गर्जा महाराष्ट्र माझा! (गटलेखन स्पर्धा) (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 14:13

garjamaharashtra Final 1.jpg

सगळ्या मायबोलीकरांना कोणती एक गोष्ट एकत्रित बांधून ठेवते माहितीये? आपलं मराठी भाषेवरचं, संस्कृतीवरचं आणि आपल्या भूमी बद्दलचं प्रेम!
(कोण म्हणतयं रे की "मराठी माणसं एकमेकांना मदत करत नाहीत" म्हणून?)

तर मंडळी, ही एक गट/टीम/कंपू/चमू स्पर्धा आहे.

महाराष्ट्रातील कोणताही एक विभाग/जिल्हा/शहर/खेडेगाव निवडून त्यावर एक जाहिरातवजा लेख लिहायचा आहे. (संदर्भः Incredible India campaign). मात्र हा लेख लिहायचा आहे कंपूबाजी करून! कंपूबाजी काही मायबोलीकरांना नवीन नाही! Wink

गट/ टीम/कंपू/चमू यांसाठीचे नियम :-
१. कंपू साठी नाव ठरवणं आवश्यक आहे.
२. कंपू कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त ५ आयडींचा असावा.
३. एक सभासद एकाच कंपूमध्ये भाग घेऊ शकतो.
४. ह्यात प्रत्येक सभासदाचं पुरेपूर योगदान असावं अशी अपेक्षा आहे.

लिखाणाचे नियम :-
१. लेखाला नाव असणं आवश्यक आहे. याशिवाय लेख महाराष्ट्रातील कोणत्या भागाबद्द्ल आहे त्याचाही उल्लेख करावा.
२. तुम्ही जो भाग निवडाल त्याची ही जाहिरात आहे. त्यासाठी तुम्ही गद्य, पद्य, संवाद इत्यादि लेखन प्रकारांचा वापर करू शकता.
३. छायाचित्रे (यात हस्तकला, पाककला, चित्रकला इ. सर्व आलं) - जास्तीत जास्त ६
वापरण्यात येणारी सर्व छायाचित्रे प्रताधिकारमुक्त वा स्वतः काढलेली असावीत.तसेच चलतचित्रे (व्हिडीओ)/ युट्युब यांचे दुवे जरुर देऊ शकता मात्र ते त्या त्या चमूने स्वतः तयार केलेले पाहिजेत. कुठल्याही व्यावसायिक/सरकारी हॉटेल, रिसॉर्ट, कंपनी यांचे दुवे देऊ नयेत. रेल्वे, बस यांची माहिती चालेल मात्र त्यांची वेळापत्रके वगैरेंचे दुवे देऊ नयेत.
मायबोलीवर पूर्वप्रकाशित लेखांची वा प्रकाशचित्रांची मदत घ्यायची असेल तर त्याच्याशी संबंधित सभासदांची परवानगी घेणे व लेखामध्ये तसा उल्लेख करणे अनिवार्य आहे.
४. शब्दमर्यादा नाही, मात्र यातील माहिती वाचनीय, प्रेक्षणीय व उद्बोधक असेल याची काळजी घ्या.
५. लेखन स्वातंत्र्य असलं तरी कृपया धार्मिक विषयावरचे वाद, प्रांतवाद, जातीयवाद, राजकीयवाद आणू नयेत.
६. जास्तीत जास्त लोकांना तो प्रदेश पहाण्याची इच्छा होइल असा लेखाचा उद्देश असावा.
७. नियमात न बसणार्‍या प्रवेशिका बाद ठरवल्या जातील.

प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात ?

प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, १९ सप्टेंबर २०१२ (भारतीय प्रमाण वेळ), अनंत चतुर्दशीपर्यंत, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) पाठवता येतील. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १९ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घेण्याकरता, या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
२. कंपू मधल्या कोणत्याही एका आयडीने याच गृपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०१२ गृप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
गर्जा महाराष्ट्र माझा! - लेखाचे नाव - कंपूचे नाव
४. विषय या चौकटीमध्ये उपलब्ध पर्यायसूची (ड्रॉपडाऊन मेन्यु) मधून 'मायबोली, उपक्रम' हा पर्याय निवडा.
५. शब्दखुणा या चौकटीमध्ये गर्जा महाराष्ट्र माझा, मायबोली गणेशोत्सव २०१२ हे शब्द लिहा.
६. मजकूराच्या सुरवातीला आपल्या कंपूतील सर्व सभासदांची नावे लिहावीत.
लेखाच्या शेवटी श्रेयनामावली लिहीण्यास हरकत नाही.
७. मजकूरात प्रकाशचित्र टाकायचे असल्यास मजकूराच्या चौकटीखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
९. Save ची कळ दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थोडी कळ काढाच Wink आता तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.
११. या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येइल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, आपले प्रश्न विचारात घेऊन स्पर्धेच्या मजकूरात बदल केला आहे. कृपया तो वाचावा. अजुनही काही प्रश्न असतील तर जरुर विचारा.
मायबोलीकरांनो, तुमच्या उत्साहाचं उधाण असंच राहुदे. लगे रहो!

मायबोलीवर पूर्वप्रकाशित लेखांची वा प्रकाशचित्रांची मदत घ्यायची असेल तर त्याच्याशी संबंधित सभासदांची परवानगी घेणे व लेखामध्ये तसा उल्लेख करणे अनिवार्य आहे.

>>> संबंधित सभासद कंपुत असतील तरी उल्लेख अनिवार्य आहे का? गरज नसावी असे वाटते. Happy

संबंधित सभासद कंपुत असतील तरी उल्लेख अनिवार्य आहे का? गरज नसावी असे वाटते. >>> हो! सभासद कंपुत असेल तर उल्लेखाची गरज नाही.

संयोजक , सविस्तर खुलासा केल्याबद्दल धन्यवाद.
ह्या कामासाठी कंपु जमवण्यासाठी जाहिरात करतो Happy (एखाद्या गावाला/प्रदेशाला नावे ठेवायला कंपु लगेच तयार होतो पण ह्या स्पर्धेसाठी अवघड आहे)

हे! हे! हे! धन्यवाद संयोजक.......... शब्द मर्यादा शिथिल केल्याबद्दल.!
आता लागलोच कामाला...................

एखाद्या गावाला/प्रदेशाला नावे ठेवायला कंपु लगेच तयार होतो पण ह्या स्पर्धेसाठी अवघड आहे
>>> चांगल्या कामासाठी कंपु निर्माण करणे किती कठीण आहे.. Happy

संयोजक एक शंका आहे. एखादे ठिकाण म्हणजे पुर्ण शहर/गाव असंच अभिप्रेत आहे की त्या प्रदेश्/भागातील एखादं निवडक स्थळ पण चालेल उदा. ठाणे ह्या ठिकाणातलं संपुर्ण ठाणे कव्हर न करता तलावपाळी व त्याच्या आजुबाजुचा मोजका परिसर असही चालू शकेल का? (हे उदा. म्हणून घेतलय फक्त)

चला कंपूगिरी करायला सुरुवात करुया.....

कोणाला तरी आधी डोक्यावर चढवायला पाहिजे. (दोन पुरे) .. स्पर्धा संपली की उतरवायचे .. Proud

Pages