इडली मांचुरीयन - इंडो चायनीज प्रकार

Submitted by यशस्विनी on 3 August, 2012 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. इडल्या ( यात तुम्ही ताज्या इडल्या वापरू शकता किंवा नाश्टयाला बनवलेल्या शिल्लक असतील तर त्या देखील चालतील Happy )
२. मैदा
३. कॉर्नफ्लॉवर
४. मीठ
५. साखर
६. तेल
७. पातीचा कांदा (बारीक चिरलेला)
८. लसुन पेस्ट
९. सोया सॉस
१०.टोमॅटो सॉस
११. चिली सॉस
१२.व्हिनेगर
१३.कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम इडलीचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
२. एका मोठ्या बाउलमध्ये मैदा चाळुन घ्या, त्यात थोडे कॉर्नफ्लॉवर, चवीपुरते मीठ घाला, यात थोडे थोडे पाणी घालुन मिश्रण एकजीव करा. मिश्रण भजीच्या पिठाएवढे पातळ हवे.
३. कढईत तेल गरम करुन त्यामध्ये इडलीचा एक एक तुकडा मैद्याच्या पीठात घोळवुन घाला.
४. इडलीचे तुकडे चांगले सोनेरी रंग येईल इतपत तळा.
५.आता एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात बारीक चिरलेला पातीचा कांदा घालुन हलका गुलाबी परता.
६. त्यामध्ये लसुन पेस्ट घाला, ती परतल्यावर त्यामध्ये मीठ, दोन चमचे सोया सॉस, ५ चमचे टोमॅटो सॉस, एक चमचा व्हिनेगर, एक चमचा चिली सॉस घाला( जास्त तिखट हवे तर अजुन एक चमचा घाला), यातच चिमुटभर साखर घाला
७. आता या मिश्रणात मैद्याच्या पीठात तळलेली इडली घाला व चांगली परतुन घ्या.
८. यावर बारीक चिरलेली कोथिंबिर घालुन गरम गरम सर्व्ह करा Happy

माहितीचा स्रोत: 
सिंगापुरातील हॉटेलात मिळणारा पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मग तुम्ही काय केलंत?

<<<<<<

Lol

मी तेच विचार करत होते की अजुन मला हा प्रश्न कोणी विचारला कसा नाही,कारण आज मी मायबोलीवर तीन तीन पाकृ टाकल्या व सर्वांवर चित्र आंतरजालावरुन टाकली आहेत , तर मोहीनी ते काय झाले मला हे पदार्थ चांगले करता येतात व त्यामुळे या पाकृ मायबोलीवर शेअर कराव्यात असे वाटले. ज्यावेळी मी या घरी केल्या होत्या त्यावेळी ते करण्यात व त्याचा मस्तपैकी आस्वाद घेण्यात इतका वेळ गेला की त्याचे फोटो काढणे राहीले.... मायबोलीवरील प्रथेप्रमाने आपण केलेल्या कृतीचा फोटो इथे डकवावा लागतो हे मला मी नवीन सदस्या असल्यामुळे आताच कळले आहे..... त्यामुळे आता कोणताही पदार्थ करुन झाला रे झाला की हात धुउन लगेच जाउन आधी फोटो काढीन म्हणजे कोणी पुन्हा असले प्रश्न विचारायला नकोत Proud

व्हिनस मलाही वाटलेच होते अजून तुला असा प्रश्न कुणी कसा विचारला नाही म्हणून्.:फिदी:

असो कृती मस्त आणी टेस्टी दिसतेय. आमच्याकडे इडल्या केल्या की उलट जास्त उरतात, कारण केल्या केल्या जातही नाहीत आणी मी फारशी इडली प्रेमी नाही, पण या कृतीप्रमाणे उलट चवदार डिश मिळाली याचे समाधान.

टुनटुन, थॅंक्यु थँक्यु Happy , कोणालातरी माझी रेसिपी आवडली तर Wink ...... अग तु करुन बघच एकदा, इतकी तोंपासु लागते ना... आधी आम्ही विकत घेउन खायचो, पण आता घरीच करते......

मस्त रेसिपी. घरात दोन गट आहेत इडली आवडणारा व न आवडणारा आता दुसर्‍या गटासाठी छान पर्याय मिळाला नक्की करुन बघेन Happy

स्पेशली हाच पदार्थ करुन बघायचा असेल तर इडलीचे पीठ कुकरच्या सेपरेटर मध्ये तेलाचा हात लावुन उकडुन घ्यावे व त्याचे चौकोणी समान तुकडे करावेत म्हणजे दिसायला हा पदार्थ अजुन चांगला दिसतो Happy