काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो --- तरही

Submitted by शेळी on 6 August, 2012 - 12:26

काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो

वाट पाहूनी तुझी सुकली फुले ही येथली
पानगळतीचा ऋतू निर्लज्ज होउन लांबतो

पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर फिरुनी जागतो

रोज नूतन नित्य मुखडा जीवनाने बसवला
आरशातिल मी मला दुसराच कोणी भासतो

कालचे आयुष्य सरले आजचेही चालले
काळ होतो व्याध मी शेळीप्रमाणे चालतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो चारा पाहिला... पण तो कालगंगेच्या पाण्यावर उगवलेला नाही. Proud

आम्ही फक्त कालगंगेच्या काठावरचाच चारा खातो. त्याला कालगंगेत बसवायचे प्रयत्न करु.

आपला कडबा पण द्या ना! की, तो फारच अनमोल आहे? शेळींना न परवडण्याजोगा.>>>>>>>>>

कडबा = हे एकप्रकारचे तृणधान्य असून मका ज्वारी या गटात मोडते
हा पदार्थ गायी म्हशी , बैल याना खातायेतो शेळी सहसा कडबा खात नाही

ती पर्यायाने जरा कोवळा असलेला झाडपाला खाते .उदा: खुरट्या वनस्पती, पालेभाज्या इत्यादी ज्या कोवळ्या मउ, गोडसर चवीच्या म्हणजे मवाळ (मवाळ =की वर्ड) असतात / किमान दिसतात तरी
त्यामुळे मी कडबा देत नाही आहे

शिवाय कडबा शेळीला चालत नाही तसा हा जरा कठोर शब्द असल्याने गझलेलाही चालत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे

असो
खूप बोललो थांबतो

टीप : बेफिकीरजी, आपली सहमती/आक्षेप कळवा!

क्ष.य.ज्ञ.
कडबा आपल्या दृष्टीने, शेळीसाठी, तो चाराच, मग तो कुणाच्याही कुंपणातला असे ना! काय क्ष.य.ज्ञजी, काय भूषणराव?

हिंस्त्र प्राणी मेले तिथे शेळ्या जगल्या म्हणजे कमालच>>>>>

ते कसले मरताय्त अहो बेफीजी ,,,,,,,,,,,,,,,,
जगायचे असेल तर शेळपट बनून जगावे लागेल हे त्या प्राण्याना समजले असावे म्हणून ते या अवतारात प्रकटलेत !!!

त्याचं काय आहे भूषण, महापूरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती अशी म्हण आहे. ते लव्हाळे चरुन शेळी तगली असेल. Light 1 घे शेळे

हे नक्की काय चालू आहे इथे समजू शकेल काय

मलातर 'डब्ल्यू डब्ल्यू एफ्फ' पाहत असल्यासारखे वाटतेय

थोड्या वेळापूर्वी सगळे प्रा साहेबाच्या मागे हात धुवून लागालेले पाहिले होते मी आता पाहतोय तर बिचारी शेळी मार खातेय ........:अओ:

Biggrin Biggrin Biggrin

५१

इथे काय काय होतंय..

शेळी गझल लिहीते, रानडुक्कर, पिसाळलेला हत्ती आणि घुबड वैचारीक चर्चा करतात, कावळा कविता लिहीतो .... हे भगवान. चुकून कात्रज प्राणिसंग्रहालयात तर नाही ना आलो ?

गप्पांच्या धाग्यापेक्षा कविता, गझलेचे धागे गप्पांसाठी सोयीचे पडतात. म्हणून कविता सार्वजनिक करू नका म्हणणा-यांचा निषेध !

काळ नाही वेळ नाही मायबोली पाहतो
या कधी अन त्या कधी धाग्यात कचकच भांडतो.

<<<

Rofl

शेळी | 7 August, 2012 - 20:05 नवीन
फ्लड्डु म्हणजे काय ?<<<

शड्डूचा धाकटा भाऊ

शड्डू बरेच आहेत कैक वर्षांपासून Lol

Pages