बालचित्रवाणी (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 11:05

2012_balchitrawani2.jpg

गणपती बाप्पा सर्वांचाच लाडका. आपल्या छोट्या दोस्तांनी त्याला चक्क "माय फ्रेंड गणेशा" म्हटलंय.
छोट्या दोस्तांनो, अशा या तुमच्या फ्रेंड बाप्पाचा उत्सव आपण आपल्या मायबोलीवर करत आहोत. त्यासाठी तुम्ही तुम्हाला येत असलेली बाप्पाची गाणी, बाप्पाच्या गोष्टी, आणि बाप्पाचे श्लोक म्हणणार ना?

यासाठी काय करायचं?

१. स्वतःच्या पाल्याच्या आवाजातील ध्वनीमुद्रण mp3 फाईल मध्ये किंवा चलतचित्र (व्हिडिओ), युट्यूब वर टाकून, त्याची लिंक sanyojak@maayboli.com या पत्त्यावर अनंत चतुर्दशी, २९ सप्टेंबर २०१२ (अमेरिका पश्चिम किनारा प्रमाणवेळेनुसार) पर्यंत पाठवू शकता.
२. ध्वनीमुद्रण कमाल ३ मिनिटांचे असावे.
३. प्रवेशिकेवर पालकाचे सभासदत्व (मायबोली आयडी), कलाकाराचे नाव आणि वय लिहावे. विषयात 'बालचित्रवाणी' नमूद करावे.
४. कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.
५. कार्यक्रमात भाग घेताना प्रत्येक विभागात भाग घेता येईल परंतु एका विभागात फक्त एकदाच. उदाहरणार्थ, एक पाल्य २ गाणी किंवा २ श्लोक असं पाठवू शकत नाही. मात्र १ गाणं, १ गोष्ट व १ श्लोक असं पाठवू शकतो.
६. हे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आहेत, स्पर्धा नाही.
७. मायबोलीकरांचे १२ वर्षे वयापर्यंतचे पाल्य या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२ वर्षे पर्यंतचे मायबोलीकरांचे पाल्य ह्यात भाग घेउ शकतात>>>> मायबोलीकरांचे वय १२ वर्षे की पाल्याचे वय १२ वर्षे?? Lol
सॉरी, आचरटपणा करण्याचा मोह आवरत नाहीये, माफी द्यावी Happy

हे सगळं विनय भिड्यांमुळे! Proud

स्पर्धा नाही. >> उत्तम..
बच्चे कंपनीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची मजा काही औरच असते.

गिटारवाला बाप्पा झक्कास Happy

रच्याकने, हे सगळे धागे संयोजनात का आहेत ? संयोजन आणि गणेशोत्सव असे दोन वेगवेगळे ग्रूप असतात ना दर वेळी ?

संयोजन आणि गणेशोत्सव असे दोन वेगवेगळे ग्रूप असतात ना दर वेळी ?>>

सिंडरेला,
सुरुवातीच्या घोषणा संयोजन ग्रूपातूनच होत असतात. गणेशोत्सव हा ग्रूप मुख्य उत्सवाच्या दरम्यान चालु केला जातो.

बाप्पा आणि लहान मुलांची चित्रं फारच गोड आहेत! Happy
दणक्यात सुरु आहेत घोषणा! मस्त. संयोजक मंडळ जोरात आहे!

संयोजक,

नमस्कार.
mp3 फाईल कशी पाठवायची? युट्यूब वर टाकायचा प्रयत्न केला तर "The file you uploaded contains only audio and no video. Learn how to easily convert your audio track to a video file type" असं येतंय.

धन्यवाद.

संयोजक, आयफोन मध्ये रेकॉर्ड केलेली फाइल चालणार आहे का? एमेल केली आहे. पोच द्याल का?
तो फॉर्मट चालणार नसेल तर काय करावे लागेल तेही कळवा प्लीज.
धन्यवाद.