Submitted by पल्ली on 29 August, 2012 - 03:11
तुझ्या शब्दांच्या
गच्च डोंगररांगात
अचानक एक झरा सापडला..
नितळ झरा. इवलासा झरा.
मी झिम्माड भिजून घेतलं.
हाडापर्यंत गारठा भिनला होता!
व्वा! क्याबात है म्हणत
झर्याला देहगार लपेटून घेतलं.
एका हलकट क्षणी लक्षात आलं
तुझ्या मैत्रीची पाऊलवाट
निसटलीय पायाखालून...
मग तो झराच बोचरा झाला
पटापट डोंगरकडे विझायला लागले
भितीच्या अंधारजाळ्यात.
ओले कपडे भिरकावले मग
सुकलेले चढवले अंगावर
ह्या गारठ्यानं नको ना यायला
भयानक आजारपण....
आता सारंच सुकलंय!
पाऊलवाट कुठे गेली?
मी रानात हरवलेय.......
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शीर्षकापासूनच आवडली ! (कपडे
शीर्षकापासूनच आवडली !
(कपडे मधले एक अक्षर बदलणार का प्लीज. )
दिनेशदा, लगेच सुधारणा केलीय
दिनेशदा, लगेच सुधारणा केलीय
बापरे बाप काय लिहिलीत राव
बापरे बाप काय लिहिलीत राव कविता
मस्त मस्त मस्त
सह्हीच !!
दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती..........__________/\___________ !!
____________
कविता अशी एकसन्ध लिहिल्याने परिणाम छानच होतोय मनावर ; पण जर ठराविक ओळींनंतर गॅप ठेवला तर वेगवेगळी वळणे घेत जाण्यातली जी मजा एखाद्या नदीला येते तशी वाचकाला कविता अनुभवता येते
प्रयत्न करून पहायाला हरकत नाही ..........
आपल्या सदस्यत्वातील 'माझी विचारपूस' मधे पाठवतोय पाहून घ्या ...........
-वैवकु
सुंदर
सुंदर
मस्त , छान ,
मस्त , छान , सुंदर...............
सर्वांचे मनस्वी आभार. माझे
सर्वांचे मनस्वी आभार. माझे नेहमीचे लोक्स कुठे गेले? अजुन कसं आलं नाही कुणी?
खूप खूप
खूप खूप सुंदर्..............आवडली.......
योगुली आभार
योगुली आभार
एक थेंब वळवाचा अंकुर पुन्हा
एक थेंब वळवाचा
अंकुर पुन्हा उजवेल
खपलीखालच्या वळणापाशी
नवा श्रावण हिरवळेल
पाउलवाटांचं काय
पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
अवखळ खळखळणारं पाणी
ओंजळीत साकळेल
आकाशही मावेल मग त्यात
रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसवेल
..................अज्ञात
अफलातून मी झिम्माड भिजून
अफलातून
मी झिम्माड भिजून घेतलं. ----- झिम्मड असे चालेल
हाडापर्यंत गारठा भिनला होता!..... हडापर्यंत.
एका हलकट क्षणी लक्षात आलं
तुझ्या मैत्रीची पाऊलवाट................... सुरेख. सुंदर सत्य.
झर्याला देहगार लपेटून घेतलं. ... छान.
भितीच्या अंधारजाळ्यात..... अप्रतिम उपमा.
_______________ अभिनंदन.
सर्वांचे आभार अज्ञात, >>
सर्वांचे आभार
अज्ञात, >> मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसवेल >> क्क्लास!
आभारी सुधाकर