Submitted by सतीश देवपूरकर on 1 September, 2012 - 02:53
गझल
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!
साद वा-याने दिलेली वाटते तितकी न साधी;
ती तुला पाहून त्याने घातलेली शीळ आहे!
कोण हे सांगेल त्याला? ठेच त्याचा तोच खातो!
तोच वाटेतील त्याच्या एक मोठी खीळ आहे!!
कावळे संतापले अन् काय लालीलाल झाले!
ज्या क्षणी त्यांना कळाले....एक मी कोकीळ आहे!!
रंगलो आपादमस्तक मी तुझ्या रंगात पुरता!
होय, प्रेमाची मलाही जाहली कावीळ आहे!!
मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
प्रा.साहेब आपण करत आहात हा
प्रा.साहेब आपण करत आहात हा तद्दन फालतूपणा आहे फालतूपणा !!!!!
मला फार राग आला आहे तुमचा व्यक्त करून दाखवता येत नाहीये नाइलाज आहे ..................क्षमस्व!!
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!
मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!
सुंदर.
बा वैभवा, आज शिक्षकदिन
बा वैभवा, आज शिक्षकदिन असल्यामुळे तू मोठमोठ्या प्रतिसादासारखे मोठेमोठे नि:श्वास टाकून राग व्यक्त करू नकोस. निदान निरोपसमारंभापर्यंत तरी निवृत्त होणार्या व्यक्तीबद्दल आपत्तीजनक बोलू नये. प्रोफेसरसाहेब हे हाडाचे शिक्षक, गांधीवादी व दोन गोष्टी त्यांच्यातल्या सोडल्या तर अहिंसक आहेत. त्या म्हणजे 'हाडाचे' आणि 'वादी' हे आहेत. त्यामुळे ते अत्यंत सौम्यपणे आपली बाजू मांडत आहेत. स्कॅनर बिघडल्यामुळे (की विदेशी शक्तींनी बिघडवल्यामुळे?..मायबोलीन चौकशी झालीच पाहीजे) ते शांत आहेत; नाहीतर आतापर्यंत त्यांनी अशा कित्येक बिनमिशांच्या चेहर्यांवर ती नोंद फेकून मारली असती. मी तर म्हणतो की कैलासरावांना १५ वर्षांच्या 'सर्जन'शील तपश्चर्येनंतर तसेच काफिये व तशाच उपमा सुचणे हा केवळ योगायोग आहे. ताजमहाल हा आधी तेजोमहाल होता अशी 'उलटी' माहिती पुण्याच्या 'ओक'साहेबांनीही टाकली होती. तद्वतच ही गझल प्रोफेसरसाहेबांचीच ओरिजिनल आहे. मी स्वतः यू. जी. सी. च्या अॅन्युअल जर्नल १९९५ मधे(वाचा प्रोफे. चो. र. भुरटे वि. डाकू सरकार उच्च अन्यायालय पॅरीटी केसलॉ निकाल) मधे वाचून अशाप्रकारच्या घटनांची खात्री केली आहे.
त्यामुळेच प्रोफेसरसाहेब मनापासून रोज रसप घेत आहेत. रसप यावर ते मनापासून प्रेम करतात. येथे रसप म्हणजे 'रक्षात्मक सनदशीर पवित्रा' असे धरावे. नतद्रष्टांनी भलत्या शंकेच्या अळ्या आपल्या अंड्याएव्हढ्या मेंदूतून काढू नयेत.
असो. येथे साक्षात मोहिनीअवतार अवतीर्ण झाल्यामुळे बहुतेक वखवखलेले डू आयडी आता खवखवले होउन आपापल्या पारंपारिक गझलपाडू धंद्याकडे परतले असून 'पवारांच्या पॉवर'ला धास्तावलेले आहेत. मात्र यावेळेसचा मोहिनीअवतार हा जोडअवतार असून लिटिल जिमी नामक 'चारोळी'सदृष्य सहचार्यासोबत मुख्य अवताराचा 'वेगळ्या' पातळीवरून संवाद होत असतो.
असो...प्रोफे. साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याच काफियावरून आम्हीही काही लिहू इच्छितो..
बिघडलेल्या स्कॅनराच्या अंतरंगी
काय होते? भेटणे दुर्मिळ आहे
'वरून' येते गझल वेगे, via आग्रा
जिस्म-२ चे 'जिस्म'वर्धक रीळ आहे?
डायरीतील नोंद गेली का? कुठे ती?
की जशी 'मनमोहनी' गुपचीळ आहे?
हे निळे आकाश येथे भासते; की
तू दिली लेंग्यास माझ्या नीळ आहे?
हा माझा शेवटचा गोंद....यापुढे मी नसेन!
हे निळे आकाश येथे भासते;
हे निळे आकाश येथे भासते; की
तू दिली लेंग्यास माझ्या नीळ आहे?
आम्हाला पाचारण करण्यात आले
आम्हाला पाचारण करण्यात आले म्हणून आलो. पण येथील चर्चा पाहून अवाक होऊन आम्ही नुसतेच वाचत आहोत.
कळावे
गंभीर समीक्षक
गंगाधर , गुरुजी आणि गंभीर. ग
गंगाधर , गुरुजी आणि गंभीर. ग ची बाधा झालेली तीन माणस इथे का धुडगुस घालत आहेत? मुटे आजोबांना नमस्कार कर लिटल जिमी.
वैवकु! मी करत आहे तो तद्दन
वैवकु!
मी करत आहे तो तद्दन फालतूपणा आणि तू कावळ्याने काय लिंक दिली त्यावर जे तुझ्या दुबळ्या तर्काचे तारे तोडले होतेस, तो काय तद्दन सुज्ञपणा, शहाणपणा की दीडशहाणपणा होता? एकीकडे दांभिक माफी मागतोस, दुसरीकडे तिसरेच बरळतोस!
इतरांचे प्रतिसाद बघून मग हांजी हांजी केल्यासारखा कुंथत, कुंथत प्रतिसाद देतोस!
दुस-यांची री ओढतोस व वर आव विचारवंताचा आणतोस! अस्मिता वगैरेपासून दूर दूर असून तथाकथित पवित्र्याचे सोंग घेतोस व माणूस बघून चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे टाळ्या वाजवत व टाळ कुटत बसतोस! दोन व्यक्तींच्या संवादामध्ये घुसखोरी करून तुझे दीनवाणे, केविलवाणे व बिनबुडाचे शाब्दिक बुडबुडे सोडून रसाळ चर्चेचा विरस करतोस. भरजरी कापडास खुशाल आपले दरिद्री ठिगळ लावतोस, एखाद्या रफू करणा-या कुशल कारागिराच्या आविर्भवात!
या सर्व तुझ्या करामतींना काय म्हणावे? पातळी सोडायची नाही म्हणून सौम्य व सनदशीर भाषेत लिहीत आहे. मला वास्तविक असे प्रखर वा कडवट लिहिणे स्वत:सच पटत नाही. पण तुझ्या दरदिवशी दिसून येणा-या रंगपालटाकडे बघून राहवले नाही म्हणून हा माझ्या लिखाणाचा प्रपंच!
...........प्रा.सतीश देवपूरकर
सतीश देवपूरकर | 6 September,
सतीश देवपूरकर | 6 September, 2012 - 00:29 नवीन
वैवकु!
मी करत आहे तो तद्दन फालतूपणा आणि तू कावळ्याने काय लिंक दिली त्यावर जे तुझ्या दुबळ्या तर्काचे तारे तोडले होतेस, तो काय तद्दन सुज्ञपणा, शहाणपणा की दीडशहाणपणा होता? एकीकडे दांभिक माफी मागतोस, दुसरीकडे तिसरेच बरळतोस!
इतरांचे प्रतिसाद बघून मग हांजी हांजी केल्यासारखा कुंथत, कुंथत प्रतिसाद देतोस!
दुस-यांची री ओढतोस व वर आव विचारवंताचा आणतोस! अस्मिता वगैरेपासून दूर दूर असून तथाकथित पवित्र्याचे सोंग घेतोस व माणूस बघून चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे टाळ्या वाजवत व टाळ कुटत बसतोस! दोन व्यक्तींच्या संवादामध्ये घुसखोरी करून तुझे दीनवाणे, केविलवाणे व बिनबुडाचे शाब्दिक बुडबुडे सोडून रसाळ चर्चेचा विरस करतोस. भरजरी कापडास खुशाल आपले दरिद्री ठिगळ लावतोस, एखाद्या रफू करणा-या कुशल कारागिराच्या आविर्भवात!
या सर्व तुझ्या करामतींना काय म्हणावे? पातळी सोडायची नाही म्हणून सौम्य व सनदशीर भाषेत लिहीत आहे. मला वास्तविक असे प्रखर वा कडवट लिहिणे स्वत:सच पटत नाही. पण तुझ्या दरदिवशी दिसून येणा-या रंगपालटाकडे बघून राहवले नाही म्हणून हा माझ्या लिखाणाचा प्रपंच!
...........प्रा.सतीश देवपूरकर<<<
काही प्रमाणात सहमत
बाकी प्रमाणात चर्चेस पात्र विषय आहे
देवपूरकर सर प्रत्येक मिसरा
देवपूरकर सर प्रत्येक मिसरा सखोल चिंतन करूनच लिहितात.त्यांचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे.पातळी सोडून टीकात्मक वा वैयक्तिक लिहू नये ....माझे मत.
नाहीतरी कुणाच्या गझलेतील ''सर्वच ''शेर आपल्या मनाला पटतात ?
काही प्रमाणात सहमत>>>>>>>>>
काही प्रमाणात सहमत>>>>>>>>> मी ही !!!!:)
बाकी प्रमाणात चर्चेस पात्र विषय आहे>>>>>>>>>>माझ्यातर्फे ग्रीन सिग्नल!!!:)
___________________________________
अस्मिता वगैरेपासून दूर दूर असून तथाकथित पवित्र्याचे सोंग घेतोस >>>>>>>>>>>
देवपूरकर साहेब मी अस्मिते पासून दूर नाही तर अहन्कारापासून दूर राहण्यचा प्रयत्न करतो नेहमी
आपली अजून एक गफलत होते आहे ..............अस्मिता जपणे म्हणजे केवळ स्वतःवर प्रेम करणे , स्वभक्ती करणे व स्वतःचा उदोउदो करणे नव्हे................ आ़जिबातच नव्हे !!!
अस्मिता जपणे म्हणजे आधी 'स्व' चे सत्य नीट ओळखावे लागते .माझे प्रयत्न चालू आहेत अन हो अगदी योग्य मार्गाने बरका सुदैवाची बाब म्हणजे या बबतीत माझा विठुराया स्वतः मला गुरू / मार्गदर्शक म्हणून लाभला आहे....... आपण काळजी करू नये ही विनन्ती !!!
देवपूरकर आपण आजवरच्या ५०-६० वर्षाच्या आपल्या आयुष्य नावाच्या गुरूकडून अगदीच गण्डवले गेले आहात असे दिसते लवकर शहाणे व्हा
हलके घ्या
तब्येतीला जपा
(अपल्या गझलेच्या तबीयतीबद्दल मला काहीही बोलायचे नाही आहे मी आपल्या तब्येतीबाबत म्हणतोय)
प्राध्यापक साहेब, कवितेमधले
प्राध्यापक साहेब, कवितेमधले मला काही कळत नाही, त्यामूळे त्यावर प्रतिसाद द्यायची योग्यता नाही.
तूम्ही भूशास्त्र या विषयावर मराठीमधे लिहावे, किमान या शास्त्राची ओळख तरी करुन द्यावीत, अशी विनंति मात्र कराविशी वाटते.
तसेच आणखी एक. मायबोलीवर लेखकाचे नाव ( जे घेतले असेल ते ) मुखपृष्ठावर दिसतेच. त्यामूळे प्रत्येक
गझलेच्या खाली आपले नाव, हुद्दा व फोन नंबर द्यायची आवश्यकता नाही, असे मला वाटते. आपल्या
लेखनाबाबत कुणी आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, अशी अपेक्षा असेल तर तशीही सोय मायबोलीवर आहे.
हा जो नवा पायंडा, खास करुन कवि, इथे पाडत आहेत, हे औचित्याला धरुन नाही, असे माझे, मायबोली प्रशासनाचे नाही, मत आहे. इथे मी १० वर्षांपेक्षा जास्त काळ सभासद आहे, त्यामूळे मी खात्रीने मायबोलीवरच्या
औचित्याबद्दल काही मत मांडू शकतो, असे मला वाटते.
माझ्या वरील दोन्ही विनंत्यांवर विचार कराल, अशी आशा वाटते.
कुठला पायंडया बद्दल बोलताय
कुठला पायंडया बद्दल बोलताय दिनेशदा?
स्वतःचा फोन नंबर द्यायच्या
स्वतःचा फोन नंबर द्यायच्या पायंड्याबद्दल अवतार. बाकी काहि मागणे नाही, देवा !
त्यात कसले ओउचित्य? ज्यांना
त्यात कसले ओउचित्य? ज्यांना द्यावासा वाटतो फोननंबर त्यांनी दिला तर काय बिघडले?
जगदंब! जगदंब!!
जगदंब! जगदंब!!
अवतार, मी आपल्याला नाही,
अवतार, मी आपल्याला नाही, प्राध्यापक साहेबांना विनंति केलीय. हरकत नाही, विनंति फक्त !!!
आणि माझं काय बिघडणार आहे ? कुणी फोननंबर आणि खरे नावही दिले तर !
हे दिनेश मामा बरं क लिटल
हे दिनेश मामा बरं क लिटल जिमी, हे छान छान पदार्थ करतात. हाय मामा म्हण? दिनेशमामा ते नंबर देतात कारण त्यांना कवितेच्या शिकवणीसाठी विद्यार्थी हवे असतात. परवा मलाही म्हणाले म्हणे शिकवणी लावा. कविता विकायला काढली आहे त्यांनी. बिनपावसाचे मोर नाचतात त्यांच्या कवितेत माहित्ताय?
मग कुणाचे बिघडणार आहे?
मग कुणाचे बिघडणार आहे? प्राध्यापकांचे? का मायबोलीचे?
अवतार मावशी, तू कशाला
अवतार मावशी, तू कशाला भांडतीयस अॅम्स्टरडॅमहून? डॅम स्क्वेअरला बसून मनःशांती मिळव बरे.
हाहाहाहा मोहिनीबाइ दंडवत
हाहाहाहा
मोहिनीबाइ दंडवत
अवतार, ज्यांना विनंति केलीय
अवतार, ज्यांना विनंति केलीय त्यांच्या प्रतिसादाची वाट बघतोय. शिवाय २ विनंत्या आहेत, एकच नाही. अर्थात नाहीच दिला, तरी काही बिघडत नाही म्हणा. एरवीही इथल्या चर्चेने माझेच काय मायबोलीचेही काहि बिघडत नाही !
हाय जिमी, मग तशी शिकवणीची जाहिरातही करायची सोय आहे कि, इथेच.
कर्नाळ्याला एक मोर होता, तो पावसासाठी नाही, तर प्रेक्षकांसाठी नाचत असे. राजा नाव होते त्याचे.
त्या मोराला उद्देशून असणार ती कविता. शिकवणी लावली असती, तर नक्की समजले असते. हो कि नाही !
मोहिनीताई मी कुठे भांडतीये?
मोहिनीताई मी कुठे भांडतीये? पायंडे आणि त्यांचे पडणे यावर कुतूहल वाटले म्हणून लिहिलं हो.
हो ना मामा, पण सतीश
हो ना मामा, पण सतीश देवमामांनी कसे लिहिले होते माहितीय का? म्हणे असे कसे मोर नाचती हे. म्हणजे त्यांनाच समजत नव्हते की मोर असे कसे नाचले. त्यामुळे बहुधा देवमामांनी स्वप्न पाहिले असावे
रणजीत! स्वत: लचके तोडायचे व
रणजीत!
स्वत: लचके तोडायचे व दुस-याला डोंट बाईट म्हणायचे, हा कुठला न्याय बाबा? निदान तुला जे विचारले होते, त्याची तर्कशुद्ध उत्तरे द्यायची, ते सोडून सरळ इंग्रजीत काही तरी बरळून पाय काढता घेतोस काय? उत्तरे देण्याचे धाडस वा इच्छाशक्ती नव्हती, तर दुस-यांवर साळसूदपणे टिपण्णी कशाला करतोस. बर केलीस तर ते निभवायचे तरी!
नुसत्या भावमुद्रा पाठवून, मोठे font मिळत नाहीत म्हणून केविलवाणे प्रतिसाद देण्यात काय अर्थ आहे? थोडे defend करायला पण शिकावे माणसाने, अन्यथा त्या मार्गालाच जाऊ नये!
...........प्रा.सतीश देवपूरकर
तमाम रसिक वाचक
तमाम रसिक वाचक मान्यवरांना
आश्चर्यम.......!
प्रा.सतीश देवपूरकर हे एक उत्तम गझलकार आहेत यात काडीमात्र शंका नाही.
सरांवर चौर्यकर्माचा आरोप सर्वथा गैर आहे.सर्वांनी लक्षात ठेवा..
प्रा.सतीश देवपूरकर हे प्रत्येक शेर चिंतन करूनच लिहितात.त्यांचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे.
गझलेत काफिये रदीफ यावर कुणाची मक्तेदारी नसते.
कुणीही कोणत्याही जमिनीत गझल करु शकतो.
प्रत्येकाचे आपापले खयाल असते....हुबहू शेर नसतात
आता राहिले ते आवडी निवडीचे नाहीतरी कुणाच्या गझलेतील सर्वच शेर आपल्या मनाला पटतात ?
पसंद नापसंद हे आपापल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.......
आता मराठीत
आता मराठीत सांगतो......
प्रोफेसर साहेब,
"चावू नका!!"
रणजीत! आता मराठीत
रणजीत!
आता मराठीत सांगतो......
प्रोफेसर साहेब,
"चावू नका!!"
<<<<<< तुझे अर्धमराठीतील सांगणे पोचले! संबोधनात, प्रोफेसरला मराठी शब्द सुचला नाही का? बाकी तुझी पलायनाची लकब मात्र न्यारीच आहे बुवा! चावणे चावणे म्हणून कंठशोष करतो आहेस, मग तुझ्या लचके तोडण्याकडे कसे सोयीस्कर दुर्लक्ष करतोस?
बाकी, एक गोष्ट मात्र खरी आहे की,
झोपी गेलेल्यालाच जागे करता येते, झोपेचे सोंग घेणा-यास नाही!
.........प्रा.सतीश देवपूरकर
देवपूरकर सर, जाऊद्याहो.
देवपूरकर सर, जाऊद्याहो. दुर्लक्ष करा सरळ. अनुल्लेख करा. तुम्ही उत्तरे दिल्याने अजून चेकाळतात लोक. त्याद्वारे त्यांचा विवक्षित उद्देशच सफल होतो.
दिनेशदांच्या औचित्याच्या मुद्दयावर मात्र तुमचे विचार ऐकायला नक्की आवडतील. किंबहुना, दोन्ही विनंत्यांवरील.
वैवकु! अस्मितेचा अर्थ
वैवकु!
अस्मितेचा अर्थ सांगण्याचा तुझा केविलवाणा प्रयत्न वाचला. अस्मिता ही माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून, लिहिण्यातून, सभ्यतेवरून, सौजन्यावरून, विचारातून, स्वाभिमानातून, शेरातून, गझलेतून दिसून येते.
अस्मिता बाणवण्यासाठी कुठलाही क्लास लावायला लागत नाही. ती पिंडातच असावी लागते. त्यासाठी मनावर संस्कार व्हायला लागतात, व संस्कार हे माणसाने तोंड उचकटले की, ताबडतोब कळतात.
मी कुणालाही अस्मिता शिकवायला जात नाही आणि कुणाच्या अस्मितेच्या पातळीची काळजीही करत नाही.
कोण कुणाच्या आयुष्यात किती गंडला गेला आहे, फसला गेला आहे, हे ज्याचे त्याला समजते व ते त्याच्या शायरीत प्रतिबिंबित होते. त्याला वेगळे लेबल लावायची आवश्यकता नसते.
शहाणे व्हा..........असे सांगायला आधी आपण स्वत: शहाणे असावे लागते. दीडशहाण्याला हा अधिकार कधीच नसतो!
बाकी माझ्या तबियतेबद्दल न बोलल्याबद्दल व तब्येतीबद्दल काळजी वाटल्याबद्दल तुझे अभिनंदन!
टीप: अजिबात हलके घेवू नकोस!
...........प्रा.सतीश देवपूरकर
Pages