बनेश्वर

Submitted by रंगासेठ on 23 August, 2012 - 02:27

यंदा पाऊस तसा उशिराच बरसला, त्यामुळे पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला जास्त वेळ मिळाला नाही. तसेच नोकरी बदलली म्हणून 'नोटीस पिरिअड' मध्ये सुट्टी पण मिळणार नव्हती, पावसात भिजून कॅमेरा खराब होईल ही भिती पण वाटत होती Sad . असेच ४-५ विकांत वाया गेल्यावर आणि लोकांनी काढलेले सुंदर-सुंदर फोटो पाहून ट्रीप काढायचीच ही इच्छा प्रबळ झाली. नेमका त्याच विकांताला मी एकटा, त्यामुळे पुण्याजवळच कुठेतरी जाऊ असं ठरवलं आणि रविवारी 'बनेश्वर'ला जायचं ठरलं.

पुण्यापासून साधारणतः ३५-३६ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे, पुणे-सातारा मार्गावर खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडून पुढे गेल्यावर 'नसरापूर' साठी फाटा लागतो. राजगड-तोरणाला भेटी देणार्‍यांना हा रस्ता माहितच असेल. वाटेत हिरवा निसर्ग हा भवतीने लागतच होता.

प्रचि-१

_MG_6627

कात्रज बोगद्याच्या तोंडावर मर्कटसभा भरली होती, लोकं काहीबाही खायला देत होती.

प्रचि-२
_MG_6615

त्या फाट्यापासून २-३ कि.मी. अंतरावर बनेश्वराच मंदिर लागतं. एकच रस्ता आहे आणि गावातूनच जात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. गाव ओलांडून शेवटच्या टप्प्याला लागल्यावर मस्त निसर्ग सौंदर्य साथ देत राहतं. पावसाळ्याच्या २-३ महिन्याच्या काळात भेट देण्यासारखं उत्तम ठिकाण त्यात शंकराचं स्थान असल्यामुळे श्रावणात तूफान गर्दी. या भेटीतील काही प्रचि खाली देतोय.

या मंदिराचा थोडक्यात इतिहास हा दर्शनीभागातच वाचायला मिळतो.

प्रचि-३

_MG_6702

बनेश्वर मंदिर
प्रचि-4
_MG_6637

प्रचि-5
_MG_6638

प्रचि-6
_MG_6640

प्रचि-7
_MG_6642

मंदिरातील एका कुंडात काही कासवे आहेत.
प्रचि-8
_MG_6648

प्रचि-९
_MG_6660

प्रचि-10
_MG_6667

प्रचि-11
_MG_6681

प्रचि-12
_MG_6687

प्रचि-13
_MG_6695

प्रसादाचा चविष्ट कंदी पेढा,
प्रचि-14
_MG_6698

प्रचि-15
_MG_6703

मंदिरा जवळूनच नदी वाहते आणि एक सुंदर धबधबा देखील आहे. ही त्या धबधब्याकडे नेणारी वाट.
प्रचि-16
_MG_6716

धबधबा व परिसर. पाऊस असल्याने खाली पर्यंत जाण्याच्या वाटा प्रचंड निसरड्या झाल्या होत्या. त्यामुळे वरुनच दर्शन घ्याव लागलं.

प्रचि-17
_MG_6740

प्रचि-18
_MG_6750

पावसाळ्यामुळे मिळालेले काही मॅक्रो शॉट्स. Happy

प्रचि-19
_MG_6766

प्रचि-20
_MG_6767

जुना कात्रज बोगदा
प्रचि-२१

_MG_6826

माझी सहचारिणी Wink

प्रचि-२२
_MG_6777

संपूर्ण प्रवास बाइकवरुन केला आणि मस्त पाऊसात भिजल्यामुळे यंदाचा पावसाळा थोड्याप्रमाणात का होईना सार्थकी लावला. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर फोटू..

ते चीज सारख काय ठेवलाय खायला Happy
भारी दिसतंय

आणि बायकू कुठली म्हणायची तुमची होंडा दिसतेय

अरे वाह, रंगरंगोटी झालेली दिसतेय मंदिराची.
सुरेख प्रची Happy
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.

दवबिंदुंच्या प्रची सुंदर.

बनेश्वरचं मंदिर पण रंगवून झालं की...
>>> हिमांशु + १

आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.
>>> शुके ही माहिती मला नव्हती.

अप्रतीम प्र.ची. Happy

आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.<<<<
शुके हा प्रकार यवत जवळच्या भुलेश्वर मंदिरात आहे

आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे. >> खरंय! आम्ही शाळेच्या ट्रीप सोबत गेलो होतो तेव्हा पाहिल्या/ हाताने चाचपडल्या होत्या.

धन्यवाद, सध्या मुख्य गाभारा बंद होता. आणि मंदिरही नवीन रंगरंगोटी मुळे सजलेय. Happy
आणि मी एकटाच गेलो होतो, बाइक होती, बायको नाही अजून; Happy

आणि ते चीज सारखा आहे तो 'कंदी पेढा'. मस्त चव असते.

सुंदर आहे परिसर, त्या परिसराचे आणखी फोटो हवे होते.

प्रचि १६ सारख्या वाटा म्हणजे माझे सुखनिधान असते ( पण मी त्या वाटेने सरळ जात नाही )

सुंदर.. १९,२० खुप आवडले.

बाणेर-बालेवाडी हुन किती लांब पडेल? पुणे-बेंगलोर हायवे वरुन..

खुप छान आहे हे मंदिर...... मी ७/८ वर्षापुर्वी गेले होते..... तेव्हा काहिच रंगरंगोटी नव्हती. खुप शांत वाटत तिथे... खुप आठवणी जाग्या झाल्या.

धन्स रंगासेठ Happy फोटो पण फार सुरे़ख आहेत.

रंगासेठ, मस्त फोटो आहेत सगळे! मॅक्रोज जबरी+१

शाळेत असताना आमची ट्रिप गेली होती तिथे(१६-१७ वर्षे झाली असतील आता). सगळा परिसर ओसाड दिसत होता. धबधबा तर पार आटला होता. त्यानंतर तिथे कधी जावेसे वाट्ले नाही आणि गेलेही नाही. त्यामुळे बनेश्वर म्हटले कि तेच दृश्य आठवते.

महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या.>>>बापरे अशा थंड, अंधा-या बोळात हात घालायची मला प्रचंड भिती वाटते.

Pages