V.A.T.

Submitted by दक्षिणा on 14 August, 2012 - 02:56

दोन दिवसांपुर्वी बिल्डरकडून आमच्या सोसायटीतील सर्वांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात एप्रिल २००६ ते एप्रिल २०१० मध्ये घर घेतलेल्यांना व्हॅटची अमाऊंट + १५% व्याज दरवर्षी याप्रमाणे देण्याची सूचना आहे. त्यानुसार सोसायटीची मिटींग झाली. पण ती व्हॅट ची रक्कम एक्झॅक्टली कशी कॅल्यूलेट करतात ते माहीती नाही.
माझ्या माहीतीप्रमाणे अ‍ॅग्रीमेंट व्हॅल्यूच्या १% इतकी ती असते. कुणी म्हणतं की ०.५% आहे तर काल आमच्याच सोसायटीतल्या एका जोडप्याने मला ती रक्कम ५% सांगितली.
जेव्हा घर घेतलं तेव्हा बिल्डरच्या ऑफिसात नोटिस लावली होती व्हॅटचा अतिरिक्त चेक देण्याबद्दल त्यात असं ही लिहिलेलं होतं की जर हा कायदा लागू झाला नाही तर तो चेक न भरता परत करण्यात येईल. मी विचारणा केली तेव्हा तुम्ही चेक देऊ नका असं मला सांगण्यात आलं होतं. ही घटना ऑगस्ट २००९ ची आहे.
मला खालिल माहीती हवी आहे.
* व्हॅट नक्की कसा कॅल्क्युलेट करतात?
* १५% व्याज दरवर्षीप्रमाणे हे नक्की कुणी भरायचंय? बिल्डर ने की ज्याने घर घेतलंय त्याने? कारण याविषयी अपिल हे बिल्डरने केलं आहे. तेव्हाच मागितले असते तर पैसे आम्ही भरले असते. हा निष्कारण भुर्दंड आहे.
* कायदेशिर मार्गाने यावर इलाज काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

RTI खाली अर्ज करून बिल्डरने आपल्या प्रोजेक्टसाठी किती व्हॅट भरला हे माहित करता येईल. पहायला हवं.

मोकीमी, अतिशय उपयुक्त माहिती सोप्प्या शब्दात दिलित, धन्यवाद. > +१

मी २००८ मधे रेडी पझेशन फ्लॅट घेतला आहे. फ्लॅट वर घेतलेल्या लोन च्या (SBI) कागद्पत्रात फ्लॅट रेडी असलेला स्प्ष्ट उल्लेख आहे, तसेच बिल्डरने पण त्यावेळेस प्रोव्हीजनल पझेशन लेटर दीले होते. परंतू बिल्डरने कंप्लीशन सर्टीफिकेट २०१० मधे घेतले आहे. सदर केस मधे मला VAT भरावे लागेल का? SBI ची कागद्पत्रे फ्लॅट रेडी पझेशन असल्याचा पुरावा म्हणुन मान्य होतील का?

सचिन

इकडे "बिल्डींग रेडी" चा अर्थ ज्याला मुन्सीपाल्टीचे कंप्लीशन मिळाले आहे ( ओ.सी) हा होतो.

तुमची बिल्डींग बांधुन रेडी होती. आर्किटेक्ट ने तसे सर्टीफिकेट SBI ला दिलेले आहे. त्या नुसार तुम्ही पैसे भरुन तिथे रहाण्यासही गेलात. पण तांत्रीक दृष्ट्या ही इमारत २०१० मधे पुर्ण झालेली आहे.

त्या मुळे बिल्डरची जर असेसमेंट झालीच ( व्हॅट ची) तर त्यात हा मुद्दा येवु शकतो. अत्ता तरी त्या वर न बोलणे बरे.

त्या बिल्डर ने जर तुम्हाला व्हॅट भरायची नोटीस दिलीच तर त्यात तुम्ही ते सर्टिफिकेट व SBI ची कागद पत्रे दाखवु शकता. कारण करारात पण तसे लिहिलेले असेलच की पैसे १००% ड्यु आहेत म्हणुन. याचाच अर्थ तुम्ही पुर्ण रेडी फ्लॅट घेतलात हे सिद्ध होवु शकते.

खुप खुप धन्यवाद मोकीमी. बिल्डर ने व्हॅट भरायची नोटीस दिली आहे म्हणुन आम्ही त्याला १ महीन्यानंतरचा PDC दिला आहे. आता त्याला हे सगळे पुरावे दाख्वुन तो चेक कॅन्सल करायला लावतो (त्याने नाहीच ऐकले तर Stop Payment)

ओ सी आणणे हे सर्वस्वी बिल्डर ची जबाबदारी आहे. त्यात जर त्याने उशीर केला तर तो त्याचा प्रष्ण आहे. त्याचा काच तुम्हाला का? पैसे घेताना, करार करताना त्याने इमारत पुर्ण दाखवली होती व तसे आर्किटेक्ट्चे संमती पत्र ही त्याने तुम्हाला/बँकेला दिले होते. मग ह्याचा च अर्थ की तो फ्लॅट करार होते वेळी "पुर्ण" होता.

मग त्या वर व्हॅट कसा काय भरणार. ओ.सी. हा बिल्डर ने आणायचा कागद आहे.

आताच बिल्डरकडुन फोन आला. वॅट ५% प्रमाणे भरा. दंडाची रक्कम सोडुन देतो. मी म्हटलं की नंतर १% असं शासनाने घोषित केलं तर?? मग रक्कम परत करु म्हणाले.

आमची केस अशी आहे
आमच्या अ‍ॅग्रीमेण्टमध्ये क्लॉज आहे व आमच्या सी ए प्रमाणे आम्हाला वाढीव व्हॅट द्यावा लागेल
परन्तु------------
१)२ सप्टेबरला त्याने ५ टक्क्याप्रमाणे नोटिस पाठवली आणि ७ दिवसात पैसे भरायला सान्गितले.
२) आम्ही २२ ऑक्टोबरला सी ए च्या सल्ल्यानुसार पत्र पाठविले की हिशेब पाठव आणि तुझा टिन नन्बर दे व तुझ्या सी ए कडून हिशेब सर्टिफाय करून दे.एवढे केले की आम्ही पैसे भरायला तुझ्या बरोबर येतो व लगेच तुला पैसे देतो
३) या पठ्ठ्याने १५ ऑक्टोबर पर्यन्त टिन नन्बरच घेतला नाही.
४) ३० ऑक्टोबरला बिल्डरने पत्र दिले की तुम्ही पैसे भरले नाही म्हणून मी टिन घेतला नाही आणि तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून मी भरले ही नाहीत. आता पेनाल्टी लागली तर जबाबदारी माझी नाहीच.
५) आमच्या सी ए ने सान्गितले की टिन नन्बर न घेण्याचा आणि पैसे न भरण्याचा सन्बन्ध नाही तसेच उत्तर पाठविले की हिशेब पाठव व व्हॅट भरल्याची पावती दाखव मग पेनाल्टीशिवाय जेवढी बसते तेवढी आम्ही ताबडतोब भरायला तयार आहे.याशिवाय त्याने पैसे भरणे ही त्याचीच जबाबदारी आहे.
मला तर सी ए म्हणाला की त्याने टिन नन्बर न घेण्यसाठी जे कारण पत्रात लिहिले आहे त्याची कॉपी देखील व्हॅट विभागाला द्या .
माबोकरान्चे काय मत आहे प्लीज?

दक्षिणा तुमच्या बिल्डरला तुम्हाला रिसीट देताना रिसिट वर व्हॅट लिहावाच लागेल.. कारण बिल्डर त्याच्याच आधारावर व्हॅट भरेल.. ती रिसीट टॅक्स इन्व्हॉईस अशी असणे अपेक्षित आहे..

रेव्यु.. तुमच्या सीएने तुम्हाला योग्यच सांगितले आहे..

रेव्यु जी

तुमचा सी.ए ने योग्य सल्ला दिलेला आहे. तुम्ही हिशोब मागुन घेतल्या शिवाय पेमेंट करु नका. त्याने टिन नंबर घेतला नाही, त्याने पैसे भरलेले नाहीत, त्याने कायदा मोड्ला आहे, तुम्ही नाही.

तुम्ही पैसे देत नाही म्हणुन तो रजिस्टर होत नाही, हे त्याचे प्रतिपादन एकदम हस्यास्पद आहे. आज कायदा सांगतो की व्हॅट हा बिल्डर वर आहे. कारण तो व्यावसायिक आहे. त्याने तो सरकारला भरायचा आहे. तो तुमच्या करारा प्रमाणे तुमच्या कडुन वसुल करतो का आपल्या खीशातुन भरतो, हा त्याचा प्रश्ण आहे. रजिस्टर त्याने व्हायचे आहे. तुम्ही नाही. त्यामुळे सरकार त्याला नोटिस पाठवणार, त्याला दंड लावणार तुम्हाला नाही.

आमच्या कडुन विकासकाने ३% व्हॅट मागितला आहे.
आमच्याकडे ४०% सदनिका विकासकाने जागा मालकाला दिल्या आहेत. व्हॅट नियमाप्रमाणे त्या सदनिकांवर व्हॅट नाही.
विकासकाकडे टीन न. मागितला, व्हॅट भरल्याची पावती मागितली, पण तो देत नाही.
९०% सदनिकाधारक (ज्यांना व्हॅट लागु आहेत त्यापैकी) पेनल्टीच्या भितीमुळे व्हॅट भरुन आले. आत्ता व्हॅट भरावा की नाही ?

Pages