यंदा पाऊस तसा उशिराच बरसला, त्यामुळे पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला जास्त वेळ मिळाला नाही. तसेच नोकरी बदलली म्हणून 'नोटीस पिरिअड' मध्ये सुट्टी पण मिळणार नव्हती, पावसात भिजून कॅमेरा खराब होईल ही भिती पण वाटत होती . असेच ४-५ विकांत वाया गेल्यावर आणि लोकांनी काढलेले सुंदर-सुंदर फोटो पाहून ट्रीप काढायचीच ही इच्छा प्रबळ झाली. नेमका त्याच विकांताला मी एकटा, त्यामुळे पुण्याजवळच कुठेतरी जाऊ असं ठरवलं आणि रविवारी 'बनेश्वर'ला जायचं ठरलं.
पुण्यापासून साधारणतः ३५-३६ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे, पुणे-सातारा मार्गावर खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडून पुढे गेल्यावर 'नसरापूर' साठी फाटा लागतो. राजगड-तोरणाला भेटी देणार्यांना हा रस्ता माहितच असेल. वाटेत हिरवा निसर्ग हा भवतीने लागतच होता.
प्रचि-१
कात्रज बोगद्याच्या तोंडावर मर्कटसभा भरली होती, लोकं काहीबाही खायला देत होती.
प्रचि-२
त्या फाट्यापासून २-३ कि.मी. अंतरावर बनेश्वराच मंदिर लागतं. एकच रस्ता आहे आणि गावातूनच जात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. गाव ओलांडून शेवटच्या टप्प्याला लागल्यावर मस्त निसर्ग सौंदर्य साथ देत राहतं. पावसाळ्याच्या २-३ महिन्याच्या काळात भेट देण्यासारखं उत्तम ठिकाण त्यात शंकराचं स्थान असल्यामुळे श्रावणात तूफान गर्दी. या भेटीतील काही प्रचि खाली देतोय.
या मंदिराचा थोडक्यात इतिहास हा दर्शनीभागातच वाचायला मिळतो.
प्रचि-३
बनेश्वर मंदिर
प्रचि-4
प्रचि-5
प्रचि-6
प्रचि-7
मंदिरातील एका कुंडात काही कासवे आहेत.
प्रचि-8
प्रचि-९
प्रचि-10
प्रचि-11
प्रचि-12
प्रचि-13
प्रसादाचा चविष्ट कंदी पेढा,
प्रचि-14
प्रचि-15
मंदिरा जवळूनच नदी वाहते आणि एक सुंदर धबधबा देखील आहे. ही त्या धबधब्याकडे नेणारी वाट.
प्रचि-16
धबधबा व परिसर. पाऊस असल्याने खाली पर्यंत जाण्याच्या वाटा प्रचंड निसरड्या झाल्या होत्या. त्यामुळे वरुनच दर्शन घ्याव लागलं.
प्रचि-17
प्रचि-18
पावसाळ्यामुळे मिळालेले काही मॅक्रो शॉट्स.
प्रचि-19
प्रचि-20
जुना कात्रज बोगदा
प्रचि-२१
माझी सहचारिणी
प्रचि-२२
संपूर्ण प्रवास बाइकवरुन केला आणि मस्त पाऊसात भिजल्यामुळे यंदाचा पावसाळा थोड्याप्रमाणात का होईना सार्थकी लावला.
मस्त
मस्त
मस्त मस्त मस्त!!!!
मस्त मस्त मस्त!!!!
ह्याच शनिवारी होति मी नसरापुर
ह्याच शनिवारी होति मी नसरापुर बनेश्वर
अतिशय छान आहे हे ठिकाण
बनेश्वरचं मंदिर पण रंगवून
बनेश्वरचं मंदिर पण रंगवून झालं की...
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्तच!!!
मस्तच!!!
एक नंबर फोटू.. ते चीज सारख
एक नंबर फोटू..
ते चीज सारख काय ठेवलाय खायला
भारी दिसतंय
आणि बायकू कुठली म्हणायची तुमची होंडा दिसतेय
अरे वाह, रंगरंगोटी झालेली
अरे वाह, रंगरंगोटी झालेली दिसतेय मंदिराची.
सुरेख प्रची
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.
दवबिंदुंच्या प्रची सुंदर.
अप्रतिम.......... बाकी शब्द
अप्रतिम.......... बाकी शब्द नाहीतच या प्रचिंना...........
बनेश्वरचं मंदिर पण रंगवून
बनेश्वरचं मंदिर पण रंगवून झालं की...
>>> हिमांशु + १
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.
>>> शुके ही माहिती मला नव्हती.
अप्रतीम प्र.ची.
व्वा रंगासेठ काय एकेक प्रचि
व्वा रंगासेठ
काय एकेक प्रचि आहेत
सुंदर
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे.<<<<
शुके हा प्रकार यवत जवळच्या भुलेश्वर मंदिरात आहे
सगळेच प्रचि मस्तच शुके हा
सगळेच प्रचि मस्तच
शुके हा प्रकार यवत जवळच्या भुलेश्वर मंदिरात आहे>>>>+१
छान प्रकाशचित्रे..!
छान प्रकाशचित्रे..!
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर
आम्ही पुर्वी जायचो तिथे तर महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या. आता बहुदा ते बंद केलेले आहे. >> खरंय! आम्ही शाळेच्या ट्रीप सोबत गेलो होतो तेव्हा पाहिल्या/ हाताने चाचपडल्या होत्या.
धन्यवाद, सध्या मुख्य गाभारा
धन्यवाद, सध्या मुख्य गाभारा बंद होता. आणि मंदिरही नवीन रंगरंगोटी मुळे सजलेय.
आणि मी एकटाच गेलो होतो, बाइक होती, बायको नाही अजून;
आणि ते चीज सारखा आहे तो 'कंदी पेढा'. मस्त चव असते.
सुंदर आहे परिसर, त्या
सुंदर आहे परिसर, त्या परिसराचे आणखी फोटो हवे होते.
प्रचि १६ सारख्या वाटा म्हणजे माझे सुखनिधान असते ( पण मी त्या वाटेने सरळ जात नाही )
भारी फोटु
भारी फोटु
सुंदर.. १९,२० खुप
सुंदर.. १९,२० खुप आवडले.
बाणेर-बालेवाडी हुन किती लांब पडेल? पुणे-बेंगलोर हायवे वरुन..
सुंदर एक चक्कर मारावीच लागणार
सुंदर
एक चक्कर मारावीच लागणार आता
खुप छान आहे हे मंदिर...... मी
खुप छान आहे हे मंदिर...... मी ७/८ वर्षापुर्वी गेले होते..... तेव्हा काहिच रंगरंगोटी नव्हती. खुप शांत वाटत तिथे... खुप आठवणी जाग्या झाल्या.
धन्स रंगासेठ फोटो पण फार सुरे़ख आहेत.
सुंदर फोटो!!! १०, १२, १३, १६,
सुंदर फोटो!!!
१०, १२, १३, १६, १९ विशेष आवडले
लहानपणी शाळेतुन बनेश्वर ला ट्रिप गेली होती
अरे देवा!! ती रंगरंगोटी फोटो
अरे देवा!! ती रंगरंगोटी
फोटो खासच.
फोटो मस्तच. मॅक्रोज जबरी
फोटो मस्तच.
मॅक्रोज जबरी
बनेश्वरला जायच आहे.
धबधबा नाही का पाहता येत जवळुन?
मला एक पण फोटो दिसत नाहिये
मला एक पण फोटो दिसत नाहिये
रंगासेठ, मस्त फोटो आहेत सगळे!
रंगासेठ, मस्त फोटो आहेत सगळे! मॅक्रोज जबरी+१
शाळेत असताना आमची ट्रिप गेली होती तिथे(१६-१७ वर्षे झाली असतील आता). सगळा परिसर ओसाड दिसत होता. धबधबा तर पार आटला होता. त्यानंतर तिथे कधी जावेसे वाट्ले नाही आणि गेलेही नाही. त्यामुळे बनेश्वर म्हटले कि तेच दृश्य आठवते.
महादेवाच्या पिंडीवरचे लिंग बाजुला करुन आत चांगला खांद्यापर्यंत हात घातल्यावर हाताला अजुन चार्-पाच छोट्या छोट्या पिंडी लागायच्या.>>>बापरे अशा थंड, अंधा-या बोळात हात घालायची मला प्रचंड भिती वाटते.
सहीच रे... मॅक्रोज
सहीच रे...
मॅक्रोज खासच...
क्लॅरीटी पण मस्त आहे.
खुप गोड आठवणी आहेत हे मंदीर
खुप गोड आठवणी आहेत हे मंदीर आणि या परिसराशी निगडीत..
धन्यवाद रंगासेठ छनच आलेत फोटो..
सगळे प्रचि मस्त . फोटोशॉप चा
सगळे प्रचि मस्त .
फोटोशॉप चा वापर आहे का?
व्वा! मस्तच !
व्वा! मस्तच !
Pages