काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो --- तरही

Submitted by शेळी on 6 August, 2012 - 12:26

काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो

वाट पाहूनी तुझी सुकली फुले ही येथली
पानगळतीचा ऋतू निर्लज्ज होउन लांबतो

पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर फिरुनी जागतो

रोज नूतन नित्य मुखडा जीवनाने बसवला
आरशातिल मी मला दुसराच कोणी भासतो

कालचे आयुष्य सरले आजचेही चालले
काळ होतो व्याध मी शेळीप्रमाणे चालतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळचे शेर १ आणि ३ :

काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीमध्ये मी जागतो

पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर पुन्हा परततो

अलामत राखायला वरील बदल केले.

अतिशय अर्थपूर्ण द्विपदी, स्वच्छ व सुलभ मात्रे पाहिजेत. आश्चर्यकारकरीत्या 'शेळी' या उपनामाचा परफेक्ट (साला) वापर बिपर केला आहे.

व्वा

बँ बँ करणे सोडा आता कुरुंदवाडकर

परततो यामधे अलामत भंगली आहे का?<<<

ह्यॅ! शेळीचे काही भंगते का कधी? शेळीच भंगण्याशिवाय?

रदीफ 'बेफिकीर' होत काफिया बनायची
तरी न जीवनात भंगवायचो अलामती

रोज नूतन नित्य चेहरा जीवनाने बसवला<<<

(माझी उतरतीय तशी मला एकेक मात्रा गडबडलेली का वाटतीय ? की चढतीय? ) सर्वांना Light 1

चेहरामध्ये मात्रा बिनसल्या 'पुन्न्हा' एकदा!

रोज प्रतिबिंबात खोड्या काढते आयुष्य हे

असे लिहा

चांगला शेर होईल

-'बेफिकीर'!

शेळी | 6 August, 2012 - 22:31 नवीन
समजले.... उच्चार पुन्न्हा होत आहे... बघतो.. काही सुचते का.<<<

अशा वेळी दक्षिण महाराष्ट्रीयांच्या सहाय्याला (सॉरी, बाईंनुसार साहाय्याला) 'फिरुनी' हा शब्द येतो पहा

शेळी | 6 August, 2012 - 22:37 नवीन
चेहर्‍याचा मुखडा केला.. पुन्हा चा फिरुनी केला<<<

गूड

आता शेळीचा जामोप्या करा

(कारण तुमचे प्रतिसाद चित्त्यासारखे असतात, शेळीसारखे नसतात)

शेळीजी नमस्ते !!
आज मी प्रथमच आपल्या लेखनावर प्रतिसाद देत आहे .
प्रा.साहेबान्च्या मूळ रचने पेक्षा तुमच्या रचनेवर जास्त प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले.
तुमच्या पर्यायी रचना नक्कीच मूळ रचनाना तोडीस तोड असतात असे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे.
त्यामुळे त्याना पर्यायी म्हणणे हा तुमच्या प्रतिभेचा अपमान असल्याचे समजून मी त्याना पर्यायी न म्हणता फक्त रचना असेच म्हणीत आहे

पुलेशु

क्ष.य.ज्ञ.
आपणास मात्र पर्याय नाही हो!
आपल्यासारखे आपणच!
बिनतोड!
अजोड!
बेफिकीरजी, आपली सहमती/आक्षेप कळवावा!
......प्रा.सतीश देवपूरकर

देवपूरकर साहेब धन्यवाद !!

शेळी याना नम्र विनन्ती ...
अत्ताच देवपूर्कर महोदयानी आपणास नवीन ताजा चारा उपलब्ध करून दिला आहे ......
आवर्जून खाणे ...........
http://www.maayboli.com/node/36984

क्ष.य.ज्ञ.
आपला कडबा पण द्या ना! की, तो फारच अनमोल आहे? शेळींना न परवडण्याजोगा.
......प्रा.सतीश देवपूरकर

क्ष.य.ज्ञ.
आपणास मात्र पर्याय नाही हो!
आपल्यासारखे आपणच!
बिनतोड!
अजोड!
बेफिकीरजी, आपली सहमती/आक्षेप कळवावा!
<<<

येथेही सहमत आहे प्रोफेसरसाहेब

Pages