रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET)

Submitted by रचना. on 25 June, 2012 - 06:50

सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्‍यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.

ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.

ही पेस्ट्रि खास लाजो साठी

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988

गुलमोहर: 

सुंदर....अफाट
जादू आहे तुझ्या हातात... >> +१०००००.....००००००
अत्तिशयच गोड झालंय हे. सांगितलं नसतंस तर पेपरपासून बनवलंय ह्यावर मी खरंच विश्वास ठेवला नसता.
_________/\___________

अहो मायबोलीच्या बाहेर काही लोड करुन इथे दाखविले तर मला दिस्त नाही. आमच्यात मायबोली सोडून बाकी सर्व ब्यान आहे ! Happy
असो.

खुपच सुंदर दिसतंय्..चमच्यावरुन आख्ख्या टी-सेट ची कल्पना आलीच्.तुझ्या क्वीलिन्ग च्या अवजारांचाही एक फोटो टाकशील का? त्यातील कोणते जास्त वापरले जाते किंवा कोणते कुठे वापरतात हे लिहीले तर जास्त छान्.कारण दुकानात गेल्यावर समजत नाही व यासाठी च्या खास कागदी पट्ट्या मिळतात त्या एकुण महाग असतात .त्याचा विकल्प लिहीशील का?

___/\____

अरे काय मस्त आहे हे! क्यूऽऽऽट, मला पण हव.... (हट्ट करणारा चेहरा) कस बनवलं हे?
मला मातीमधे येत काम करता, पण हे कागदाच म्हणजे, कधी अस्ला विचारच केला नव्हता! Happy खासच.
भलतच्च नाजुक काम दिस्तय हे, तस अवघडे करायला.
अन फोटू मायबोलीवरुन दाखविल्याबद्दल धन्यवाद, नैतर माझे हे बघणे हुकलेच अस्ते. Happy

सुलेखा,
एकुणच पेपर क्राफ्ट्वर एक लेख पाडायचा विचार आहे. त्यात सगळं सविस्तर लिहेन. तयार पट्ट्यांना विकल्प म्हणजे ८० gsm किंवा जास्तचा कागदाच्या स्वतः कटर आणि स्टिलची पट्टी याने पट्ट्या कापणे. मी केलेल्या बहुतेक प्रोजेक्ट्मध्ये अश्याच स्वतः कापलेल्या पट्ट्या वापरल्या आहेत. कारण मला हवी ती रंगांची शेड तयार पट्ट्यांमध्ये बर्‍याचदा मिळत नाही. बोट आणी हात पण खुप दुखतात.
अजुन एक ऑप्शन आहे. पेपर श्रेडर. मी मागवलेला पोस्टाची कृपा झाल्यास आजच मिळेल असं वाटतय. पार्सल आल्यावर फोटो टाकते.

एकुणच पेपर क्राफ्ट्वर एक लेख पाडायचा विचार आहे. त्यात सगळं सविस्तर लिहेन>> खरच खर लिहा. आम्हा पामरांवर तेवढीच कृपा Happy

Pages