मुष्टीयुद्ध

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 04:12

मुष्टियुद्ध

- १६ दिवस, २८६ स्पर्धक, १३ सुवर्ण पदके

- मुष्टियुद्ध सामन्यास लढत म्हणले जाते.

- दोर्‍यांच्या आतील चौरस ६.१ मी क्ष ६.१ मी असतो. आणि दोर्‍यांची उंची १.३२ मीटर असते.

- जास्ती गुण मिळवणारा मुष्टियोद्धा विजेता घोषित कला जातो.

- प्रतिस्पर्ध्याला ठोसा मारून गुण मिळवले जातात.

- प्रतिस्पर्ध्याच्या शरीराचा वरच्या भागाला(कमरेचा वरचा भाग) किंवा डोक्याला ठोसा लागल्यास गुण मिळतो.

- प्रतिस्पर्धी जमिनीवर पडल्यास पंच १० आकडे मोजतात. मुष्टियोद्धा तेव्हढ्या कालावधीत उभा न राहिल्यास तो सामना हारतो.

- मुष्टियोद्धा पुढे खेळू शकणार नाही असे लक्षात आल्यास पंच मध्याताही सामना थांबवू शकतात.

- पुरुष व महिलांचे सामने वेगवेगळ्या वेळांचे असतात.
- पुरूषांचे सामने ३ मिनिटांच्या ३ फेर्‍यांचे असतात.
- महिलांचे सामने २ मिनिटांच्या ४ फेर्‍यांचे असतात.

- एकूण १३ स्पर्धा आहेत. १० पुरुष गटातील तर ३ महिला गटातील
खेळाडूंच्या वजनानुसार स्पर्धा असतात.

पुरुष गट
४६ - ४९ किलोग्रॅम - लाईट फ्लाय वेट सर्वात हलका वजन गट तर ९१ किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन सुपर हेवी गट सर्वात जड गट

महिला गट
४८ - ५१ किलोग्रॅम - फ्लाय वेट हा सर्वात हलका आणि ६९ - ७५ मिडल वेट हा सर्वात जड वजन गट

- मुष्टियुद्ध हे बाद फेरीनुसार खेळले जाते.

- समान वजन असलेले खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. हरलेला मुष्टियोद्धा स्पर्धेतून बाद होतो.

- सर्वोत्तम चार मुष्टियोध्दे उपांत्य फेरीचे सामने खेळतात त्यातील विजेते अंतिम लढत खेळतात. विजेत्यास सुवर्ण पदक, हारलेल्यास रौप्य तर उपांत्य फेरीतील पराभूत मुष्टियोद्ध्यास कांस्य पदक दिले जाते.

- मुष्टियुद्धाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम १९०४ साली केला गेला.

- महिला मुष्टियुद्धाचा समावेश यंदाच्या लंडन ऑलिम्पिक पासून होतो आहे.

- ऑलिंपिकमध्ये वापरला जाणारा मोजा २८४ ग्रॅमचा आहे.

- ऑलिम्पिक मध्ये भाग घेणारा मुष्टीयोद्धा वय ३४ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही.

- ऑलिम्पिक मुष्टियुद्ध लढती मध्ये दोन्ही खेळाडूंना जो कोपरा(लाल किंवा निळा) दिला जाईल त्या कोपर्‍याच्या रंगाचे कपडे घालावे लागतात.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/53...

भारतीय मुष्टियोद्धे
मेरी कोम : महिला फ्लायवेट (५१ किलो) २००२-२०१० लाइट फ्लायवेट गटातली ५ वेळची विश्वविजेती. ऑलिंपिकमध्ये लाइटफ्लायवेट गट नसल्याने फ्लायवेट गटात समावेश. २०१० आशियाई स्पर्धेत या गटात कास्यपदक.
जयभगवान - लाइट वेट (६० किलो)
देवेंद्र सिंग लैशराम : लाइट फ्लायवेट (४९ किलो) वय २० वर्षे
मनोजकुमार : लाइट वेल्टर (६४ किलो) २०१० कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक
सुमीत सांगवान : लाइट हेवी (८१ किलो) : वय १९ वर्षे
शिव थापा : बँटम (५६ किलो) वय १८ वर्षे : २०१० यूथ ऑलिंपिक्समध्ये रौप्यपदक
विजेंदर सिंग : मिडलवेट (७५ किलो) (बीजिंग ऑलिंपिक्स कास्यपदक, २०१० आशियाई गेम्स :सुवर्णपदक)
विकास क्रिशन : वेल्टरवेट (६९ किलो) (वय २० वर्षे) (यूथ जागतिक मुष्टियुद्ध २०१० सुवर्णपदक , समर यूथ ऑलिंपिक्स २०१० कास्यपदक, २०१० आशियाई स्पर्धा सुवर्णपदक : ही तिन्ही पदके लाइटवेट गटातली).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्रधनुष्य +१ ... पण पुढल्या फेरीत प्रतिस्पर्धी यजमान देशाची आहे तेव्हा हे अशक्य वाटत आहे. अगदी निकाल सुद्धा फीरवतील..

वादग्रस्त निर्णयांमुळे मुष्टियुद्धातले रेफरीज आणि टेक्निकल ऑफिशियल्स सस्पेंड्/एक्स्पेल होऊ लागलेत.

मेरी कोमची लढत सुरु झाली आहे... पण तिची लढत ब्रिटीश स्पर्धका विरुद्ध आहे.. अगदीच माफक अपेक्षा आहे की निर्णय योग्य दिला जावा...

देवेन्द्र सिंग लैशराम उप-उपान्त्य फेरीत जिंकु शकला नाही.. मुष्टी युद्धातली आपली शेवटची आशा संपुष्टात आली आहे. Sad

Pages