शब्दझरा

Submitted by पल्ली on 29 August, 2012 - 03:11

तुझ्या शब्दांच्या
गच्च डोंगररांगात
अचानक एक झरा सापडला..
नितळ झरा. इवलासा झरा.
मी झिम्माड भिजून घेतलं.
हाडापर्यंत गारठा भिनला होता!
व्वा! क्याबात है म्हणत
झर्‍याला देहगार लपेटून घेतलं.
एका हलकट क्षणी लक्षात आलं
तुझ्या मैत्रीची पाऊलवाट
निसटलीय पायाखालून...
मग तो झराच बोचरा झाला
पटापट डोंगरकडे विझायला लागले
भितीच्या अंधारजाळ्यात.
ओले कपडे भिरकावले मग
सुकलेले चढवले अंगावर
ह्या गारठ्यानं नको ना यायला
भयानक आजारपण....
आता सारंच सुकलंय!
पाऊलवाट कुठे गेली?
मी रानात हरवलेय.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे बाप काय लिहिलीत राव कविता

मस्त मस्त मस्त
सह्हीच !!

दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती..........__________/\___________ !!

____________

कविता अशी एकसन्ध लिहिल्याने परिणाम छानच होतोय मनावर ; पण जर ठराविक ओळींनंतर गॅप ठेवला तर वेगवेगळी वळणे घेत जाण्यातली जी मजा एखाद्या नदीला येते तशी वाचकाला कविता अनुभवता येते

प्रयत्न करून पहायाला हरकत नाही ..........

आपल्या सदस्यत्वातील 'माझी विचारपूस' मधे पाठवतोय पाहून घ्या ...........
-वैवकु

खूप खूप सुंदर्..............आवडली....... Happy

Happy

एक थेंब वळवाचा
अंकुर पुन्हा उजवेल
खपलीखालच्या वळणापाशी
नवा श्रावण हिरवळेल

पाउलवाटांचं काय
पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
अवखळ खळखळणारं पाणी
ओंजळीत साकळेल

आकाशही मावेल मग त्यात

रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसवेल

..................अज्ञात

अफलातून Happy

मी झिम्माड भिजून घेतलं. ----- झिम्मड असे चालेल
हाडापर्यंत गारठा भिनला होता!..... हडापर्यंत.

एका हलकट क्षणी लक्षात आलं
तुझ्या मैत्रीची पाऊलवाट................... सुरेख. सुंदर सत्य.

झर्‍याला देहगार लपेटून घेतलं. ... छान.

भितीच्या अंधारजाळ्यात..... अप्रतिम उपमा.

_______________ अभिनंदन.

सर्वांचे आभार Happy
अज्ञात, >> मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसवेल >> क्क्लास!
आभारी सुधाकर Happy