लग्नाला यायचं हं!!!!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

खाली लिहिलेला मजकूर कुठल्या कॅटॅगरीत घालावा हा प्रश्ण मला आधी पडला होता. (जुन्या मायबोलीत हे पत्रिका प्रकरण मी आधीच लिहून चुकलेय. तीथे हा ताप नव्हता!) पण नव्या मायबोलीनं खास सोय केलीय. ह्या खर्‍याखुर्‍या लग्नपत्रिकांनी आमची बरीच 'करमणुक' केली म्हणून विषय : करमणुक! Happy ह्या आमंत्रणपत्रिकांचा आम्ही घेतला तसाच आपण देखिल 'आस्वाद' घ्यावा ही विनंती!!

नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १

'हिरवाकंच शालु लेवून...
गंधधुंद करणार्‍या निशिगंधाचा हार घेऊन...
अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! !
तीचे थरथरणारे ओठ.. अबोल!
फडफडणार्‍या पापण्या...

वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर!
नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता.
"पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!"
"छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.)
बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती!
"ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" वगैरे वगैरे...! कसली अबोल डोंबलाची!
पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या.
निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!

***
लग्नाला याय्चं हं-भाग २

आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना!

"बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव).
"तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात!
असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता.
'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं!
लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का?

***
लग्नाला याय्चं हं-भाग ३
ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे..

सप्तपदीची सात पावलं
साताजन्मांच्या गाठी..
यायलाच हवं तुम्हाला
मंदार-अपर्णा साठी...
अपर्णा कन्या दातारांची
तीन भावंडात मोठी...
मंदारही घरात मोठा
आमची म्हातारपणची काठी...

असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी'
मंदारच्या बिचार्‍या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले,
"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!"
लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते!

***
लग्नाला याय्चं हं-भाग ४
दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. ..

"भेज रहे हैं प्रेमपत्रिका
प्रियवर तुम्हे बुलानेको..
हे मानसके राजहंस
तुम भूल न जाना आनेको!"

नो कमेंट्स!

विषय: 
प्रकार: 

लोकहो, ह्या पत्रिका अगदी खर्‍या आहेत. 'ह्यांच्या अफाट पत्रिकांचा काही भाग वाचून माझ्या बरोबर ४-२ मायबोलीकरांना क्षणाचा का होईना पण आनंद लाभला' हे मला दुर्‍दैवानं त्या जोडप्यांपर्यंत पोचवता येत नाहीये. (एव्हाना त्यातले काही जण माबोकर झाले असतील तर माझं कठीण आहे!)
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

झले असतील तर तेही सामील झाले असतील गं हसण्यात!! Happy

मृ,
अग, आमच्या एका नातेवाईकांच्या लग्नात मंगलाष्टकं मधेच थांबवून नवर्‍यामुलाचं कौतुक चाललं होतं. तो अमेरिकेमधे कुठे आहे, कुठे काम करतो, त्याचं लग्न ठरल्यावर त्याच्या अमेरिकेतल्या शहरात बातमी कशी पसरली, तिथल्या लोकांना कशी त्याच्या लग्नाबद्दल उत्सुकता होती (जणू हा प्रिन्स चार्ल्स आणि अमेरिकेतली लोकं फार चोंबडी!)..इकडे सगळं पब्लिक हसत होतं.. तरी त्याची अमेरीकेतली काकू माइक सोडायला तयार नाही..नंतर तर त्याच कुटुंबातल्या अजून एका लग्नात स्टेज वर लग्न लागायच्या आधी अमेरिकेतल्या एका पुतण्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला! अगदी व्यवस्थित केक वगैरे कापून! मग त्या अमेरिकेत जन्मलेल्या नी वाढलेल्या पुतण्याचं कौतुक..तो कुठल्या कॉलेजला आहे, त्याला तिथे कशी ऍडमिशन मिळाली, किती लोकांनी अर्ज केला होता वगैरे...

मस्त! अगदी थ्री मच.

गावाकडच्या लग्नात प्रेषक, स्वागतोत्सुक, वर्‍हाडी या हेड्स खाली भरपूर नाव असतात.
अश्याच एका पत्रिकेमध्ये मी एकदा १०५ नाव मोजली आहेत.!! काश ती जपुन ठेवली असती.

खुपच मस्त.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अंजली, अश्या लोकांमुळेतर लग्नाच्या त्याचत्या रटाळपणात मज्जा येते. नाहीतर लग्नाहून घरी आलं की तासंपट्टी करायची कुणाची? Happy

सुरभी, काय पण पेशन्स आहे! नावं वगैरे मोजून हं!!!

कुणाला आठवत असतील तर अश्या खास नमुनेदार पत्रिका जरूर टाका ईथे.

हो, अभ्यास करतांना (??) काहीतरी tp पाहीजेच. Wink

>>गावाकडच्या लग्नात प्रेषक, स्वागतोत्सुक, वर्‍हाडी या हेड्स खाली भरपूर नाव असतात.
अश्याच एका पत्रिकेमध्ये मी एकदा १०५ नाव मोजली आहेत <<
हो हो... आणि नावच नाहीत तर त्यापुढे अगदी जन्मल्यापासुन आजपर्यंत भुषवलेल्या पदांचे लटांबर ही असते... जसे
स्वागतोत्सुक:
आबुराव बाबुराव पाटील
सदस्य, माळवा पंचायत समिती
अध्यक्ष, पश्चिमगंगा साखर कारखाना
उपाध्यक्ष, श्रमजीवी सहकारी पतसंस्था
विश्वस्त, डोंगरावरचा मारुती देवस्थान
.
.
.
माजी सचिव, शेतकरी सहकारी दुध डेअरी
आश्रयदाते, जनता वृत्तसमुह
इत्यादी इत्यादी

आणि तरुण आमंत्रकांचे नमुने म्हणजे:
प्रेषक :
युवराज आबासाहेब पवार
अध्यक्ष, जिल्हा युवा सेना
पदाधिकारी, हिंदमाता तरुण मंडळ
कार्यकर्ता, तांबडी माती तालीम संघ
.
.
.
.
माजी जीएस, केबीपी जुनिअर कॉलेज
माजी वर्ग सेक्रेटरी(इयत्ता ५ वी ते १० वी , सर्व वर्षे), नगरपालिका शाळा क्रं. ४

जसे या आमंत्रण पत्रिका नसुन यांचे बायो-डेटाच आहेत Lol

(टीप : वरील पोस्टमधील नावे काल्पनिक नसली तरी बदललेली आहेत... कोणतेही व्यक्ती अगर संस्था नामसाधर्म्य हा केवळ योगायोग समजावा.... कळावे लोभ नसला तरी चालेल, राग नसावा ही विनंती Happy )

स्वरूप, धमाल पत्रिका!!! Happy
..............
'खाना खजान्या चरणी' कैसे जडले हो चित्त, वजनकाटा खवचट मज वाकुल्या की दावी!! Proud

Lol

जितकं हसु वरच्या पत्रिका वाचताना आलं तितकंच हसु मा.बो. कर जनतेचे अभिप्राय वाचून आलं....

जबरदस्त हासलोय........ पोट दुखु लागलेय..........
असेच कधीतरी लग्नात म्हणल्या (कि हाणल्या जाणार्‍या....) जाणार्‍या मंगलअष्टकांबद्दल लिहा ना..... खास करून काही खतरनाक नवमंगलअष्टका आणि 'नव लता मंगेशकर' किंवा 'नव किशोर कुमार' म्हणतात ते..............

लग्नाच्या आमन्त्रण पत्रिकेत वधुवरांच्या डिग्र्या लिहिणारे बरेच असतात. एका पत्रिकेत मात्र वधु आणी वर यांच्या डिग्र्या आणी ते ज्या बॅन्केत काम करत होते त्या बॅन्केची नावे पण कंसात होती.

> "आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं - पिंकी आणि विकी"
Happy

सोलापूरला असताना मंगलाष्टके पाडून देणार्‍या कविवर्यांचा परिचय झाला होता. खरंच दया आली. काय वाटेल त्या डिटेल्स कोंबायची ऑर्डर यायची.

माझ्या मामेबहिणीच्या लग्नात अशाच एक "काकू" कितीतरी वेळ मंगलाष्टकाच म्हणत होत्या. नवर्‍यामुलाकडचे सर्वजण कानडी. त्याना काहीच समजेना की काय प्रकार चाललाय.

शेवटी माझ्या भावाने आणि मी तो माईक बंद केला. "अरेच्चा, बिघडला का तो माईक, बघू" म्हणत त्याच्या हातातून घेतला. आणि भटजीच्या हातात दिला. Happy

माझ्या अडीच वर्षाच्या भाच्याने कुणाच्या तरी लग्नात मंगलाष्टका म्हणून झाल्यावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला "आई, शी आलिये.. "

--------------
नंदिनी
--------------

१२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता. >> वाईट्ट..!! वाईट्ट वाटेल ना त्याना हे वाचल्यावर :फिदि: मस्त!!! हो अशा पत्रिका मी पण वाचल्या आहेत Happy

आमच्या एका राजस्थानी कश्ट्मर च्या पत्रिकेत 'जलुल जलुल आना' असे होते.घशाशी आले लाड.

मी एका पत्रिकेत वाचले होते..

नुसतीच लुडबुड..
कु. अनिष्का, समर्थ, श्रवण, यश

०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

मस्त! Rofl

Pages