सुखनवर बहुत अच्छे - १ - डॉ. सर मुहम्मद इक्बाल

Submitted by बेफ़िकीर on 10 January, 2011 - 09:46

'इकबाल' कोई महरम अपना नही जहां मे
मालूम क्या किसी को दर्दे-निहाँ हमारा

"इक्बाल, आपल्या मनाला जाणणारे, 'राझदार' असे आता कुणीही नाही या जगात, आपल्या मनाच्या गाभार्‍यात कोणते दु:ख दडलेले आहे ते कुणाला समजणार?"

रतनलाल सप्रू आणि इमाम बिवी या काश्मीरी ब्राह्मण व पंजाबी स्त्रीच्या पोटी १८७७ साली 'सियालकोट' येथे जन्माला आलेले अपत्य जगभरात आपल्या तत्वज्ञान, धर्म व इस्लाम या तीन बाबींवरील गद्य व पद्य लेखनाने सुप्रसिद्ध होईल, इतके की जर्मनीतील एका रस्त्याला त्याचे नांव देण्यात येईल, पाकिस्तानात त्याचा जन्मदिन ९ नोव्हेंबर ही राष्ट्रीय सुट्टी पाळण्यात येईल, कारागृहात असताना महात्मा गांधी त्याची वरील शेर असलेली गझल किमान शंभर वेळा म्हणतील, ब्रिटिश सरकार त्यांला 'सर' ही पदवी देईल आणि राकेश शर्मा इंदिरा गांधींना 'अवकाशातून आपला देश कसा दिसतो' या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच पद्यओळी ऐकवून देईल... हे कुणालाच वाटले नसेल.

डॉक्टर, सर मुहम्मद इक्बाल, 'हजरत अल्लामा इक्बाल' या नावाने सुप्रसिद्ध असणारे हे अपत्य एका जाणकारांनी 'दुसरा गालिब' म्हणूनही गौरवलेले आहे.

आणि वरील 'मक्ता' ज्या गझलेतील आहे ती 'तराना-ए-हिंद' म्हणून जगप्रसिद्ध आहे.

सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ता हमारा
हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ताँ हमारा

इक्बाल विद्वान होते. अक्षरशः विद्वान! मात्र त्यांच्या विचारांमध्ये दोन महत्वाचे टप्पे आहेत असे जाणकार मानतात. वरील 'तराना-ए-हिन्द' प्रमाणेच 'तराना-ए-मिल्ली'ही त्यांनी रचलेली होती. समान जमीनीत! आणि तिचा मतला असा!

चीन-ओ-अरब हमारा हिन्दोस्तां हमारा
मुस्लिम है हम वतन है सारा जहों हमारा

बॅ. जिनांच्या अत्यंत निकट सहवासात राहून काम करणारे मुहम्मद इक्बाल हे 'मुफ्फकिर्-ए-पाकिस्तान' मानले जातात. म्हणजे 'पाकिस्तानचे (पाकिस्तान निर्मीतीमागील) विचारवंत'!

इस्लामच्या जुनाट संकल्पनांना नावीन्यपूर्ण स्वरूप देण्यात इक्बाल यांचा वाटा मोठा! इस्लामला आधुनिकतेकडे वळवणे व इस्लामिक नागरिकांसाठी स्वतंत्र राष्ट्राची निर्मीती करणे हे त्यांचे हेतू होते. भारतातील बहुसंख्य हिंदूंपुढे मुस्लिमांची डाळ शिजणार नाही असे त्यांना वाटायचे. वास्तविक जन्माने काश्मीरी ब्राह्मण असलेले इक्बाल, लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी इस्लाम स्वीकारल्यामुळे मुस्लिम झाले.

एक प्रकारे, आजच्या राजकीय, भौगोलिक, धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर व दहशतवादाने मांडलेल्या उच्छादाच्या पार्श्वभूमीवर इक्बाल हे काहींना अ-भारतीय वाटणे साहजिक आहे. मात्र एक शायर म्हणून त्यांचे स्थान वादातीत आहे.

=======================================

सच कहदूं ए बिरहमन गर तू बुरा न माने (बिरहमन - ब्राह्मण)
तेरे सनम-कदोंके बुत हो गये पुराने (देवळातील मूर्ती)

अपनोसे बैर रखना तुने बुतोंसे सीखा (बुत - मूर्ती)
जंगो-जदल सिखाया वाइजको भी खुदाने (जंगो-जदल = लढाई, वाइज - मुस्लिम उपदेशक)

तंग आके मैने आखिर दैरो-हरमको छोडा (दैरो हरम - मंदिर मशीद)
वाइज का वांज छोडा, छोडे तेरे फसाने

पत्थर की मूर्तीमे समझा है तू खुदा है
खाके-वतन का मुझको हर जर्रा देवता है (खाके वतन - स्वदेशाची माती, जर्रा - कण)

===========================================

खिरदमन्दोंसे क्या पुछू कि मेरी इब्तिदा क्या है (खिरदमन्द - ज्ञानी, इब्तिदा - आरंभ)
कि मै इस फिक्रमे रहता हुं मेरी इन्तिहा क्या है (इन्तिहा - अंत)

खुदी को कर बुलन्द इतना कि हर तकरीरसे पहले
खुदा बन्देसे खुद पुछे बता तेरी रिजा क्या है (हा सुपरिचिर शेर अनेक चित्रपटांमध्ये आपण ऐकतो)

=======================================

इस पैकरे-खाकी मे इक शय है सो वो तेरी (पैकरे - खाकी = मी = मातीचित्र. शय - व्यक्ती)
मेरे लिये मुश्किल है इस शय की निगहबानी (निगहबानी - निगराणी)

अब क्या जो फुगाँ मेरी पहुची है सितारोंतक (फुगाँ - विरहातील आर्तनाद)
तूने ही सिखाई थी मुझको ये गझल ख्वानी (गझलख्वानी - गझल कहना)

=======================================

ईश्ककी इक जस्तने तै कर दिया किस्सा तमाम (जस्त - प्रेमातील जखम)
इस जमीनो-आसमाँको बेकरां समझा था मै (बेकरां - अमर्याद)

(प्रेमामुळे झालेल्या यातनांनी सगळेच चित्र बदलले, मला वाटायचे की जमीन आणि आकाश तर अमर्याद आहेत, पण आता माझ्या आर्त सादा त्यांच्याही पलीकडे पोहोचल्या आहेत.)

=======================================

इन्तिहाभी इसकी है, आखिर खरीदे कब तलक
छतरियाँ, रूमाल, मफलर, पैरहन जापानसे (पैरहन - पोषाख)
अपनी गफलतकी यहीं हालत अगर कायम रही
आएंगे गुस्साल काबुलसे, कफन जापानसे (गुस्साल - प्रेताला आंघोळ घालणारे)

मिम्बरी इम्पिरियल कौन्सिलकि कुछ मुश्किल नही (मिम्बरी - मेम्बरशिप)
वोट तो मिलजायेंगे, पैसेभी दिलवायेंगे क्या
मिर्जा गालिबको खुदा बख्शे, बजा फर्मा गये
हमने ये माना के दिल्ली मे रहे, खायेंगे क्या

(गालिब यांचा असाच एक शेर आहे, है अब इस मामुरेमे कहते गमे उल्फत असद, हमने ये माना के दिल्लीमे रहे, खायेंगे क्या - यावर बांधलेली चारोळी!)

===========================================

सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ता हमारा
हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ताँ हमारा

पर्बत वो सबसे ऊंचा हम साया आस्मा का
वो सन्तरी हमारा, वो पास्बा हमारा (रक्षक)

गोदीमे खेलती है इसकी हजार नदियाँ
गुलशन है जिनके दमसे रश्के-जिनां हमारा

मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना
हिंदी है हम वतन है हिन्दोस्ता हमारा

यूनानो-मिस्रो-रूमा सब मिट गये जहाँसे
अब तक मगर है बाकी नामो निशां हमारा

'इक्बाल' कोई महरम अपना नही जहां मे
मालूम क्या किसी को दर्दे-निहाँ हमारा

======================================

उर्दू शायराचा परिचय आवडल्यास / न आवडल्यास जरूर कळवावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

अतिशय सुंदर गजला.

उर्दु शब्दांचा अर्थ दिल्याबद्दल धन्यवाद. परिचय आवडला. अजुन काही शायर येणार आहेत का?

बेफिकीर धन्यवाद.
आता गालीब , मकदुम व ईतर येउ द्या.
इक्बालचा म्रूत्त्युवर एक चांगला शेर आहे, सद्ध्या आठ्वत नाही.
मी आताच येणार नाही आता तु माझी वाट बग्घ अशा आशयाचा.

भूषणजी,

अत्यंत सुंदर!!

मला वैयतिकरीत्या मीर, गालीब, दाग, मोमीन, जौक, इकबाल, फैज ह्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे परंतु 'मिर्झा सौदा' ह्यांच्याबद्दल त्यांचे काही शेर वगळता माहिती नाही....

त्यांच्यावर एक लेख टाकाल का प्लीज..........

तिघांचे धन्यवाद!

विजयराव,

'सौदा' यांच्याबद्दल लिहीन.

-'बेफिकीर'!

या लेखाबद्दल अनंत धन्यवाद भूषणजी......

सुरेश नाडकर्णी यांच्या ''गझल'' या पुस्तकात जी काही माहिती आहे... तेवढंच उर्दू शायरांबद्दलचं माझं ज्ञान आहे. आपल्या या लेखात बरीच सखोलता आहे.....

विजयरावांनी केलेली मागणी माझीही आहे.. व ती आपण आधीच मान्य केली आहे... यास्तव '' सौदा'' यांच्या लेखावरील प्रतीक्षेत. Happy

मस्तच आहे लेख... डॉ. मुहम्मद इक्बालांविषयी काहीच माहिती नव्हती... जर्मनीतील एका रस्त्याला त्यांचे नांव देण्यात आले, ही आश्चर्यकारक माहिती मिळाली! गुगलून समजले, हे नाव असणारा रस्ता हैडेलबर्गमधे आहे!

सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ता हमारा
हम बुलबुले है इसकी ये गुलिस्ताँ हमारा>>> हे भारतासाठीचे व्हर्जन आणि

चीन-ओ-अरब हमारा हिन्दोस्तां हमारा
मुस्लिम है हम वतन है सारा जहों हमारा>>> आणि हे- 'त्याच जमीनी'तले व्हर्जन वाचून चकीत झाले! खरं म्हणजे संतप्त झाले! वा रे वा!!!!!!

मात्र.....
अपनोसे बैर रखना तुने बुतोंसे सीखा (बुत - मूर्ती)
जंगो-जदल सिखाया वाइजको भी खुदाने (जंगो-जदल = लढाई, वाइज - मुस्लिम उपदेशक)>>> इथे मात्र दोन्ही धर्मांमध्ये संतुलन साधलेले दिसतेय... एकतर्फी टिका नाही! Happy

डॉ. इक्बालांचे खरे विचार समजणे जरा अवघड असले तरी त्यांचे इथे संकलित केलेले सगळे शेर फारच सुरेख आहेत. आता त्यांच्याविषयी अधिक वाचण्याची इच्छा जागृत झाली आहे. इतक्या छान माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.

इक्बालचा म्रूत्त्युवर एक चांगला शेर आहे, सद्ध्या आठ्वत नाही.
मी आताच येणार नाही आता तु माझी वाट बग्घ अशा आशयाचा.

बाग्-ए-बिहिश्त से मुझको हुक्म-ए-सफर दिया था क्यों ?
कार-ए-जहां दराज है, अब मेरा ईंन्तजार कर |

बहोत बहोत खूब... बेफिकिर. तुमच्या गजल प्रेमाला सलाम. ह्या डॉ. मुहम्मद इक्बालांविषयी काहीच माहीत नव्हतं. सानी म्हणतेय तसं कुतुहल जागं झालय. त्यासाठी अनेक आभार.
अजून येऊदेत.
इस पैकरे-खाकी मे इक शय है सो वो तेरी
मेरे लिये मुश्किल है इस शय की निगहबानी

बेदम आहे...