सुखनवर बहुत अच्छे - ७ - रंजिश ही सही - अहमद 'फराज'

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 07:31

http://www.maayboli.com/node/22554 -भाग १ - डॉ. 'सर' मुहम्मद 'इक्बाल'

http://www.maayboli.com/node/22651 - भाग २ - 'साहिर' लुधियानवी

http://www.maayboli.com/node/23096 -भाग ३ - डॉ. रघुपती सहाय 'फिराक' गोरखपुरी

http://www.maayboli.com/node/26488 - भाग ४ - मौलाना हसरत मोहानी

http://www.maayboli.com/node/29834 - भाग ५ - मुनव्वर राना

http://www.maayboli.com/node/32675 - भाग ६ - शहरयार खान

============================================================

या भागात आपण अशा शायराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वाधिक विख्यात शायर मानले जाते.

दुर्दैवाने या शायराचे मुशायर्‍यातील गाजणे त्याच्या आकर्षक व्यक्तीमत्वाचे श्रेय मानले गेले तर गझलेच्या रंगावर फैज अहमद फैज या दुसर्‍या महान शायराचा प्रभाव मानला गेला. मात्र असे आरोप करून मोठे होत राहणार्‍या आणि स्वतः दोन ओळीही लिहू न शकणार्‍या समकालीन समीक्षकांची तोंडे बंद करणारी शायरी अहमद फराज यांनी जसजशी रचली, तशी अहमद फराजची जादू सर्वसामान्यांवर आणि समीक्षकांवरही होऊ लागली.

पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सीमेवर जन्मलेले अहमद फराज अत्यंत हट्टी होते. त्यांच्या वडिलांनी एके दिवशी आणलेल्या कपड्यांचे कापड न आवडल्यामुळे लहान फराज भांडण करून घरच सोडून गेले. असे म्हणतात की त्या दिवशी जे त्यांनी घर सोडले, त्यानंतर आयुष्यभर ते जगभर फिरतच राहिले. कुठलेच झाले नाहीत. उलट, या जगभर फिरण्याच्या प्रवृत्तीवरच त्यांचे प्रेम बसले आणि ते त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबीत होत राहिले.

इराकमधील बगदाद येथे जागतीक कवींसाठी जो महोत्सव असायचा, तेथे एकदा इराक इराण युद्ध चालू असताना फराज यांना निमंत्रीत केलेले होते. इराकी शासनाने आपल्या देशात आलेल्या एकसे एक पंडित कवींना आपल्या देशातील जनतेवर इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांची माहिती देणे आवश्यक मानले. येथे हे निर्विवाद सत्य पुन्हा एकदा अधोरेखीत होईल, की उत्तम कवींच्या काव्यरचनांमुळे समाज बदलतो व सामाजिक संस्कृती, तत्वे, निष्ठा, आक्रमकता आणि एकी यावर प्रभाव पडून अनेक शुभ परिणामांना समाज सामोरा जातो. काव्यातील ही ताकद ज्यांनी आपल्या रचनांमध्ये प्रामाणिकपणे आणली ते इतिहासातील अमर कवी ठरले. इराक शासनाला कवींची हीच ताकद ज्ञात असल्याने त्यांनी जगभरातून इराकसाठी शुभ भावना निर्माण व्हाव्यात या उद्देशाने या कवींच्या मंडळाला एका बसमधून इराक इराण सीमेवर न्यायचे ठरवले. मात्र यात एक घोळ होता. त्या सीमेवर जाताना सुरक्षिततेसाठी इराकी सैनिकाचा पोषाख धारण करायला सांगण्यात येत होते. हा पोषाख धारण केल्यास तुम्हावर हल्ला होणार नाही असे पटवण्यात येत होते. अहमद फराज यांनी तो युनिफॉर्म धारण करायला स्पष्ट नकार दिला व ते सरळ आपल्या हॉटेलमध्ये येऊन बसले.

भारतातील एका मुशायर्‍यानंतर पुष्पा डोग्रा या कथकनृत्यातील नर्तकीने फराज यांना त्यांच्या काही गझलांवर नृत्य व मुद्राभिनय करून दाखवला. उर्दू गझल व भारतीय नृत्यकला यांचा तो संगम पाहून खुद्द फराजसाहेबही चकीत झाले होते.

अहमद फराज हे मुळचे पाकिस्तानचे. पण आयुष्यभर जगभर फिरत राहिल्यामुळे विविध संस्कृती, विविध शासनव्यवस्था आणि विविध समाजांची विकसनशीलता अथवा विकास हे फराज यांना अतिशय जवळून पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील दंगे धोपे, क्रूर तत्वे, शासनव्यवस्थेतील डळमळीतपणा आणि अप्रगत राहणी त्यांच्या काव्यात ठळकपणे प्रतिबिंबीत झाली. कवीचे जितके एक्स्पोजर तितकी त्याची कविता व त्यातील संदेश व्यापक, प्रभावी व 'कालातीत'! खरी कविता करायची असल्यास कवीने खूप फिरायला हवे, खूप जवळून जीवनातील वैविध्य अनुभवायला हवे. फराज यांनी ते अनुभवलेले होते.

पाकिस्तानमधील लोकशाहीची थट्टा, समाजाचा न झालेला विकास आणि प्रेमभावना तसेच सामाजिकता या घटकांना फराजसाहेबांच्या काव्यात सर्वाधिक स्थान मिळाले. फराज साहेबांनी अभिव्यक्ती अशी जोपासली की त्यांची अनुभुती काव्यस्वरुपात वाचताना / ऐकताना रसिक तादात्म्य पावेल व स्वतःचेच अनुभव ऐकले असे समजू लागेल.

फराजसाहेबांनी महाकवी गालिबप्रमाणे 'टॅलेन्टेड' शायरी केली नसेल, पण त्यांचे काव्य 'आम माणसाचे' काव्य ठरले. त्या कालावधीत त्यांना लाभलेली ख्याती आजवर कोणाला लाभली नसेल.

फराज साहेबांच्या काव्यात शब्दांच्या ताकदीपेक्षा संवेदनेला महत्व होते. उर्दूवरची अमाप हुकुमत होती. आकर्षकतेचे पॅकिंग असले तरी आतमध्ये सामान्यत्व नव्हते. त्या पॅकिंगच्या आतील मटेरिअल हे हृदयाला डचमळवणारे होते.

या लेखमालिकेतील कवींबाबतच्या टिपण्ण्या वाचून असे वाटेल की हे सगळेच कवी असेच तर होते की! पण प्रत्येकाची शैली, अनुभुती आणि कालावधी वेगवेगळा आहे. त्यांनी समाजाचे आणि प्रदेशाचे वेगवेगळे टप्पे पाहिलेले आहेत.

आज आपल्याला वाटते की पाकिस्तानबद्दल इतके प्रेम असणार्‍याला कशाला गौरवायचे? पण हे चूक आहे. कलेच्या क्षेत्राला जगाच्या कोणत्याही सीमा सीमीत करत नाहीत. शेवटी सगळीकडेच माणसेच राहतात. पाकिस्तानमधील नागरीक भारतातील सिनेनट, अभिनेत्री, क्रिकेटपटू यांचे असीम चाहते आहेत. त्यांना ते तिकडेही आणि अजूनही डोक्यावर घेतात. अमिताभ बच्चनचे भारताइतकेच चाहते पाकिस्तानी नागरीकही आहेत. त्या देशाने आपल्या आजच्या भौगोलीक व राजकीय भारताला अनेक अजरामर कलाकार व त्यांचे कलायोगदान पुरवलेले आहे. शेवटी सीमा एकच आहे दोन्ही देशांची आणि माणसेही एकच आहेत.

अहमद फराजांची शायरी आजही, आपल्या या जुन्या व विशाल संस्कृतीच्या व इतिहासाच्या देशातही तितक्याच स्वादाने अनुभवली जाते, याचे कारण हेच. भारतातील संस्कृतीत प्रेम, नजरानजर, मीलन, विरह, ऋतूचक्रे, इतिहास, हल्ले / हिंसा आणि समाजाचा एकुण प्रवास हा अशाच टप्प्यांवर झालेला आहे.

अहमद फराजांची 'रंजिशही सही.. दिलही दुखाने के लिये आ' ही गझल आपणही डोक्यावर घेतलीच आहे की? नाही का? आपणही दिलीपकुमारला आजही भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता मानतोच की?

नोकरीतील कटकट उद्या सप्ताह संपत आल्यामुळे मनातून दूर गेलेली असावी, सगळे जग निद्रादेवीची प्रार्थना करत असावे, गार आणी मंद वार्‍याच्या झुळुका पुरवणारी एक खिडकी उघडी असावी, मन रिकामे रिकामे आणि टीपकागदासारखे काव्य शोषून घेण्यास उद्युक्त झालेले असावे आणि आपण एकट्याने अहमद फराज वाचायला घ्यावा! आह!

बघा... तुम्हालाही हे काव्य कसे वाटते ते... काही 'चुनिंदा अशआर' ( आवश्यक तेथे अर्थासहीत) देत आहे.. रंजिश ही सही ही पूर्ण गझल देत आहे..

उर्दूची नजाकत, मानवी मानसिकतेची क्लिष्टता तिच्या सर्व दृष्य अदृष्य कंगोर्‍यांसकट सुलभ झालेली आणि अतिशय तरल व सूक्ष्म भावनांना शब्दबद्ध केलेले...

=====================================

रंजिशही सही दिलही दुखाने के लिये आ
आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ

(दु:ख द्यायलाच का असेना, पण त्यासाठी तरी ये! हवे तर पुन्हा एकदा मला सोडून जायला तरी ये)

कुछ तो मेरे पिंदारे मुहोब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ

(आपल्या प्रेमात मलाही काही इगो आहेच की? एखादवेळी माझा रुसवा घालवायला तूही ये की?)

(पिंदारे मुहोब्बत - प्रेमातील घमेंड)

पहलेसे मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्मो-रहे-दुनियाही निभाने के लिये आ

(आधीसारखे आपले संबंध नसतीलही आता, पण निदान एक प्रथा / रीत म्हणून तरी परत ये?)

(मरासिम - संबंध, तआल्लुक)

किसकिसको बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो जमाने के लिये आ

(सगळे विचारतात की ती तुला सोडून का गेली? कोणाकोणाला कारणे सांगू? माझ्यावर रागावली आहेस तर निदान जग काय म्हणेल हा विचार करून तरी परत ये?)

इक उम्रसे हूं लज्जते-गिरियाँ से भी महरूम
ए राहते - जाँ मुझको रुलाने के लिये आ

( तू होतीस तेव्हा तू नीट वागत नाहीस आणि माझी होत नाहीस म्हणून सतत रडत असायचो. ते रडणेही 'काही प्रयत्न चालू आहेत' या गोडव्यानेतरी निदान भारलेले असायचे. आता त्या रडण्याचा स्वादही मला मिळत नाही. आता तू कायमचीच दुरावलेली आहेस. निदान एकदा पुन्हा तसेच मला रडवायला तरी ये?)

(लज्जते-गिरियाँ = अश्रूंचा आवडणारा स्वाद, महरूम = वंचित, राहते-जाँ = मनाला शांती, सुकून देणारा / री)

अबतक दिले-खुशफहमको तुझसे है उमीदे
यह आखरी शमएं भी बुझाने के लिये आ

(अजून माझ्या 'सुखाच्याच भ्रमात असलेल्या' मनाला 'तू येशील' ही उमेद, आशा वाटत आहे. निदान तो भ्रम नष्ट करायला तरी ये)

(दिल- ए- खुशफहम = चांगल्याचे भ्रम होत असलेले हृदय)

माना के मुहोब्बतको छुपाना है मुहोब्बत
चुपकेसे किसी रोज जताने के लिये आ

(प्रेम व्यक्त न करणे हेच खर्‍या प्रेमाचे लक्षण आहे हे माहीत आहे , पण सगळ्यांची नजर चुकवून एकदा तरी ते व्यक्त करायला ये ना)

(येथे कवी जणू ती अजून त्याच्या प्रेमात आहेच असे गृहीत धरून उपरोधिकपणे असे म्हणत आहे)

जैसे तुझे आते है न आने के बहाने
वैसेही किसी रोज न जाने के लिये आ

(जसे तुला माझ्याकडे न येण्याचे वेगवेगळे बहाणे सुचतात, तसेच माझ्यापासून कधीच पुन्हा दूर न जाण्यासाठीही एकदा ये की?)

(आता सगळ्यात मोठ्ठी गंमत - ही गझल प्रेयसीवर नव्हे तर पाकिस्तानातून सतत नष्ट होणार्‍या लोकशाहीवर आहे)

===========================

अबके बिछडे तो शायद कभी ख्वाबोमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों मे मिले

(आता एकमेकांपासून वेगळे झालो तर मात्र स्वप्नातच भेटू शकू, जसे एखाद्या जुन्या पुस्तकात कधीतरी ठेवलेले वाळलेले फूल चुकून मिळते)

===========================

जिसको देखो वही जंजीर-ब-पा लगता है
शहर का शहर हुवा दाखिले जिंदॉ जानाँ

ज्याला पहावे तो जणू पायात साखळदंड असल्यासारखा भासतो आहे. जणू पूर्ण शहरच आता तुरुंगात दाखल झाले आहे. (याचा अर्थ असा की जो दिसेल तो इतका विवश आहे, बद्ध आहे की जणू सर्व जग कारागृहच)

अब तेरा जिक्रभी शायदही गझलमे आएं
औरसे और हुवे दर्दके उनवाँ जानाँ

(उनवाँ - शीर्षक)

आता तुझा उल्लेखही गझलेत जवळपास येतच नाही. (तू असताना माझी दु:खे कोणत्या प्रकारची होती आणि) आता कुठल्याकुठे दु:खांचे प्रकार बदलले आहेत. (आता माझी दु:खे म्हणजे आर्थिक चणचण, जगात टिकून राहणे इत्यादी आहेत. त्यावेळी फक्त तू माझी नाहीस हे एकच दु:ख असायचे) - दु:खांची शीर्षकेच (नांवेच) किती बदलली.

===========================

दिले-फरेब-जदा दावते-नजर पे न जा
ये आजके कदो-गेसू है कलके दारो-रसन

(माझ्या 'धोका खाल्लेल्या' हृदया, आजचे हे नेत्रसुख महत्वाचे मानू नकोस. ही (सुंदरींची सुंदर) शरीरे आणि हे (लांब) केस म्हणजे उद्याचा फाशीचा फंदाच आहे.

(दिले-फरेब -जदा = ज्याला सतत धोका दिला गेला असे हृदय, दावते-नजर = नेत्रसुख, कदो-गेसू = शरीर व केस, दारो - रसन = फाशीचे स्थान व दोर)

===========================

तेरे होते हुवे आ जाती थी सारी दुनिया
आज तन्हा हूं तो कोइ नही आनेवाला

(तू होतीस तेव्हा सगळं जग माझ्याकडे यायचं, आज एकटा आहे तर कोणीच येणार नाही आहे, येत नाही आहे)

मुंतजिर किसका हूं टूटी हुई दहलीज पे मै
कौन आयेगा यहाँ कौन है आनेवाला

(मुंतजिर - प्रतीक्षेत, दहलीज - उंबरठा)

===========================

यूं तो पहले भी हुवे उससे कई बार जुदा
लेकिन अबके नजर आते है कुछ आसार जुदा

(तसा तर मी तिच्यापासून कितीतरी वेळा दूर झालो, पण यावेळी मात्र जरा वेगळंच प्रकरण दिसत आहे. बहुतेक आता पुन्हा कधीच एक होणार नाही आम्ही दोघे)

दो घडी उससे रहो दूर तो ये लगता है
जिस तरह साया-ए-दीवारसे दीवार जुदा

(दोन क्षण तिच्यापासून लांब राहावे तर असे वाटते की भिंतीच्या सावलीपासून भिंत लांब आहे)

=========================

हुई है शाम तो आंखोमे बस गया फिर तू
कहा गया है मेरे शहर के मुसाफिर तू

हसी-खुशीसे बिछड जा अगर बिछडना है
ये हर मुकामपे क्या सोचता है आखिर तू - मुकाम - टप्पा, स्थान

फजा उदास है रुत मुजमहिल है मै चूप हूं - फजा - मोसम, मुजमहिल - दु:खात मग्न
जो हो सके तो चला आ किसीकी खातिर तू

==========================

यहाँ कुछ आशनासी बस्तियाँ थी (आशना - परिचित)
जजीरोंको समंदर खा गये क्या (जजीर - बेट)

मेरी गर्दनमे बाहे डालदी है
तुम अपने आपसे उकता गये क्या (उकता जाना - वैतागणे)

==========================

तू पास भी है तो दिल बेकरार अपना है (बेकरार - अस्वस्थ)
कि हमको तेरा नही इंतजार अपना है

'फराज' राहते जाँ भी वही है क्या कीजे ( राहते - जाँ - मनास आराम देणारी)
वह जिसके हाथ से सीना फिगार अपना है (सीना फिगार - मन जख्मी)

==========================

जिंदगीसे यही गिला है मुझे
तू बहुत देरसे मिला है मुझे

तू मुहोब्बतसे कोई चाल तो चल
हारजाने का हौसला है मुझे

हमसफर चाहिये, हुजूम नही
इक मुसाफिर भी काफिला है मुझे

(हुजूम - गर्दी, काफिला - माणसांचा समुह)

====================

करू न याद मगर किस तरह भुलाऊं उसे
गझल बहाना करू और गुनगुनाऊ उसे

वो खार-खार है शाखे गुलाब की मानिन्द
मै जख्म जख्म हूं फिर भी गले लगाऊ उसे

(ती गुलाबाच्या डहाळीप्रमाणे काट्याकाट्यांची आहे, मी अगदी जखमांसारखा / पूर्ण जखमी आहे पण तरी तिलाच मिठी मारतो)

य लोग तजकिरे करते है अपने लोगोंके
मै कैसे बात करू और कहासे लाऊं उसे

(हे लोक आपापल्या 'आवडत्या' माणसावर चर्चा करत बसलेले असतात, मी त्यांच्यात कसा बोलू आणि तिला कुठून आणू?)

======================

कहा था किसने तुझे आबरू गवाने जा
'फराज' और उसे हाले दिले सुनाने जा

(कोणी सांगितलं होतं तुला स्वतःची अब्रू काढून घ्यायला? - ती क्रू आहे, ती निंदानालस्ती करून घालवूनच देणार - कशाला तिला स्वतःच्या मनातले प्रेम सांगायला गेलास?)

उसे भी हमने गवाया तेरी खुशी के लिये
तुझे भी देख लिया है अरे जमाने जा

(लोकांनो , तुम्हाला बरे वाटावे म्हणून मी तिलाही सोडून दिले... आता तुमचेही एकंदर सगळे वर्तन पाहिले आहे... जा माझ्यापासून दूर तुम्हीही)

=========================

आंखसे दूर न हो दिलसे उतर जायेगा
वक्त का क्या है गुजरता है गुजर जायेगा

(एकदा डोळ्यांसमोरून गेलीस की मनातूनही जाशील तू.. - नको जाऊस - कारण काळ काय, जातच असतो आणि जाईलच)

डूबते डूबते कश्तीको उछाला दे दूं
मै नही कोइ तो साहिलपे उतरजायेगा

(बुडता बुडता नावेला जरा धक्का देतो, मी नाही तरी निदान कोणीतरी तरी किनार्‍याला पोचेल - आणि वाचेल)

==========================

दौलते-दर्दको दुनियासे छुपाकर रखना
आँखमे बूंद न हो दिलमे समंदर रखना

कल गए गुजरे जमानोंका खयाल आयेगा
आज इतना भी न रातोंको मुनव्वर रखना

(मुनव्वर - प्रकाशित, रौशन)

===================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

केवळ कमालीचे लेखन व लेखनविषय.! 'रंजिश ही सही' पाकिस्तानी लोकशाहीवर आहे ही माहिती मात्र केवढा विरस करणारी.सुंदर,मनःपूर्वक लिहिले आहे.

दर्द की राह नहीं काफी कुछ गम दे दो ,
दर्द महसूस करूँ ऐसा अलम (बहोत बड़ा दुख ) दे दो |

जख्म भर जाये तो चोट खानेका क्या मज़ा ,
जो जलाये मेरे जख्मोंको वो मरहम दे दो |

हम तेरी शाख के सूखे हुवे फूल सही ,
अबके खिज़ा न आयेगी ये वहम दे दो|

जी रहा हूँ रोज करके एक नया वादा ,
नहीं खायी हो हमने ऐसी कसम दे दो |

है तेरे रुख पे “क़ाफिर” कितने कितने नकाब ,
आँख हो जिसकी नम ऐसा सनम दे दो |

मला हे नांव माहीत नाही Sad

प्रयत्न करतो अधिक माहिती मिळवण्याचा

धन्यवाद

<<<हम तेरी शाख के सूखे हुवे फूल सही ,
अबके खिज़ा न आयेगी ये वहम दे दो|

जी रहा हूँ रोज करके एक नया वादा ,
नहीं खायी हो हमने ऐसी कसम दे दो |
>>>

वा वा

'रंजिश ही सही' अफ्फाट आवडते... आणि हा लेख तर मेजवानीच आहे. आता सगळेच वाचून काढणार. Happy
माहित नाही तुमच्या या लेखमालिकेत समावेश होऊ शकतो की नाही ते... पण असेच गुलजा़र यांच्या शायरीबद्दलही वाचायला खूप आवडेल. Happy

नेहमीप्रमाणे उत्तम लेख आणि वाचनीय लेखमाला.
'फराज' अनेकांप्रमाणेच माझाही अत्यंत आवडता शायर ! पाकिस्तानात त्यांची ख्याती इतकी जास्त होती, की त्यांनीच एके ठिकाणी म्हटले होते-

"और तुझे कितनी मोहब्बतें चाहिये फराज,
मांओ ने अपने बच्चे का नाम, तेरे नाम पे रख दिया !"

'रंजिश' ही लोकशाहीला उद्देशून लिहिलेली गझल आहे, ही नवी माहिती मिळाली. (मला अजूनही ती तशी वाटत नाही.)
--------------------------------

यूं तो पहले भी हुवे उससे कई बार जुदा
लेकिन अबके नजर आते है कुछ आसार जुदा

@बेफि- ही संपूर्ण गझल मला पाठवाल का, प्लीज?

मस्त लेख.
रंजिशही सही माझ्या सर्वात आवडत्या गझलांपैकी एक आहे. गेले अनेक दिवस गझलेचा अर्थ समजून घेण्याची इच्छा होती.. आज पुर्ण झाली. धन्यवाद बेफि.

धन्यवाद बेफि............ फार वाट पाहिली फराजवरील लेखाची.... पण हे वाट पहाणं सार्थकी लागलं.
मनःपूर्वक आभार.

बेफीजी तुमचा हा लेखन प्रपंच माझ्या सारख्या गझलेची आणि गझलकारांची ओळख नसलेल्या नवशिक्यासाठी खूप उपयुक्त आहे
मी आपला ऋणी आहे

आपला
वैवकु

बेफ़िकीर
तुम्ही धन्यवाद टाईपलतं आणि हे पान वर आलं. त्याबद्दल धन्यवाद!! Happy
छान आहे खुपचं. मी पहिले ३ भाग वाचले आहेत. आता बाकिचे वाचते.