदार्थामूळे तर आणखी छान दिसतंय...लाजवाब लाजो Happy

रुतू अगं पाच मोदक पाहून खपले.. एकवीस पाहायला येणारच नाही..;)

शुम्पी तुझे मोदक इतके एकसारखे आहेत नं...भारीच निगुतीने केलेत..मस्त गं.....:) या छोट्या साच्याची साइज वगैरे असते का विकत घेताना? माझ्याकडे एक मोठा साचा आहे आईने आणलेला, त्याने जर मोदक करायचं ठरवलं तर दोन तीनच होतील मला वाटतं...:P

सगळ्यांचंच कौतुक वाटतंय खूप.... Happy वॉव (हे वाक्य मुद्दाम सर्व नावं लिहिता येत नाहीयेत म्हणून आवर्जून लिहितेय Happy )

गौरींच्या पाठवणीच्या पाटवड्या

patvadya.jpg

जाताना गौर मुरडून बघते म्हणून मुरडीच्या करंज्या आणि बाप्पासाठी विसर्जनादिवशी उकडीचे मोदक

modak_1.jpg

मुरडीच्या करंज्या मातोश्रींच्या हातच्या आणि उमो मी केलेत Happy

श्रद्धा, दुरंगी मुदा पाडणे हे भारी वेळखाऊ आणि चिकाटीचे काम आहे. मस्त दिसताहेत बर्फ्या!!

केदार२०, नैवेद्याचे पान खाणार्‍याची मजा आहे बुवा, डायरेक पाच पुपो!! Wink

सर्वांचे नैवेद्य मस्तच .
मंजूडी > गौरींच्या पाठवणीला पाटवड्या करतात का ? जेवताना की बरोबर शिदोरी म्हणून ?

काय तों पा सो नैवेद्य आहेत सगळ्यांचे! मोदक, नारळाची बर्फी आणि केळ्याच्या पानांवरचे साग्रसंगीत नैवेद्य फारच मस्त!

काय तों पा सो नैवेद्य आहेत सगळ्यांचे! मोदक, नारळाची बर्फी आणि केळ्याच्या पानांवरचे साग्रसंगीत नैवेद्य फारच मस्त! >> +१
चांदीच्या ताटातले आणि केळ्याच्या पानावरचे, दोन्हीही प्रसाद तेवढेच देखणे!! Happy

बाप्पा कुठे एवढा खाऊ खाणार आहे, आम्हाला वाटून टाका बघू >> एक्झॅक्ट्ली!! Happy
संयोजक ह्यावर पण उपाय शोधा प्लीssssज Wink

ती बर्फी कशी बनवली(नारळाची)?

पुपो एकदम छान मउसुत वाटताहेत.

क्या बात है! आर्च, नंदिनी ( मावशींचे मोदक झ्याक ), लाजो, मंजुडी खूप छान. शुंपी आणी स्वस्ती खूपच छान. श्रद्धा नारळ बर्फी काय सॉल्लिड दिसतीय, खाऊ का?

लाजोचे प्रत्येक कलेक्शन डोळ्याचे पारणेच फेडते. गौरीपुजनाच नैवैद्य केळीच्या सुबक पानावर, मस्तच!

Pages