V.A.T.

Submitted by दक्षिणा on 14 August, 2012 - 02:56

दोन दिवसांपुर्वी बिल्डरकडून आमच्या सोसायटीतील सर्वांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात एप्रिल २००६ ते एप्रिल २०१० मध्ये घर घेतलेल्यांना व्हॅटची अमाऊंट + १५% व्याज दरवर्षी याप्रमाणे देण्याची सूचना आहे. त्यानुसार सोसायटीची मिटींग झाली. पण ती व्हॅट ची रक्कम एक्झॅक्टली कशी कॅल्यूलेट करतात ते माहीती नाही.
माझ्या माहीतीप्रमाणे अ‍ॅग्रीमेंट व्हॅल्यूच्या १% इतकी ती असते. कुणी म्हणतं की ०.५% आहे तर काल आमच्याच सोसायटीतल्या एका जोडप्याने मला ती रक्कम ५% सांगितली.
जेव्हा घर घेतलं तेव्हा बिल्डरच्या ऑफिसात नोटिस लावली होती व्हॅटचा अतिरिक्त चेक देण्याबद्दल त्यात असं ही लिहिलेलं होतं की जर हा कायदा लागू झाला नाही तर तो चेक न भरता परत करण्यात येईल. मी विचारणा केली तेव्हा तुम्ही चेक देऊ नका असं मला सांगण्यात आलं होतं. ही घटना ऑगस्ट २००९ ची आहे.
मला खालिल माहीती हवी आहे.
* व्हॅट नक्की कसा कॅल्क्युलेट करतात?
* १५% व्याज दरवर्षीप्रमाणे हे नक्की कुणी भरायचंय? बिल्डर ने की ज्याने घर घेतलंय त्याने? कारण याविषयी अपिल हे बिल्डरने केलं आहे. तेव्हाच मागितले असते तर पैसे आम्ही भरले असते. हा निष्कारण भुर्दंड आहे.
* कायदेशिर मार्गाने यावर इलाज काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००६ ते एप्रिल २०१० मध्ये घर घेतलेल्यांना व्हॅट भरावा लागतो
माझ्या माहीति प्रमाणे, १% च आहे आणि मि सुधा १% च भरला अस आठवते (नक्कि नाही)
१५% व्याज दरवर्षीप्रमाणे हे नक्की कुणी भरायचंय << ज्याने घर घेतलंय त्याने च Sad
कायदेशिर मार्गाने यावर इलाज काय? << सर्व मीळुन बिल्डर वर केस करा

माझ knowledge अपुर्ण आहे, क्रुपया तज्ञाचा सल्ला घ्या

मालाच्या विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावरील वाढत्या मुल्यावर व्हॅट आकारला जातो.
फ्तॅटवर फक्त एकदाच खरेदी करताना आकारला जातो
दरवर्षी नाही.

VAT रेट जानकार व्यक्ति कडून तपासून घ्या
व्याज हे बिल्डरनेच भरायला हवे कारण vat तो उशिरा भरतो आहे.

मी जुलै २००९ मधे घर बूक केलं आणि अ‍ॅग्रीमेंट ऑगस्ट २००९ मध्ये झालं.
तेव्हा माझ्याकडून व्हॅट घेतला गेला नाही. बिल्डर तो आता मागतोय ते ही व्याजासकट. तेव्हा हा कायदा लागू होता की नाही माहीती नाही. पण बिल्डरने दिलेल्या माहीतीनुसार तेव्हा कोर्टाचा निकाल लागायचा होता.
घर ऑलरेडी हातात मिळालं आहे जानेवारी २०१२ ला. पण पझेशन लेटर वगैरे मिळालेलं नाहिये.

हे पीनल इन्टरेस्ट आहे. म्हणजे वेळीच वॅट न भरल्याने आलेले दंडात्मक व्याज. बिल्डर भरेल पण तुमच्याकडून घेऊन . वस्तु उदा:- मोबाईल, खरेदी करताना बिलात दाखवलेला वॅट कोणाकडून भरला जातो आणि वसूल कोणाकडून केला जातो? तुमच्याकडून वसूल पण भरतो विक्रेता ना?

मी जुलै २००९ मधे घर बूक केलं आणि अ‍ॅग्रीमेंट ऑगस्ट २००९ मध्ये झालं.
<< मी सुधा २००९ मधेच बुक केले होते आणि VAT 2011 मधे भरला व्याजासकट Sad
पण बिल्डर ने तुम्हाला सांगायला हवे होते, तुम्ही त्याला भरायला सांगा, त्याची चुक आहे

बिल्डरचं म्हणणं आहे की तो आमच्या बाजूने लढत होता म्हणे कोर्टात.. की हा कायदा एप्रिल २०१० च्या आधी घर घेतलेल्यांना लागू होऊ नये म्हणून, पण कोर्टाने नामंजूर करून म्हणे आता हा कर भरायला सांगितला आहे. Sad

तुम्हाला अजुन पझेशन मिळाले नसल्यामुळे, बिल्डर तुमच्याकडुन च वसुल करेल. तो पर्यन्त पझेशन देणार नाही तो Sad

आम्हाला पण आधी VAT बद्दल कहिही सांगितले नव्हते ... पण Apr. 12 मध्ये सांगितले कि बिल्डर आमच्या बाजूने लढत होता म्हणे कोर्टात... आणी आता १% VAT भरावा लागेल... पझेशन लेटर मिळाले नसते ... सो गप्पपणे भरला

१५% व्याज किस खुशी में भरायचं<< दु:खात, पण भरावेच लागतिल, मी माझि चुकि नसताना १८००० व्याज भरला Sad

कोर्टाने तुमचं म्हणणं नाकारल्याने तुमची देय दिवसापासून कायद्यानुसार व्याजाची लायबिलिटी लागू झालीच ना.अर्थात १०० रुपये व्याज असताना बिल्डर पुन्हा त्यात १२५ रु घेऊन 'हात मारीत' नाहीना हे पहा Happy जसे ५ लाखाच्या इलेक्ट्रिक सप्प्लाय साठी प्रत्येक जनाकडून ५०००० रु वसूल करून त्यातही मार्जीन मारतात तसे....

रतन १८०००? दॅट्स टू मच << VAT चा नाही, लेट पेमेंट, त्यांची चुक असताना, डिंमाड लेटर लेट पाठविले आणी माझ्याकडुन व्याज वसुल केले. खुप राग येत होता पण क्कय करणार?? आपण काहिच करु शकत नाही

ही थोडी माहिती नेटवर सापडली,
http://taxguru.in/goods-and-service-tax/faqs-applicability-vat-sales-tax...

त्यातला काही भाग खाली पोस्ट केला आहे.

16. What are the various options available to the developers for disclosing tax liability?

Ans: Developers can discharge their tax liability by any of the following option:-

From 20.06.2006 to 31.03.2010

1. Composition Scheme U/s 42 (3)- Under this scheme developer has to pay 5% tax on the agreement value. Land deduction is not available. Input tax credit is available subject to the reduction of 4 per cent.
2. Actual Expense Method U/r 58- Under rule 58, the deduction of Labour 86 service charges is available on actual basis. Land deduction is also available. Set-off will be calculated subject to the condition u/r 53 and 54.

3. Standard Deduction Method U/r 58- Under rule 58, the deduction of land cost will be allowed. Thereafter 30% standard deduction from remaining amount will be available as per proviso to sub-rule 1. Set-off will be calculated subject to the condition u/r 53 and 54.

After 01.04.2010

The developers can opt for fourth option also, under this option u/s 42 (3A), developer has to pay 1% tax on agreement value. No land deduction and input tax credit is available.

Needless to mention that, the developers will be required to make the payment of interest according to the provisions of law.

म्हणजेच ज्या प्लॅट धारकांचे अ‍ॅग्रीमेंट ०१-०४-२०१० च्या आधी झाले आहे त्यांना वरील तिन पैकी एका मेथड नुसार calculation करून भरावे लागेल. तेव्हा व्हॅट रेट ५% इतका होता

तर ०१-०४-२०१० नंतर केलेल्या अ‍ॅग्रीमेंट साठी १% नविन मेथड नुसार

+ १५% द.सा.द.शे. व्याजही द्यावे लागेल.

तुमच्या बिल्डरने कदाचीत याचाही उल्लेख करारनाम्यात केला असेलही. जर केला नसेल तर त्याला त्याच्या खिशातून हे पैसे भरावेच लागतील

व्हॅट + सर्विस टॅक्स सध्याचा दर टोटल अ‍ॅग्रीमेन्ट व्हॅल्युच्या ४.०६ येतोय.
बिल्डरने आधीच घेवुन ठेवलाय आमच्याकडुन.
सरकारात भरेल तो. वेळेत नसेल भरला तरी त्याची चुकी.
असो.

बिल्डरने आधीच घेवुन ठेवलाय आमच्याकडुन.
सरकारात भरेल तो. वेळेत नसेल भरला तरी त्याची चुकी.
असो.>> झकोबा त्याची रितसर पावती मागून घे. दिलेल्या रक्कमे मधे सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट किती आहे ते.
आणि बिल्डरसाठी १६-०८-२०१२ ही त्याने वॅट चे रजिस्ट्रेशन घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार त्याने तो भरलाही असेल, पण तशी पावती घ्यावी.

व्हॅट नक्की कसा कॅल्क्युलेट करतात? >>> अ‍ॅग्रीमेंट व्हॅल्युच्या १ टक्के

* १५% व्याज दरवर्षीप्रमाणे हे नक्की कुणी भरायचंय? बिल्डर ने की ज्याने घर घेतलंय त्याने? कारण याविषयी अपिल हे बिल्डरने केलं आहे. तेव्हाच मागितले असते तर पैसे आम्ही भरले असते. हा निष्कारण भुर्दंड आहे.
>>> तुम्ही. पण व्याज १५% आहे का? हे तपासून पाहा. मला जास्त वाटत आहे.

* कायदेशिर मार्गाने यावर इलाज काय? >>> काहीच नाही. कारण तसा कायदा येणार होता. व व्हॅट ही बिल्डरची रक्कम नसून सरकारला द्यावा लागणारा टॅक्स आहे.

पूर्वी व्हॅट बिल्डचे पण रजिष्ट्रेशन नव्हते त्यामुळे ते असे भरावे लागेल असे सांगत. जे तुमच्या बिल्डर ने सांगीतले. आता बिल्डरला व्हॅट रजिष्ट्रेषन कंपलसरी आहे त्यामुळे तो अ‍ॅग्रीमेंट करतानाच रक्कम कायदेशीर आहे म्हणून कापून घेतो.

झकासराव सर्व्हिस टॅक्स अन व्हॅट एकत्र करता येत नाही. दोन्ही दर वेगवेगळे.

केदार बरोबर आहे तुझं. पण अ‍ॅग्रीमेंट करतानाच त्याने ही रक्कम घ्यायला हवी होती तेव्हा म्हणजे ही व्याजाची भानगड झालीच नसती. तेव्हा त्याने फक्त नोटिस लावली होती ऑफिसात की असा अमुक अमुक एक कायदा आमलात येणार आहे, तुम्ही ठराविक रकमेचा चेक द्या.. जर कायदा लागू झाला तर तो पुढे प्रोसेस होईल, आणि नाही झाला तर तुमचा तुम्हाला तो चेक परत मिळेल.
मग मी एकदा स्वत:हून विचारलं की कितीचा चेक द्यावा लागेल तर मला तुम्ही देण्याची गरज नाही असं सांगितलं होतं. Uhoh

झकासराव सर्व्हिस टॅक्स अन व्हॅट एकत्र करता येत नाही. दोन्ही दर वेगवेगळे.>>
हो वेगवेगळे आहेत पण बिल्डर सोप कॅल्क्युलेशन म्हणुन एकत्र लावुन करतो टक्केवारी..

पण व्हॅट प्रॉपर्टि अ‍ॅग्रीमेंट रजिस्टर्ड आणि स्टँप ड्युटि भरल्यावरच लागु होतो ना ? आणि तो त्या वेळि लगेच भरलेला चांगला का? म्हणजे व्याजाची भानगडच नको.
बुकिंग अमाउंटवर लागु होत नसावा बहुतेक.

प्रतिभा,
व्हॅट हा टोटल अ‍ॅग्रीमेंट व्हॅल्यूवर कॅल्क्यूलेट करतात.
१ अप्रिल २०१० आणि त्यानंतर झालेल्या अ‍ॅग्रीमेंटसवर १% व्हॅट आणि त्या अगोदर म्हणजे १एप्रिल २००६ ते ३१मार्च २०१० मध्ये झालेल्या अ‍ॅग्रीमेंट्सवर म्हणे ५% व्हॅट आहे (असं म्हणतात) पण तेव्हा नियम क्लियर नव्हता म्हणून बिल्डरने आमच्याकडून व्हॅट अमाऊंट घेतली नव्हती.. म्हणून आत्ता हे प्रॉब्लेम्स फेस करतोय.
१ एप्रिल नंतर ज्यांनी घरं घेतली आयमिन अ‍ॅग्रीमेंट केलं त्यांची व्हॅट अमाऊंट तेव्हाच घेतली बिल्डरने. मग व्याजाची भानगडच नाही काही.

धन्यवाद दक्षिणा, म्हणजे अ‍ॅग्रीमेंट झाल्याशिवाय व्हॅट लागु होणार नाहि तर.
बर वाटल वाचुन कारण सध्या मी फक्त बुकिंग अमाउंटच दिलीये, विचार केला उद्या फायनल पेमेंटच्या वेळी बुकिंगच्या तारखेपासुनचे व्याज मागितले तर. Happy

Pages