खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

Submitted by कु. कमला सोनटक्के on 28 June, 2012 - 11:43

खाजगी ट्युशन्स घेणार्‍या लोकांचे हितगुज

बरेच लोक खाजगी ट्युशन्स घेतात. यात बालवाडी च्या शिकवण्यांपासून मोठ्या प्रोफेशनल कोचिंग क्लास पर्यंत सर्वांचा समावेश आहे. पूर्ण वेळ ते नोकरी सांभाळून अर्धवेळ करणारे असेही लोक असतील. रेगुलर शाळा कॉलेजच्या क्लासेस पासून झटपट इंग्रजी बोला असे क्लासेस असणारेही लोक असतील. हा बीबी सर्वाना खुला आहे.

हा बीबी खास या विषयाच्या हितगुजसाठी आहे.

१. आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी केली? कसा वाढवला?
२. व्यवसायातील समाधान.
३. आपले काम आणखी समाधानकारक व्हायला काय करु शकतो?
४. व्यवसायातील अडचणी
५. दिवसभराचे टाइम शेड्युल / इंग्रजी- मराठी माध्यमे हे सगळे कसे मॅनेज करतो? याबाबतचे अनुभव.
६. एखाद्या इयत्तेसाठी एखादे चांगले पुस्तक, सीडी, गाइड असे काही रिकमांड करायचे असेल तर तेही लिहा.
..
..
शिकवणीला जानारे लोक/ पालक यांचीही मते, अनुभव असू शकतील. जे इथल्या व्यवसाय करनार्‍या लोकाना उपयोगी ठरु शकतील.

या व अशा अनेक गोष्टींच्या चर्चेसाठी हा बीबी आहे. ( खाजगी क्लासेस सत्य की थोतांड ? हा विषय इथे अपेक्षित नाही. Biggrin Proud ) हा बीबी शिक्षण याही विभागात ठेवायचा होता, पण तिथे फक्त परकीय शिक्षणाबाबत चर्चा आणि लिमिटेड लोकाना सामील व्हा, असे काहिसे दिसले, म्हणून व्यवसाय विभागात हा धागा उघडला. शिक्षण विषयाकडे हा धागा 'वर्ग' केलात तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर तर मी स्वत कधीच शिकवणी घेतली नाही. पण दोघी जणींचे आपल्या आई /साबा कशा कशा शिकवण्या घेत होत्या ते वाचल्यावर मला पण माझ्या आई बदल सांगितल्या शिवाय राहवत नाही .
माझी आई ३५ वर्ष पार्ले टिळक मध्ये शिकवत होती . ती लागलीच ती मुळी वयाच्या २० व्या वर्षी. बी ए ची परीक्षा दिली आणि रिझल्ट यायच्या आधीच तिची मुलाखत झाली आणि SSc ला बोर्डात आल्यामुळे त्या मार्कावरच तिला जॉईन व्हायला सांगितले . शाळेत रुजू झाली आणि रिझल्ट लागला. खर तर बी ए ला तिचे संस्कृत आणि मराठी विषय होते पण तिला पाचवीला गणित शिकवायला दिल. आई वीस वर्षांची आणि मुल दहा वर्षांची. त्यामुळे मुलांना भारी कुतूहल होत या लहानच दिसणाऱ्या बाई काय आणि कशा शिकवणार :))
खर तर मराठी आणि संस्कृत हे तिचे मुख्य विषय . पण सुरवातीच्या काही वर्षात तिने गणित, सायन्स, भूगोल आणि हिंदी पण शिकवले आहे :)))गणित , सायन्स, मराठी आणि संस्कृत मध्ये तिचा हातखंडा होता. पण पहिली दोन चार वर्ष सोडल्यावर मात्र कायम तिला मराठी आणि संसंकृत शिकवायला मिळाले . पहिली काही वर्ष आम्ही दोधी लहान असल्याने शाळा एके शाळा पण मी पाचवीत असताना तिने MA केल (मराठी आणि संस्कृत घेऊन )आणि मुंबई युनिवर्सिटी तून ती दुसरी आली. पेपरात फोटो आणि काय काय धमाल . त्या वेळीच सगळ्या पालकांनी तिला शिकवण्या घेण्याची इतकी गळ घातली -इतकी गळ घातली कि तीच्या संस्कृत च्या शिकवण्यांचा वारू जो काही उधळलाच त्याला आवरता आवरता मुश्कील .
त्यावेळी दुपारी बारा ते सहाची शाळा असल्याने सकाळी १०-११ एक तासभर तिची संस्कृत ची शिकवणी असायची. सातवीच्या स्कोलार्शीप ना पण शिकवत होती. पार्ले टिळक च्या चिक्कार मुलांना स्कोलारशीप पण मिळत गेल्याने स्कोलारशीप च्या मुलांना शिकवण्याचा पण दबाव यायला लागला. पण वेळच नव्हता .
शिकवायला मात्र तिला आवडत होते . खर तर खाजगी शिकवण्या हा तिने व्यवसाय म्हणून सुरु केलाच नव्हता पालकांच्या दबावामुळे तिने शिकवण्या घ्यायला सुरवात केली. पण शिकवताना तडजोड कधीच केली नाही. गाईड कधीही तिने वापरले नाही .दहावीला शंभर मार्कचे संस्कृत घेणारी बरीच मुल असायची आणि आई कडे शिकवणी लावली कि हमखास भरपूर मार्क मिळायचे .
आई पण मुलांवर खुश होती आणि मुल पण. एक मात्र आहे शिकवण्या घेणार्याला शिकवायची आवड पाहिजे तरच तो मुलांना न्याय देऊ शकतो आणि स्व-समाधान पण मिळते. तुम्ही आनंदाने आणि मनापासून शिकवले तर मुल पण चांगले मार्क मिळवून त्याची दाम दुप्पट परतफेड करतात .आणि त्या वेळी शिक्षकाला जो आनंद मिळतो त्याची अनुभूती खूप छान असते. Happy

छान.

बर्‍याच वर्षांपूर्वी एक प्रय्त्न केला होता त्याबद्दल लिहीत आहे.
शेजारी राहणार्‍या मुसलमान काकू एकदा येऊन विचारू लागल्या की त्यांच्या मुलीला शाळेत रामायणाबद्दल काही लिहायचे आहे पण माहित मात्र काही नाही तर सांगशील का? अर्थातच आनंदाने होकार दिला. त्यातून पुढे मग गणित, वि़ज्ञान विषय सुरु झाले. मुलगी नापास व्हायची ती पास झाली. नंतरच्या वर्षी मुलाला पाठवू का? असे विचारल्यावर पाठवण्यास सांगितले. मुलगाही नीट काय ते शिकला. चाचणी परिक्षा होऊन गेली, रिझल्ट लागला मला माहित नव्हते. एकदा सहज शिकवणीला आलेल्या मुलाला चाचणीबद्दल विचारले तर त्याने कधीच झाली, रिझल्ट लागला इ. सांगितले. मग त्या १० वर्षाच्या मुलाला मी "अरे सांगायचे नाही का?" असे विचारताच पळत घरी गेला आणि आई, आज्जी भांडायला आल्या. "तुम्ही कोण लागून गेलात की तुम्हाला रिझल्ट सांगावा? हिंदू असल्याचा माज आलाय, पैसे घेत नाही पण आमच्या मुलांना बोलता." असे ऐकून शिकवणी हा प्रकार बंद केला.

आणखी काही बाजारात चालू शकणार्‍या ट्युशन्स...

१. इयत्ता पाचवीसाठी नवोदय प्रवेश.... कुणी घेते का? कोणती पुस्तके वापरावीत? परिक्षा कधी असते?
२. डी एड एंट्रन्स

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10900775.cms

निबंध आणि पत्रलेखन हे दोन्ही लेखन प्रकार साचेबद्धतेत अडकल्याने मुलांमधील लेखनक्षमता विकसित होण्यास मर्यादा येत आहेत. पदवीनंतरही चार ओळींचे पत्रही धडपणे लिहू न शकणाऱ्यांची संख्या वाढण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.
...........

दुसरीतल्या एका मुलाने मोरावर लिहिलेला निबंध एका पालकाने पत्राद्वारे पाठविला आहे. 'मोराच्या डोक्यावर तुरा असतो, मोराला पिसारा असतो, पिसारा फार सुंदर दिसतो, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे..' वगैरे वर्णन करतानाच या मुलाने 'मोर हा पक्षी चिंचोलीला असतो आणि मोर हा आपल्याला कधीच दिसत नाही,' असे निबंधाच्या शेवटी लिहिले आहे. सुनील शिंदे या पालकांनी या निबंधावरील आपली निरीक्षणेही नोंदविली आहते. 'मोराबद्दल शिक्षकांनी पाठ करवून घेतलेल्या साऱ्या ओळी या मुलाने व्यवस्थित लिहिल्या आहेत; पण त्याचबरोबर त्याने स्वत: मोराला कधीच पाहिले नसल्यानं मोर दिसत नसल्याचेही म्हटले आहे. पुण्याच्या जवळील मोराची चिंचोली येथे मोर मोठ्या संख्येने असल्याचे त्याला शिक्षक वा आई-वडलांकडून कळले असेल. म्हणून त्याने हा मुद्दाही निबंधात लिहिला आहे,' असे नमूद करून शिंदे म्हणतात, की या मुलाचा निबंध म्हणजे शिक्षक-पालकांसाठी 'बोधनिबंध'च आहे. बरोबर आहे त्यांचं. मोरासारख्या 'राष्ट्रीय' पक्षी भलेही आजू-बाजूला दिसत नसेल; पण तो एखाद्या बागेत नक्कीच असू शकेल. मुलांना तिथं नेऊन तो दाखवून मग त्यावर निबंध लिहायला सांगावं, असा बोध शिक्षक यातून घेऊ शकतात.

पण, असा बोध घेण्याइतपत शिकण्याची तयारी असलेले शिक्षक आपल्याकडे आहेत कोठे? शिवाय या शिक्षकांनी चुकीचे तरी काय केले? आपल्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्यच ते जपत आहेत. पाहणे, हाताळणे, निरीक्षण करणे, अनुभव घेणे यांना आपल्या पद्धतीत स्थानच नाही. विषय निबंधलेखनाचा असो की पत्रलेखनाचा.. शिक्षक मुलांना लिहून देतात आणि मुले ते पाठ करून परीक्षेत 'रिते' करतात. त्यामुळेच आपल्याकडील शालेय मुलांच्या निबंधांमध्ये ग्रांथिक भाषा आढळते, उपमांचा भडिमार असतो आणि शाब्दिक फुलोरा असतो. शिक्षकांनी दिलेले किंवा बाजारातील पुस्तकांमधील 'आदर्श' निबंधांच्या घोकंपट्टीतून यापेक्षा दुसरे काय साध्य होणार? निबंध अशाच प्रकारे लिहिला पाहिजे, त्याची सुरुवात एखाद्या चांगल्या सुविचाराने करायला हवी, पाच ओळींनंतर नवा परिच्छेद करायला हवा, संस्कृतप्रचूर शब्द वापरायला हवेत, फुल न म्हणता पुष्प म्हणा, पाणी न म्हणता जल किंवा तोय म्हणा, निबंधात एखादे संतवचन टाका आणि समर्पक शेवट करा... असेच 'धडे' निबंधलेखनाच्या बाबतीत बहुतेक शाळांत दिले जातात. मग या उक्तीनुसार कृती करीत शिक्षकच चार-पाच निबंध लिहून देतात. (त्यातही काही महाभाग गाइड वा अन्य पुस्तकांतील निबंध कॉपी करून देतात!) मग, मुले हेच निबंध पाठ करतात. कारण यांपैकीच एखादा निबंध परीक्षेत येणार असतो ना!

निबंधांचे विषयही तेच ते असतात. 'माझी शाळा'पासून 'मी पंतप्रधान झालो/झाले तर..' पर्यंत किंवा 'पावसाळ्यातील एक दिवस'पासून 'एका झाडाचे आत्मवृत्त'पर्यंत. निबंधलेखनाचे हे विषय आणि लेखनाबाबतचे अध्यापन या दोन्हींत गेल्या अनेक वर्षांमध्ये विशेष फरक पडलेलाच नाही. वास्तविक निबंधलेखन हे अभिव्यक्तीचे एक साधन आहे. मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यायला हवे. ते कसे व्यक्त होतात, त्यांच्या भावजीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात कसे उमटते, भोवतालच्या जगाकडे-नातेसंबंधांकडे ते कसे पाहतात, निरीक्षणे टिपण्याची त्यांची पद्धत, त्यांची शब्दनिवड.. हे सारे निबंधलेखनातून समजू शकते. त्यामुळे विषयांपासून लेखनापर्यंत विशिष्ट अशी चौकट ठेवण्याची गरजच नाही. मात्र, संपूर्ण शिक्षणालाच साचेबद्ध केल्याने निबंधाचीही त्यातून सुटका होणे अवघड आहे. मुलांचे अनुभवविश्व आणि भावविश्व समजून घेऊन त्याला अनुसरून विषय सुचवून मुलांकडून निबंधलेखन करवून घेण्याचा प्रकार सहसा होत नाही. शिक्षणाबाबत प्रयोगशील असलेल्या काही शाळा याला अपवाद आहेत.

हीच गोष्ट पत्रलेखनाचीही. मित्र वा मैत्रिणीला पत्र, आई वा वडलांना पत्र किंवा एखाद्या दुकानातून पुस्तके वगैरे मागविण्यासाठीचे पत्र; फारतर वृत्तपत्रांसाठीचे पत्र. यापलीकडे पत्रांचे विषयही जात नाही. पत्ता आणि मायना लिहिण्याची पद्धत ठरलेलीच. शेवटही ठरलेलाच. निबंध आणि पत्रलेखन हे दोन्ही लेखन प्रकार साचेबद्धतेत अडकल्याने मुलांमधील लेखनक्षमता विकसित होण्यास मर्यादा येत आहेत. पदवीनंतरही चार ओळींचे पत्रही धडपणे लिहू न शकणाऱ्यांची संख्या वाढण्याचे हेही एक मुख्य कारण आहे.

विज्ञान शिक्षणाच्या बाबतीतही हेच घडते आहे. हा विषय तर प्रात्यक्षिकांवर आधारलेला. मात्र, आपल्याकडील बहुतेक शाळांत प्रात्यक्षिके होतच नाहीत. माध्यमिक शाळांच्या वर्गात फारतर शिक्षक प्रात्यक्षिक करून दाखवतात! मुलांना करू देत नाहीत! मुले विज्ञान शिकतात ते पुस्तकातून. निरीक्षणातून, अनुभवातून आणि प्रयोगांतून नव्हे. विज्ञानातील मूलभूत नियम अनेक पाठ करतात. मात्र, त्यांचा पडताळा घेत नाहीत. या नियमांचा व्यवहारातील उपयोगही बहुतेकांना माहीत नसतो. कारण तसे शिक्षणही मिळालेले नसते. आकाश, जमीन, नदी, नाले, पाणी, माती, झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, रस्ते, वाहने, वीज... या भोवतालच्या साऱ्यांमधून विज्ञानातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होत असतो. त्या सर्वांचे निरीक्षण करून, त्यांची वैशिष्ट्ये टिपून, नोंदी घेऊन विज्ञान शिकविण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्याऐवजी पुस्तकांतील धडे वाचायचे, विज्ञानातील इंग्रजी शब्दांना संस्कृतप्रचुर मराठी शब्द (ज्यांचा अर्थ सहसा कळत नाही) पाठ करायचे, प्रश्नांना शिक्षकांनी लिहून दिलेली उत्तरांची (असे शिक्षक आदर्श असतात!) घोकंपट्टी करायची आणि परीक्षेत ते उतरून काढायचे.. ही आपल्या विज्ञान शिक्षणाची तऱ्हा आहे. देशात संशोधक का घडत नाहीत, याचे उत्तर यामध्ये दडले आहे.

हल्ली शाळांमध्ये मुलांना प्रकल्प करायला सांगतात. बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रकल्प त्यांचे पालकच करून देतात, असा अनुभव आहे. 'काय हे मुलांच्या मागे प्रकल्पांचे झंझंट लावले आहे. त्यामुळे त्यांचा अभ्यास मागे पडतो आहे,' अशी काही पालकांची तक्रार असते. मुलांनी स्वत:हून विषय समजून घ्यावा, आशय जाणून घ्यावा आणि मूळ तत्त्व लक्षात घेऊन कृती करावी, या प्रकल्पामागच्या मूळ हेतूला केव्हाच हरताळ फासला गेला आहे. मुलांनी स्वत:हून काही करावे, हा विचारच आपल्या शिक्षक-पालकांमध्ये रुजलेला नाही. त्यामुळे स्पून फीडिंगचा प्रकार वाढला आहे. परीक्षा आणि मार्कांना मिळालेले अवास्तव महत्त्व, भाषाशिक्षणाला दिलेले दुय्यम स्थान, विज्ञान शिक्षणातही घोकंपट्टीवर दिलेला भर आणि स्पून फीडिंग यांमुळे शिक्षणाला आलेली साचेबद्धता दूर करण्याची आज खरी गरज आहे. साचेबद्धतेतून शिक्षणाला मुक्त करीत निरीक्षणातून आकलन वाढविण्यावर भर देणारी आणि मुलांना स्वत:हून काहीतरी करायला लावणारी पद्धत तयार झाल्यास शिक्षण अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल. मोरावरील निबंधाचा हा खरा बोध आहे.

१. १-१० किंवा कोणतेही क्लासेस घ्यायला शैक्षणिक अर्हता काही असावी लागते का?

२. प्रोफेशनल टॅक्स, सर्विक्स टॅक्स, दुकान गुमास्ता कायद यापैकी काही नोंदणी लागते का? इंकम टॅक्स ज्या त्या रुलप्रमाणे लागणार, हे उघड आहे.

३. आणखी कोणती नोंदणी करावी लागते का?

४. फर्निचर- बेंच कंपल्सरी लागते का?

शाळेमध्ये नोकरी करणार्याने खाजगी शिकवणी घेऊ नये असा कायदा आहे.
हा कायदा फ़क्त मास्तराना लागू आहे का?

शाळेत काम करणारे क्लार्क, शाळेचे डायरेक्टर याना हा कायदा लागू होतो का?

या कायद्याची ऒनलाइन लिंक मिळेल का?

मराठीचे क्लासे स घ्यायचे मनात आहे. लहान विद्या र्थ्यांसा ठी आणि स्पेशल मराठी क्लास बोर्ड परीक्षां साठी. काही सूचना सल्ले असल्यास द्या. इंग्रजी व्याकरणा साठी रेन मार्टिन आहे तसे मराठी साठी काही आहे का पुस्तक? बिल्डिंग मध्ये खूप सारी सिंधी पंजाबी, गुजराती तमीळ मुले आहेत. त्यांना उपयोगी होईल.

अमा

फूकट नका घेउ. महिना ३ शे ते ५ शे दर आहेत.

घरात ३ बाय २ चे ३ - ४ व्हाईट बोर्ड लावा... एका यत्तेची पोरे आली की शिकवा. एक तास शिकवा. मग एका बोर्डावर त्याना अर्ध्या तासाचे वर्क द्यायचे. इतर बोर्डवर दुसरी यत्ता लगेच सुरु करायची .. असे ओव्हरल्याप करा.

इतर क्लास सुरु व्हायच्या आधीपेप्राt हँडबिल द्या .

१०वी ला वाळिंब्यांचे मराठी व्याकरण वापरले आहे. खूप ऊपयोग झाला होता. एक लहान आणि एक मोठं अशी दोन पुस्तके होती. अर्थात मोठं जास्त डिटेल आणि आवडीचं होतं.
रेन मार्टिन वापरले नाही तेव्हा त्यासारखे आहे की नाही सांगता नाही येणार.

Bangalore rates are 100 to 150 rs. Per hour for Hindi group tuitions. Weekly 2 to 3 hours depending on students grasping power. One on one for Kannada (3rd language) 300 to 400 per hour weekly once. Payment in advance.

Thanks a lot i will buy the grammar book. There are actual marathi kids who cannot speak fluently and slip into tapori hindi .

Pages