मागील रविवारी सकाळी वेमांबरोबर गटग संपन्न झाले. त्यानंतर दिवसभर आराम करायचा विचार होता. पण देव आणी दैवाच्या मनात तसे नसावे. माझ्या सर्व आते भावंडांचा मुळशी - ताम्हिणी येथे वर्षा-विहारासाठी जाण्याचा प्लॅन ठरला होता. मी गटग असल्याने तसेच काही कामे राहिली असल्याने सुरुवातीला मला यायला जमणार नाही असे सांगीतले होते. पण त्या लोकांना निघण्यास तसा उशीर झाला, तसेच इतके दिवस वाट पहायला लाऊन पावसाची रिम्-झीम सुरुवात झाली. त्यामूळे माझ्यासारख्या कट्टर निसर्गप्रेमीला घरी स्वस्थ कसे बसवले असते? त्यामुळे त्यांचा परत एकदा चाचपणी करण्यासाठी फोन आल्याबरोबर मी बायकोला आपण तिकडे जात आहोत असे सांगून टाकले. कॅमेर्याची बॅग बाहेर काढली व आम्ही निघालो.
मुळशी येथे पोहोचेपर्यंत तेथे येण्याचा निर्णय बरोबर आहे असे निक्षुन वाटायला लावणारा पाऊस सुरु झाला. शेतकर्यांची भात लावणीची गडबड चालू होती. बैल जोड्या शेतात राबत होत्या. आणी झिम्माड पाऊस पडत होता.
निसर्ग, डोंगर, शेते, रस्ते पावसामध्ये चिंब न्हायले होते. धरतीने जणू नवे हिरवे वस्त्रच ल्यायले होते.
ट्रायपॉड नसताना प्रवाहाच्या शेजारील दगडावर समांतर कॅमेरा सेट करून १से. च्या शटर स्पीडवर केलेला एक प्रयोग - पहा तुम्हाला आवडतो का?
मस्त...
मस्त...
पहिले दोन फोटो आवडले. मस्त.
पहिले दोन फोटो आवडले. मस्त.
मस्त मस्त आम्हीही कालच
मस्त मस्त

आम्हीही कालच मुळशी-ताम्हीणी भटकंती करून आलो, पण दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे फोटो नीट नाही आले.
चला कुठेतरी नीट पाउस पडतोये व
चला कुठेतरी नीट पाउस पडतोये व शेते उभरतायेत हे पाहुन खुपच बरे वाटले.
छान प्रची.
सगळे फोटु जबरी आहेत
सगळे फोटु जबरी आहेत
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
व्वा...अगदी झिम्माड पाऊस!
व्वा...अगदी झिम्माड पाऊस! शेवटचा फोटो क्लासच!
व्वा.. खुप सुंदर प्रचि
व्वा.. खुप सुंदर प्रचि
अतुल अप्रतिम सहल केलिस आणि
अतुल अप्रतिम सहल केलिस आणि फोटोज पण जबरदस्त आहेत.

शेवटचा फोटो हा प्रयोग असला तरिही महजबरी आलाय.
मस्त
मस्त
Pages