मुळशी - ताम्हिणी वर्षा-विहार_२९.०७.२०१२ (वेमा गटग पश्चात)

Submitted by अतुलनीय on 4 August, 2012 - 03:32

मागील रविवारी सकाळी वेमांबरोबर गटग संपन्न झाले. त्यानंतर दिवसभर आराम करायचा विचार होता. पण देव आणी दैवाच्या मनात तसे नसावे. माझ्या सर्व आते भावंडांचा मुळशी - ताम्हिणी येथे वर्षा-विहारासाठी जाण्याचा प्लॅन ठरला होता. मी गटग असल्याने तसेच काही कामे राहिली असल्याने सुरुवातीला मला यायला जमणार नाही असे सांगीतले होते. पण त्या लोकांना निघण्यास तसा उशीर झाला, तसेच इतके दिवस वाट पहायला लाऊन पावसाची रिम्-झीम सुरुवात झाली. त्यामूळे माझ्यासारख्या कट्टर निसर्गप्रेमीला घरी स्वस्थ कसे बसवले असते? त्यामुळे त्यांचा परत एकदा चाचपणी करण्यासाठी फोन आल्याबरोबर मी बायकोला आपण तिकडे जात आहोत असे सांगून टाकले. कॅमेर्‍याची बॅग बाहेर काढली व आम्ही निघालो.
मुळशी येथे पोहोचेपर्यंत तेथे येण्याचा निर्णय बरोबर आहे असे निक्षुन वाटायला लावणारा पाऊस सुरु झाला. शेतकर्‍यांची भात लावणीची गडबड चालू होती. बैल जोड्या शेतात राबत होत्या. आणी झिम्माड पाऊस पडत होता.

Mulshi_2.JPGMulshi_1.JPGMulshi_3.JPG

निसर्ग, डोंगर, शेते, रस्ते पावसामध्ये चिंब न्हायले होते. धरतीने जणू नवे हिरवे वस्त्रच ल्यायले होते.

Mulshi_4.JPGMulshi_5.JPGMulshi_6.JPGMulshi_7.JPGMulshi_8.JPGMulshi_9.JPGMulshi_10.JPG

ट्रायपॉड नसताना प्रवाहाच्या शेजारील दगडावर समांतर कॅमेरा सेट करून १से. च्या शटर स्पीडवर केलेला एक प्रयोग - पहा तुम्हाला आवडतो का?

Mulshi_11.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच....ट्रायपॉड नसताना असा फोटो ..... लईच खास....
रच्याकने, मधल्या दोन फोटोंमध्ये दिसतेय ते रिसार्ट आहे का?

अतुलनीय फोटोज रे.. सुन्दर,ओलाचिम्ब , हिरवागार निसर्ग

शेवटचा फोटो तर एकदम खास... सुपर्ब!!!

सर्वांना धन्यवाद Happy

भारीच....ट्रायपॉड नसताना असा फोटो ..... लईच खास....
रच्याकने, मधल्या दोन फोटोंमध्ये दिसतेय ते रिसार्ट आहे का?>>> हो आषुतोश - हे ग्रीन गेट रेसॉर्ट आहे.

Pages