मी लपलोय!

Submitted by अभिप्रा on 23 July, 2012 - 23:22

माध्यमः पेन्सिल
मूळ प्रचि 'इथे' पहा

nOV 20111.jpg

गुलमोहर: 

नेहमीप्रमाणेच... अतिशय सुरेख.
चित्रातले बारकावे फार फार सुरेख दाखवले आहेस. पडद्यावरचं डिझाईन, केस, डोळे, भिंतीवरचे पोपडे, हात-बोटे...
फार सुंदर. लगे रहो Happy

अभिप्रा बर्‍याच दिवसांनी.नेहमीप्रमाणेच अप्रतिम. अंजलीशी सहमत.

सुंदर!

त्याच्या केसातून बोटे फिरवायचा आणि त्याच्या त्या इवलुशा बोटांचा स्पर्श आपल्या गालावर अनुभवण्याचा मोह पाडण्याएवढे मस्त आलय. पडद्याचे डिटेलींग सुरेखच!

अतिशय सुरेख ...पडद्यावरचे सळ्,नकटं नाक्,अचंबीत भुवया आणि डोळ्यातले निरागस भाव्.नाजुक बोटांची पडद्यावरची घट्ट पकड्,कपाळावरच्या केसांच्या बटा,खांद्यावरचा बनियानीचा सळ ....अगदी सगळं सगळं खुपच मस्त .कित्ती कित्ती छान मांडता आले आहे तुला !!! खुप्पच आवडले..

डोळ्यातले भाव आणि एकूण आविर्भाव अगदी जसे होते तसे चितारले आहेत. ग्रेट!!!
बाकी सगळे सुंदरच!!

मनःपूर्वक आभार! Happy

एकदम वॉव!!!! Happy
डोळ्यातले भाव अतिशय सुंदर रेखाटले आहेत आणि ते सगळ्यात जास्त कठीण असतं. चेहर्‍यावरचा निरागस भावही अगदी सही उतरला आहे.

तुमच्या बोटांत जादू आहे. Happy

वॉव! प्रचि तर सुंदर आहेच पण चित्र अप्रतीम उतरलंय! मुलाच्या चेहेर्‍यावरचे निरागस भाव फार छान चितारलेत.

तुझ्या चित्रांबद्दल अभिप्राय द्यायला, शब्द अपुरे पडतात.
प्रचंड अप्रतिम!
पडदा, लाकूड, कपडा, चेहरा... टेक्षचर भिशोण सुंदर!

Pages