तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?

Submitted by सतीश देवपूरकर on 1 September, 2012 - 02:53

गझल
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!

साद वा-याने दिलेली वाटते तितकी न साधी;
ती तुला पाहून त्याने घातलेली शीळ आहे!

कोण हे सांगेल त्याला? ठेच त्याचा तोच खातो!
तोच वाटेतील त्याच्या एक मोठी खीळ आहे!!

कावळे संतापले अन् काय लालीलाल झाले!
ज्या क्षणी त्यांना कळाले....एक मी कोकीळ आहे!!

रंगलो आपादमस्तक मी तुझ्या रंगात पुरता!
होय, प्रेमाची मलाही जाहली कावीळ आहे!!

मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप :-
आता मराठीत सांगतो......
प्रोफेसर साहेब,

"चावू नका!!"

देवपूरकर :-
<<<<<< तुझे अर्धमराठीतील सांगणे पोचले! संबोधनात, प्रोफेसरला मराठी शब्द सुचला नाही का? Rofl

रसप काय हे?...... Biggrin

टीप: अजिबात हलके घेवू नकोस!
...........प्रा.सतीश देवपूरकर>>>>>>>>>>

हो हो नक्की!!
धन्यवाद .........

रणजित :प्राध्यापक महोदय कृपया चावा घेवू नका ...........असे मराठीत म्हणावे लागेल

याचा सम्बन्ध भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीशी असण्याचा सम्भव आहे !!

तमाम रसिक वाचक मान्यवरांना
आश्चर्यम.......!

का रे बदीउज्जमा बिराजदार शाबिर सोलापूरी? तुला काय आश्चर्य वाटले आता? चोर्‍यामार्‍या होत नाहीत असे एक तरी फील्ड राहिले आहे का? तू का घुसलास चर्चेत मधेच? लिटल जिमी, हे साबिर मामा बरं का? हे मांडवलीकिंग आहेत.

प्रा.सतीश देवपूरकर हे एक उत्तम गझलकार आहेत यात काडीमात्र शंका नाही.

लाल कावळे पाहिले आहेस काय कधी साबिरमामा तू? लाल कावळे असतात देवमामांच्या गझलेत. उद्या निळी हरण येतील, परवा पिवळा हत्ती येईल.

सरांवर चौर्यकर्माचा आरोप सर्वथा गैर आहे.सर्वांनी लक्षात ठेवा..

आमच आम्ही बघू

प्रा.सतीश देवपूरकर हे प्रत्येक शेर चिंतन करूनच लिहितात.

चिंतन केल्यावर पशूपक्ष्यांचे रंग बदलतात वाटत. केशरी घोडे, जांभळ्या चिमण्या.

उगाच काय भांडतोस तू? सप्तरंगी काचांचा गॉगल घालून सभोवताली पाहिल्यावर अकाली नाचणारे मोर, लाल रंगाचे कावळे आणि उंदराच्या बिळात लपून बसलेली मांजरे दिसू लागतात. मग यमक जुळली की झाली अ‍ॅनिमेटेड कविता. हाकानाका.

Pages