पंजाबी ग्रेव्हीतली मॅकरोनी

Submitted by प्राची on 3 August, 2012 - 07:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मॅकरोनी चे एक पाकिट,
कांदा,
आलं-लसूण पेस्ट,
टोमॅटो,
फ्लॉवर, बीन्स, मटारदाणे, सिमला मिरची वगैरे भाज्या आवडीनुसार बारीक चिरून,
धणे-जिरेपूड,
गरम मसाला,
हळद,
लाल मिरची पावडर,
मीठ,
कोथंबीर,
पाणी

क्रमवार पाककृती: 

१. कांदा मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावा.
२. टोमॅटोची प्युरी करून घावी.
३. कुकरमध्ये थोडे तेल घ्यावे. तेल तापताच त्यात कांदापेस्ट घालावी.
४. आलं-लसूण पेस्ट घालून परतावे.
५. हळद घालून परतून घ्यावे.
६. टोमॅटो प्युरी घालून ढवळावे. इतर भाज्या घालणार असाल तर त्याही घालून परतून घ्याव्या.
७. त्यात धणेजिरेपूड, गरममसाला, लाल मिरची पावडर घालून मिक्स करावे.
८. कच्ची मॅकरोनी घालून ढवळावे.
९. वरून मीठ घालून परत नीट ढवळून घ्यावे.
१०. आता त्यात १ वाटी मॅकरोनीला साधारण तीन-साडेतीन वाट्या प्रमाणात गरम पाणी घालावे.
११. शिट्टी न लावताच कुकरचे झाकण लावावे.
१२. वाफ येऊ लागली की गॅस बारीक करावा.
१३. साधारण १०-१२ मिनिटांनी गॅस बंद करावा.
झाकण उघडून कोथिंबीर घालावी.
१४. गरम गरम मॅकरोनी वाढावी.

वाढणी/प्रमाण: 
सांगता येणार नाही.
अधिक टिपा: 

१. यात भाज्या न घालताही मस्त लागते हे गरम गरम खायला.
२. ग्रेव्ही जरा पातळच असावी. त्यानुसार, पाण्याचे प्रमाण ठरवावे.

माहितीचा स्रोत: 
मॅकरोनीच्या पाकिटावर लिहिलेली रेसिपी (ब्रॅण्ड आठवत नाही.)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॅम्बिनोची मिळते इथे मॅकरोनी. मस्त होते अशी. पण मी कूकरमध्ये नाही केली कधी. आधी हक्का नूडल्स सारखी नुसतीच मॅकरोनी शिजवून घेते आणि मग ग्रेव्ही करून त्यात परत शिजवते.

प्राची, फोटो Happy

है शाब्बास..
हाच प्रकार मी ऑन साईटला गेले की करते अधूनमधून. फक्त एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स नाही वपरत. आणि मिक्सर पण नाही. मिक्स वेज ची पाकिटे, आणि सगळीकडे मॅकरोनी, पेन्न आणि स्पॅघेट्टीचे मोठमोठे पुडे यामुळे..
मागच्या वेळी तर आठवड्यातून एकदा एवढ्या फ्रिक्वेन्सीने केला कारण चपात्या करायच्याच नाहीत एकटीसाठी हे ठरवले होते Happy त्यामुळे असे सोपे ऑप्शन्स फार कामी आले.

Masta!!

मस्त... ह्यात स्पायसीनेस कमी करायचा असेल तर इतर पंजू रेसिपीज प्रमाणे दही / क्रीमही घालता येईल बहुतेक!