श्री-लंका टूर

Submitted by avani1405 on 21 August, 2012 - 04:28

आम्ही नोव्हेंबर मध्ये श्रीलंका ट्रिप प्लॅन करतोय..
काही अनुभवाचे सल्ले देउ शकाल का?

रिसॉर्ट ची माहिती, टूर एजन्सी बद्दल वगेरे माहिती दिली तर बरे होईल.. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील दुव्यावर तुम्हाला श्री-लंके विषयी अधिक माहीती मिळू शकते-

पाचूचे बेट - १

पाचूचे बेट - २

पाचूचे बेट - ३

पाचूचे बेट - ४

पाचूचे बेट - ५

पाचूचे बेट - ६

आम्ही कोलंबोच्या `अ‍ॅडव्हेंचर लंका' एजंटकडून कोलंबो ते कोलंबो पॅकेज घेतलं होतं. छान अनुभव आहे त्यांचा. इमेलवर प्राथमिक माहिती, आणि एक - दोन फोन कॉलमध्ये त्यांनी सगळं अरेंज करून दिलं होतं. (http://www.adventurelanka.co.uk/)

सासुबाई केसरी टुर्ससोबत चालल्या आहेत ऑक्टोबरात. डिटेल्स माहिती नाहीत पण केसरी ऑफिसमध्ये मिळतीलच.

अवनी,
नूरलिया (नुवारा-इलिया) बघायचं चुकवू नका आणि तिथल्यासाठी गरम कपडे सोबत ठेवा. खूप थंडी असते तिथे. आमची चांगलीच फजिती झाली होती.

रामायण टूर, जंगल टूर, प्रसिद्ध ठिकाणांची टूर असे वेगवेगळे पर्याय असतात. आमच्यासोबत साबा आणि लेक असल्याने आम्ही साधी म्हणजे फक्त प्रसिद्ध ठिकाणांची टूर घेतली होती.
(मला जंगल टूर करायची होती. पण लेक सोडून उरलेल्या दोघांनी अगदीच थंड रिस्पॉन्स दिल्याने ते बारगळलं :फिदी:)
आम्ही पोलन्नरूवा, पिनावाला, सिगिरिया, रंबोद, कँडी, नूरलिया पाहिले.

श्री लंका म्हटले की मला 'द ब्रिज ऑन रिव्हर क्वाय ' हा चित्रपट आठवतो. स्टोरी ब्रम्हदेशची असली तरी शूटिंग लंकेतले आहे...

तुम्ही भारतातुन जाताहेत का? मला पण जायची खुप इच्छा आहे. जाउन आल्यावर नक्की डिटेल मध्ये माहिती द्यावी ... Happy