तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?

Submitted by सतीश देवपूरकर on 1 September, 2012 - 02:53

गझल
तीट आहे की, तुझ्या गालावरी तो तीळ आहे?
एवढे नक्कीच की, तो काळजाचा पीळ आहे!

साद वा-याने दिलेली वाटते तितकी न साधी;
ती तुला पाहून त्याने घातलेली शीळ आहे!

कोण हे सांगेल त्याला? ठेच त्याचा तोच खातो!
तोच वाटेतील त्याच्या एक मोठी खीळ आहे!!

कावळे संतापले अन् काय लालीलाल झाले!
ज्या क्षणी त्यांना कळाले....एक मी कोकीळ आहे!!

रंगलो आपादमस्तक मी तुझ्या रंगात पुरता!
होय, प्रेमाची मलाही जाहली कावीळ आहे!!

मांजराच्या पावलांनी जिंदगी दारात येते!
झोपडी नाही, जणू हे उंदराचे बीळ आहे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

प्राजक्ताताई!
माझ्यावर दाखवलेल्या श्रद्धेबद्दल, विश्वासाबद्दल व आदराबद्दल अनेक धन्यवाद!
आपण सुंदर लिहिता. कृपया गझललेखनावर जास्त लक्ष केंद्रीत करावे. आपल्यात मला गझलेचा spark व तबियत जाणवते. साधना अखंड चालू ठेवा.
तुमच्या गझललेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
..........प्रा.सतीश देवपूरकर

आपल्यात मला गझलेचा spark व तबियत जाणवते.>>>>>>>>>>>

spark व तबियत म्हणजे काय असते व ते कसे ओळखावेत याबाबत कोणी अधिक माहिती सान्गू शकेल काय ?
मला माझे लेखन योग्य मार्गाने सुरू आहे की नाही ते तपासायचे आहे
कृपया मदत करावी ही विनन्ती
-वैवकु

वैभवा! व समस्त प्रतिसादक मायबोलीकर!
रसिकहो! माझे मनोगत मी माझ्या प्रतिसादात काल स्पष्टपणे लिहिले आहे.
जो काय शाब्दीक/प्रतिसादात्मक गोळीबार काल आमच्या गझलेवर झाला तो दुर्दैवी होता. पण, तो केवळ अज्ञानातून झालेला मला दिसत आहे. मनापासून सांगतो, मला कुणाचाही राग आलेला नाही. मी आपणांवर कसा रागवेन? आपण सर्व एकाच गझलदिंडीतील वारकरी आहोत, कुणी जरा पुढे, कुणी जरा मागे, इतकेच. पण आपल्या सगळ्यांचे लक्ष्य, मुक्काम, दैवत एकच की, हो! कसला आला राग? कुठली आली चीड? माझ्या दृष्टीने प्रत्येक मराठी गझलकार कवी/कवियत्री मोलाचाच/मोलाचीच आहे. जास्तीत जास्त लोकांनी अस्सल मराठमोळी बाजातल्या, मराठी मातीतल्या व मराठी संस्कृतीतल्या दर्जेदार, खणखणीत, सकस, बोलक्या, तरल गझला लिहाव्यात हीच माझी इच्छा, हेच माझे स्वप्न! जेव्हा एखादा, एखाद्याचा शेर माझ्या काळजास भिडतो, आरपार जातो, तेव्हा मला होणारा आनंद हा मी शब्दांत वर्णन करूच शकत नाही, कारण शब्द माझे तोकडे! मला माझे गुरू, आमचे दादा श्री. सुरेश भट यांची प्रकर्षाने आठवण येते. त्यांचे स्वप्न आज साकारते आहे बघून ते स्वर्गातही किती सुखावले असतील याचा अंदाज करून माझे डोळे पाणावतात.
रसिकहो! मला माफ करा.माझ्यातील प्राध्यापक व अनेक गझलपावसाळे पाहिलेल्या माझ्यातला गझलकार मला गप्प बसू नाही देत हो! मग, सुरू होतात माझे पर्यायी शेर माझे चिंतनपर विचारलेखन!
मास्तर असल्याने सविस्तर, रसाळ लिहिण्याची, बोलण्याची सवयच आहे हो मला! पण, माझ्यावर विश्वास ठेवा की, कुठलीही तुलना करणे, कुणालाही काही तरी शिकवायला जाणे, कुणालाही नाउमेद करणे, कुठलीही शेखी मिरवणे हा माझा हेतू नसतो.केवळ आणि केवळ गझलप्रेमापोटी, व पोटतिडकीमुळे हे सर्व माझा परमेश्वर माझ्याकडून करवून घेतो, व मी देखिल व्रत घेतल्याप्रमाणे ते देवाची इच्छा मानून करत असतो, ज्याचा मला स्वत:ला समृद्ध व्हायला खूप उपयोग होतो.

आता माझ्या प्रतिसादाबाबत थोडेसे.........

मला मान्य आहे, माझे प्रतिसाद प्रदीर्घ असतात. कुणाकुणाला ते प्रतिसाद वाचताना देखिल दमछाक होत असेल. पण, जरा विचार करा, वाचताना जर दमछाक होत असेल, तर आमचे लिहिताना काय होत असेल?

मी मला आवडलेली प्रत्येक गझल अत्यंत बारकाईने वाचतो, आभ्यासतो, तिच्यावर सखोल चिंतन करतो व मग माझा प्रतिसाद वहीत शायराच्या नावासकट लिहून काढतो, खात्री करतो, व मग एक सेपरेट फाईल करून वर्डमध्ये टाइप करतो व नंतर मायबोलीवरील प्रतिसाद क्षेत्रात ते copypaste करतो. या सर्व प्रक्रियेला प्रचंड वेळ व सबूरी लागते. पण मला यात कोणत्याही यातना जाणवत नाहीत उलट एक आत्मिक समाधान मिळते.

माझा महाविद्यालयाचा ३-४ तास आभ्यास सांभाळून मी या माझ्या गझलविषयकलिखाणासाठी कमीत कमी ३-४ तास देत असतो. बायको नावाची घंटा खणाणत असून, प्रसंगी तिचा रोष पत्करून मी हे माझे लिखाणाचे व्रत सांभाळत असतो. या साठी मला झोपायला रोजचे रात्रीचे १.३० वाजतात. सकाळी ६वाजता माझा पुढील दिवस चालू होतो. हे सर्व पाल्हाळ लावण्यामागे हेतू हाच की, प्रदीर्घ प्रतिसादामागची माझी कळकळ, प्रयास, हेतू आपणापर्यंत पोचावे!
शेवटी आपल्याच माणसांपुढे आपण आपले मन मोकळे करतो ना? म्हणून मी हे सर्व आपणास हक्काने सांगत आहे. मला स्वत:ला मधूमेह व उच्चरक्तदाब आहे. ब-याच प्रकारच्या गोळ्या चालू आहेत. त्यामुळे माझी पत्नी माझी काळजी करते, व मला computer वर जास्त वेळ बसू देत नाही. तरी पण तिला डोळा लागला की मी माझे लिखाण चालू ठेवतो,चोरूनमारून! आपण म्हणाल काय हे, काही तरीच काय, पण ही सत्य परिस्थिती आहे. असो.

फारच बोललो. फक्त जाता जाता इतकेच सांगतो.............

मी सुरेश भट नावाच्या एका गझलसागराच्या सानिध्यात होतो २५ वर्षे, हे मी माझे भाग्य समजतो, हा माझा दोष नाही.
मला माझ्या गुरूंनी जे जे मोफत मुक्तहस्ते दिले ते मला इतरांना द्यायचे आहे.
मी एक माध्यम instrument आहे. यात माझे काही नाही. मिळालेले ज्ञान फक्त मी pass on करतो आहे.माझ्या गुरूंची तळमळ, कळकळ मी पाहिली आहे. त्यांचे गझलेचे स्वप्न पुरे व्हावे हीच माझी कळकळ, म्हणून हा माझा सगळा, गझलेचा, प्रतिसादांचा प्रपंच!

माझ्यामुळे कुणी दुखावले गेले असल्यास मला कृपया मोठ्या मनाने माफ करावे!
आपली माणसे, गझलकार या नात्याने आपणासमोर माझे काळीज उघडे केले.
माझा हे प्रदीर्घ पाल्हाळ वाचण्याचे श्रम घेतल्याबद्दल आभरी आहे!
...........प्रा.सतीश देवपूरकर
.....................................................................................................

आपण सुंदर लिहिता. कृपया गझललेखनावर जास्त लक्ष केंद्रीत करावे. आपल्यात मला गझलेचा spark व तबियत जाणवते. साधना अखंड चालू ठेवा.
तुमच्या गझललेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा!<<< Rofl (प्राजू, हे तुमच्यासाठी नव्हे)

===================

spark व तबियत म्हणजे काय असते व ते कसे ओळखावेत याबाबत कोणी अधिक माहिती सान्गू शकेल काय ?
मला माझे लेखन योग्य मार्गाने सुरू आहे की नाही ते तपासायचे आहे
कृपया मदत करावी ही विनन्ती
-वैवकु<<<

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

====================

मला माझे गुरू, आमचे दादा श्री. सुरेश भट यांची प्रकर्षाने आठवण येते. त्यांचे स्वप्न आज साकारते आहे बघून ते स्वर्गातही किती सुखावले असतील याचा अंदाज करून माझे डोळे पाणावतात.<<< हम्म्म्म्म्म

====================

मला मान्य आहे, माझे प्रतिसाद प्रदीर्घ असतात. कुणाकुणाला ते प्रतिसाद वाचताना देखिल दमछाक होत असेल. पण, जरा विचार करा, वाचताना जर दमछाक होत असेल, तर आमचे लिहिताना काय होत असेल?<<<

त्रास करून नका घेत जाऊ प्रोफेसर साहेब, पहिली तब्येत सांभाळा

====================

मला स्वत:ला मधूमेह व उच्चरक्तदाब आहे. ब-याच प्रकारच्या गोळ्या चालू आहेत. त्यामुळे माझी पत्नी माझी काळजी करते, व मला computer वर जास्त वेळ बसू देत नाही. तरी पण तिला डोळा लागला की मी माझे लिखाण चालू ठेवतो,चोरूनमारून! आपण म्हणाल काय हे, काही तरीच काय, पण ही सत्य परिस्थिती आहे. असो.<<<

आय अ‍ॅम सॉरी प्रोफेसर साहेब, पण खरंच काळजी घ्या प्रकृतीची, आंतरजालीय लेखन आणि त्यावरील सदस्य हे निव्वळ मनोरंजनापुरते असतात असे मानून शांतपणे मॅनेज करा सगळे, वहिनींचे म्हणणे ऐका, हे मी खरंच प्रामाणिकपणे लिहीत आहे. (हल्ली प्रामाणिकपणा या शब्दाला 'खरंच' हे विशेषण जोडावे लागते, हे दुर्दैव

=========================

मी सुरेश भट नावाच्या एका गझलसागराच्या सानिध्यात होतो २५ वर्षे, हे मी माझे भाग्य समजतो, हा माझा दोष नाही.
मला माझ्या गुरूंनी जे जे मोफत मुक्तहस्ते दिले ते मला इतरांना द्यायचे आहे.
मी एक माध्यम instrument आहे. यात माझे काही नाही. मिळालेले ज्ञान फक्त मी pass on करतो आहे.माझ्या गुरूंची तळमळ, कळकळ मी पाहिली आहे. त्यांचे गझलेचे स्वप्न पुरे व्हावे हीच माझी कळकळ, म्हणून हा माझा सगळा, गझलेचा, प्रतिसादांचा प्रपंच!<<<

हा पॅरा माझ्यामते अत्यंत अनावश्यक आहे. तुमच्या (म्हणजे कोणाच्याही) गझला जर चांगल्या असतील तर लोक डोक्यावर घेतील. तुम्हाला तुमच्या गुरूंनी जे दिले ते इतरांना देणे या पोझिशनमध्ये प्लीज येऊ नका. आजची गझल पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या गझलेला भटांबाबत अत्यंत आदर आहे, पण ती वेगळी आहे. या गझलेला भटांचे शिष्य काहीही देऊ शकत नाहीत.

-'बेफिकीर'!

देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे
ज्यांना नाही घ्यावयाचे , त्यांनी थोडे दूर जावे.

>>>> हा पॅरा माझ्यामते अत्यंत अनावश्यक आहे. तुमच्या (म्हणजे कोणाच्याही) गझला जर चांगल्या असतील तर लोक डोक्यावर घेतील. तुम्हाला तुमच्या गुरूंनी जे दिले ते इतरांना देणे या पोझिशनमध्ये प्लीज येऊ नका. आजची गझल पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या गझलेला भटांबाबत अत्यंत आदर आहे, पण ती वेगळी आहे. या गझलेला भटांचे शिष्य काहीही देऊ शकत नाहीत.<<<<

दिल की बात !
'बेफिकीरी' के साथ !

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

येनकेन प्रकारेण प्रत्येक चर्चेत देवसर भट साहेबांचा संदर्भ देतात.... म्हणजे काय? त्यांचा संदर्भ न दिल्यास कुणी गांभीर्याने घेणार नाही, असं वाटत तर नाही ना ?
असं नका समजू देवसर... जितकं माझं वय आहे, तितका तुमचा गझललेखनाचा अनुभव असावा.... असं असताना शब्दाला वजन येण्यासाठी वजनदार माणसांची नावं घेणं अगदी अनावश्यक आहे..

वै.म.
कृ. गै. न.
रा. न.
लो. अ.

आ. कृ.,
....रसप....

<शब्दाला वजन येण्यासाठी वजनदार माणसांची नावं घेणं अगदी अनावश्यक आहे.>

शब्दाला वजन येण्यासाठी(च) नाव घेतले हे कशावरून ठरवले? गुरूचे प्रकट स्मरण करण्यात वावगे काय आहे?

बरोबर आहे मयेकर तुमचे. पण गुरूचे प्रकट स्मरण करून गुरू व आजचे भोळे निष्पाप शिष्य यांच्यात माध्यम होण्याचे काय कारण असावे?

भोळे निष्पाप? कोण ते? अंधश्रद्धानिर्मूलन आठवले.

'तो' परिच्छेद संपूर्ण वाचला तर प्रश्न पडायचे कारण नाही. शेवटच्या दोन वाक्यांत त्यांनी उत्तर दिलेले आहे.
"यात माझे काही नाही. मिळालेले ज्ञान फक्त मी pass on करतो आहे" हा प्रांजळपणा किती जण दाखवतात?

माझ्याकडून पूर्णविराम.

माझ्याकडून पूर्णविराम.<<<

मला वाटले तुमचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे उपरोधिक आणि थट्टा करणारे होते. म्हणजे तुम्ही मनापासून म्हणत होतात तर. ओके.

तसे असल्यास तुमच्या मुद्यांकडे लक्ष देत नाही.

क्षमस्व!

@ मयेकर >> "यात माझे काही नाही. मिळालेले ज्ञान फक्त मी pass on करतो आहे" >>> या बद्दल नेमके काय वाटते आपल्याला?
एक व्यक्ती दुसर्‍याला ज्ञान देते ... दुसरी तिसर्‍याला (अनेकांना) निव्वळ इतकेच घडत आहे का येथे ?

देवपूरकर सरांची कळकळ कधीच खोटी वाटली नाही, फक्त ती अस्थानी आहे असे वाटत राहते. हे इंटरनेट आहे, इथे गोष्टी इतक्या सिरीअसली घ्यायच्या नसतात हे त्यांनी लवकर ओळखले पाहिजे असे वाटते. थोडे काव्यमय भाषेत सांगायचे तर "पाण्यात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलपत्राप्रमाणे" नेटवर वावरले पाहिजे. इथल्या गोष्टींनी आपले मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नये. आपली प्रकृती आधी जपावी. बाकी गोष्टी खरोखर गौण आहेत.

देवपूरकर सरांची कळकळ कधीच खोटी वाटली नाही, फक्त ती अस्थानी आहे असे वाटत राहते. हे इंटरनेट आहे, इथे गोष्टी इतक्या सिरीअसली घ्यायच्या नसतात हे त्यांनी लवकर ओळखले पाहिजे असे वाटते. थोडे काव्यमय भाषेत सांगायचे तर "पाण्यात राहूनही कोरडे राहणार्‍या कमलपत्राप्रमाणे" नेटवर वावरले पाहिजे. इथल्या गोष्टींनी आपले मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नये. आपली प्रकृती आधी जपावी. बाकी गोष्टी खरोखर गौण आहेत>>>>

+१०० ज्ञानेश

देवपूरकर सरांची कळकळ कधीच खोटी वाटली नाही, फक्त ती अस्थानी आहे असे वाटत राहते.<<<

बाकीच्या पॅराशी सहमत, मात्र या वरील विधानाबाबतः

कळकळ खोटी अर्थातच मलाही नाही वाटत त्यांची. पण ही कळकळ कशासाठी आहे? त्यात 'मी शिकवतो, तुम्ही शिकून घ्या' हा पदर का जाणवत आहे? निखळ चर्चा यापलीकडे का गोष्टी जात आहेत?

मी माझे एक अत्यन्त परखड निरीक्षण मान्डू इच्छितो.............खरे असेल की खोटे माहीत नाही........कुणाला आवडण्याचीतर सुतराम शक्यता नाहीये

मला असे नेहमी जाणवत आले आहे की ; देवसर हे जे काही करत असतात / जे करतोय ते उत्तम व उत्कृष्टच आहे हे सिद्ध करायसाठी जिवाची जी तगमग करून घेत असतात यामागे शुद्ध हेतू ;
.............. हा एकमेव असावा की.................
मला टाळ्या हव्या आहेत ही गजबज नको आहे !!

मी असे का म्हण्तो आहे ??? (वर दिलेला बेहतरीन मिसरा बेफीजिन्चा आहे . बाकीचे म्हणणे माझे आहे तेच खालीही कन्टीन्यू करतो आहे....)

परिस्थिती लक्षात घ्या ...........आपले देवसर पूर्वी अनेक मुशायरे गाजवत असत (टाळ्या मिळवत असत)आता तो जमाव आसपास नसतो याकरता ते अन्तरजालावर हजेरी लावून आहेत (अशा आशयाचे वाक्य त्यानी स्वत; एकदा प्रतिसादात लिहिल्याचे मला पक्के स्मरते आहे ......विशेषतः मिळालेल्या टाळ्यान्चा उल्लेख!!! )
नजीकच्या काळात ते सेवानिवॄत्तही होतील .तेन्व्हा त्याना गझल हे आपले जीवनध्येय जे साध्य करणे मध्यन्तरी जर मागे पडले असायची शक्यता आहे ,ते पुन्हा साध्य करायचे कसोशीचे प्रयत्न चालू ठेवायचेत बहुधा

आजवर ३०-३५ वर्षात त्यानी नक्कीच दूरचा टप्पा गाठलाही असेल पण अन्तिम धेय नसावे
....पण त्याना ते मिळणार हे मात्र नक्की ! मला खात्री आहे !!
(सुदैवाची बाब हीच की त्याना स्वतः भट साहेब या बाबतीत गुरु/मार्गदर्शक लाभले आहेत )

देवसराना माझ्या अन्त:करणापासून शुभेच्छा!!!

_______________________________________________________
बेफीजी म्हणतात तो मुद्दा हेच की <<<<<<आजची गझल पूर्णपणे वेगळी आहे. आजच्या गझलेला भटांबाबत अत्यंत आदर आहे, पण ती वेगळी आहे. या गझलेला भटांचे शिष्य काहीही देऊ शकत नाहीत.<<<<
हा नक्कीच विचारात घ्यावा असा आहे
(निदान माझी गझल व देवसरान्ची गझल या दोहोत मलातरी तो फरक सूर्यप्रकाशासारखा लख्ख जाणवतो !!!)
_________________________________________________________

असो

न आवडल्यास सोडून द्या !! खासकरून देवसर तुम्ही !!!

तुमच्या तब्येतीला जपा !!

वैवकु!!!

गझल हा प्रकारच असा आहे कि काफिये एकसारखे येणारच. तीळ हा काफिया घेतल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असणारे कोणते शब्द गझलकाराला आठवतील ? प्रत्येकाने प्रत्येक गझल वाचलेली असेल असे नाही. केवळ काफिये एकसारखे आहेत यावरून चोरीचा आरोप होऊ नये.

गझल ठीकठाक वाटली.

किरणू तू शांत राहा, तुझ्यावर लक्ष आहे मॅनेजमेन्टचं. चोरी केली नाही ना? मग का भांडतायत सगळे? वैभ्या, तू पण मोठाले प्रतिसाद लिहू लागलास. चल लिटल जिमी, इथे दंगा होणार आहे आता

Mohini Pawaar | 4 September, 2012 - 14:57 नवीन
किरणू तू शांत राहा, तुझ्यावर लक्ष आहे मॅनेजमेन्टचं. चोरी केली नाही ना? मग का भांडतायत सगळे? वैभ्या, तू पण मोठाले प्रतिसाद लिहू लागलास. चल लिटल जिमी, इथे दंगा होणार आहे आता
<<<

लिट्ल जिमी
अगं आई गं!
हसून हसून मुरकुंडी वळणे काय असते ते समजले. मी आजकाल फक्त मोहिनी पवार यांचे प्रतिसाद वाचण्यासाठी शोधून शोधून गझलांचे धागे वाचत असतो.

हसून हसून -ओक्साबोक्षीरडलास्की- (रशियन) इब्लिस

बेफिकीरजी!
“मी शिकवतो, तुम्ही शिकून घ्या” हा पदर आपणांस जाणवतो असे दिसते.
मी इथे नम्रपणे सांगतो की, मी पेशाने जरी प्राध्यापक असलो तरी मी स्वत:ला आजन्म विद्यार्थीच समजतो. कारण माणसाची शिकण्याची प्रक्रिया ही आजन्म चालूच असते असे मी मानतो व पाळतो. मी मागे देखिल म्हटले आहे की, जे चांगले आहे ते मी शेंबड्या पोराकडून देखिल घेत असतो.
आहो, आपल्या जवळ जे ज्ञान आहे, ते वाटायला काय हरकत आहे? मला माझे उमेदवारीचे दिवस आठवतात. मी गझल शिकण्यासाठी तज्ञांच्या सहवासात रहायला अक्षरश: जीव टाकायचो. गझलेवर जे कुठे काही मिळेल ते अधाशासारखे वाचायचो. गुरुतुल्य लोकांना लिहिलेले ऎकवण्यासाठी जीव टाकायचो. त्यावेळी internet माहीत नव्हते.
आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत. घरबसल्या आपणास नेटवरून सर्व शिकता येते. मग का नाही शिकायचे? हे फक्त ज्ञानाचे , विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे आदानप्रदान आहे. ज्याला शिकायचे आहे तो शिकतोच! पण, मला वाटते काय सांगितले जात आहे यापेक्षा कोण सांगतो आहे या कडेच काहींचे लक्ष असते.
मला स्त:ला व्यक्तीपूजा मान्य नाही. पण म्हणून मी व्यक्तीद्वेषही करीत नाही. चांगल्याला चांगले म्हणायला मी कचरत नाही!
माझ्या ३५ वर्षांच्या आध्यापनाच्या कारकीर्दीत माझ्या विद्यार्थ्यांनीच मला भूशास्त्र शिकवले आहे, हे मी विद्यार्थ्यांसमोर जाहिरपणे सांगतो. कबूल करतो. त्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. केवळ या एका गुणामुळे ३५ वर्षांपूर्वीचा मी व आज रोजीचा मी यात जमीन आस्मानाचा फरक पडलेला आहे. माझे भूशास्त्राचे व गझलेचे शिक्षण हे असेच आजन्म चालणार!
मला सर्व समजले, मी कोळून प्यालो, मी म्हणजे revised editionच आहे, मला कुठल्याही संपादनाची गरज नाही...........अशी माझी कधीच भावना नसते.
शेवटी शिकणे/अध्ययन ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया असते. आपले जीवन, येणारे प्रसंग, लागणा-या ठेचा, आपले विद्यार्थी, आपले सहकारी हे सारे आपले गुरूच असतात, जर आपली शिकायची तयारी असेल तर! मला कशाला पाहिजे शिकायला? माझ्याकडे इतक्या पदव्या आहेत, मी इतका वरिष्ठ आहे असे म्हटले तर शिकण्याची, विकासाची, वाढीची, प्रगतीची शक्यताच संपली, असे मी मानतो.
अध्ययन-आध्यापन प्रक्रियेत अध्ययन होत नसेल तर ते आध्यापन निकृष्ट आहे असे शिक्षणशास्त्र मानते. आध्यापनात एकेरी वाहतूक नसते. दुहेरी वाहतूक असते. तो एक संवाद असतो. गुरू व शिष्य यांची आदलाबदलही होते, हे मी अनुभवले आहे. तेव्हा निखळ चर्चेत कोण शिकवतो, कोण शिकते हे येवूच नये, असे मला वाटते. काय चर्चिले जात आहे, त्यातील काय घेण्याजोगे आहे, ते पहावे, पटले तर घ्यावे, अन्यथा सोडून द्यावे.
व्यक्तीपूजा, व्यक्तीद्वेष हवेत कशाला, कोणत्याही कलेत? कलेची/गझलेची निखळ साधना करावी, या मताचा मी तरी आहे. चर्चांचा हेतू हाच की, माझे लिखाण कालपेक्षा आज जास्त समृद्ध व्हावे! विनय सुटला की प्रगती खुंटते, या मताचा मी आहे. बाकी जो तो आपल्या मर्जीचा मालक असतो, हेच खरे.

..................प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

रणजीत.........
गुरूचे नाव घेणे हे काही पाप नाही.
आपल्या म्हणण्याला वजन यावे यासाठी गुरूचे नाव मी कधीच घेत नाही. असे करण्याची निदान मला तरी आवश्यकता नाही. कारण माझा माझ्या साधनेवर विश्वास आहे. नैसर्गिक सौंदर्यावर माझा विश्वास आहे, सौंदर्यप्रसाधनांवर नाही व त्यांची मला गरजही नाही.

कुणाचे कोटेशन देणे यातून असा कुणी अर्थ काढावा हे मी खरोखरीच दुर्दैवी मानतो.
मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. ज्याचे श्रेय त्यास देणे याची मला लाज वाटत नाही.
मी कुणाचीही वाक्ये नामनिर्देश न करता कधीही देत नाही.
सुरेश भट हे माझे गुरू क्रमांक १ आहेत. इतरही अनेक थोर गुरूंच्या मी सानिध्यात होतो, आहे, ज्यांचा नामोल्लेख मी केला नाही. एका नावावरून हे असे जावई शोध लोक लावतात, दुसरी नावे घेतली तर काय काय अभिनव शोध लावतील ते देवच जाणो! असो. एक मात्र निश्चित, की थोर गुरू लाभणे यास भाग्य व पुण्याई लागते, जी सुदैवाने माझ्याकडे आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
शेवटी इतकेच सांगतो की, मी कुठे उभा आहे हे मला चांगलेच ठाऊक आहे. माझे पाय जमिनीवर आहेत. गझलक्षेत्रात स्वत:च्या पायांवर वाटचाल करण्या इतकी गझलसशक्तता माझ्याकडे आहे. कोणत्याही नावांच्या कुबड्यांची मला आवश्यकता नव्हती व कधीच तशी माझ्यावर तरी पाळी येणार नाही!
माझ्या लेखणीवर, चिंतनावर, माझ्या वाणीवर माझा विश्वास आहे.
..........प्रा.सतीश देवपूरकर

टीप: रणजीत! तुला काल आलेली उद्विग्नता, व्यथा कमी झाल्यात की, नाहीत? माझे मनोगत या गझलेबाबत, ही गझल कधी लिहिली वगैरे खुलासा मी केलेला आहे. आता तुझे काय म्हणणे आहे? कुणी डाका घातला?चोरी केली?दरोडा घातला? इतका काफियांचा, विचारांचा योगायोग अजूनही तुला पचयला जड जात आहे काय?
माझ्या कोणत्याही गझलेवर कुणीही गझल बेतली तरी माझी काहीही हरकत नाही. मी त्याने कधीच उद्विग्न, व्यथित, घायाळ, गलितगात्र होणार नाही. मी उलट म्हणेन कुणीही माझ्या कोणत्याही गझलेवर तरही गझल माझे काफिये घेवून लिहावी. मी त्याचे स्वागतच करेन. शेर कामयाब असेल तर सलामच करेन! कुढत बसणार नाही, किंवा व्यथितही होणार नाही किंवा केवढा हा अपचनीय योगायोग म्हणून डोक्याला हातही लावून बसणार नाही!
डॉक्टर साहेबांनी ही गझल माझ्या या गझललेखनाच्या किती तरी नंतर(१५ वर्षांनी) लिहिली आहे. माझ्याच गझलेतील काफिये, रदीफ आहेत म्हणून मी काय व्यथित होवू? हा माझा पिंडच नाही! उलट मी त्यांची गझल वाचून ब-याच गोष्टी शिकलो. दोघांच्याही गझलेतील बाज वेगळा आहे.
..........प्रा.सतीश देवपूरकर

डॉक्टर साहेबांनी ही गझल माझ्या या गझललेखनाच्या किती तरी नंतर(१५ वर्षांनी) लिहिली आहे.

हे सी आय डी च्या वरताणच चालले आहे. म्हणजे डाका डॉक्टरांनी घातला? आणि प्रद्युम्न दया अभिजीत एक प्राणीसंग्रहालय चालवणार्‍या गरीब प्राध्यापकामागे धावतायत? माझ्या बुटक्या व अदृष्य लिटल जिमी, अवाक होऊन बघत राहा साहित्यातील पानसिंग तोमरांना

Pages