चिन्मय दामले यांचे व्यवस्थापन टीममध्ये स्वागत!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

या महिन्यापासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीममध्ये चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. ते मायबोली (इंडिया)चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत.

मायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता, ललितलेख यांसारख्या विषयांपासून सुरु झाली आणि भविष्यातही तो एक महत्त्वाचा भाग राहणार आहेच. मायबोली ही एक परिसंस्था (eco-system) व्हावी, यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करत आहोत. प्रकाशकांशी पार्टनरशिप करून सुरू झालेला ’अक्षरवार्ता’ उपक्रम, चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व, विजय तेंडुलकर स्मृतिदिन, रसग्रहण स्पर्धा २०११ व सध्या सुरू असलेला गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ उपक्रम, या सर्वांच्या यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे.

यापुढेही अशा अनेक नवीन क्षेत्रांत मायबोलीला पुढे नेण्यात ते नक्कीच मदत करतील, असा आम्हांला विश्वास वाटतो.

सर्वजण मिळून चिन्मय दामले यांचे अभिनंदन करूया आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊया!!

व्यवस्थापन आणि प्रशासन टीम्सच्या कामाच्या माहितीसाठी हा दुवा पहा.

विषय: 
प्रकार: 

हार्दिक स्वागत चिन्मय. अभिनंदन! आणि तुझ्याकडून खूप चांगलं काम व्हावं यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा. Happy

अभिनंदन चिनुक्स...
यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे>>>>>.गड किल्ल्यांवर भट्कंती करणार्या माबो करांना एकत्रीत करणारा एखादा उपक्रम करता येइल का

अभिनंदन चिनूक्स! अरे वा, चिन्मय दामले आता माननीय चिन्मय दामले झाले!! Happy
म्हंजे आधी नव्हते असं नव्हे. Uhoh तर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालेय.

आपले कार्य अखंडपणे सुरूच राहावे ही शुभेच्छा!

आ.न.,
-गा.पै.

Pages