पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी नऊवार साडी नेसायच्या पद्धतींबद्दल बरीच माहिती मी त्यांना दिली होती. प्रात्यक्षिके दाखवली होती जी त्यांच्या फोटोग्राफरने शूट केली होती. त्यांना माझ्या ओळखीच्या कातकरी आणि ठाकर वस्त्यांमधे घेऊन जाऊन तिथे आम्ही त्या साड्या शिकलो होतो. त्या स्त्रियांच्या मर्यादेला धक्का न लावता जेवढे फोटो काढणे शक्य होते तेवढे काढले होते. ओळखीच्या कोळी आणि आगरी समाजातल्या स्त्रियांकडे जाऊनही त्यांची साडी नेसण्याची पद्धती शिकलो होतो, फोटो काढले होते. मला खूप मजा आली होती हे सगळं करताना. माझ्याकडची माहिती/ ज्ञान देताना मीही खूप शिकले होते.

या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या पुस्तकात आलेला माझ्या नावाचा उल्लेख.

मला कल्पना आहे की इथले जे दणदणीत यश मिळवणार्‍यांबद्दल सांगणारे जे बाफ आहेत ते बघता हे काहीच नाहीये. पण एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. Happy

ह्या बाफची योग्य जागा जिथे असेल तिथे अ‍ॅडमिनने हलवावे. बाफच योग्य न वाटल्यास उडवून टाका. काही हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप,
उगाच एक उत्सुकता म्हणून विचारते, स्त्रिया लढाईवर जाताना विशिष्ट प्रकारची नऊवारी पातळ नेसायच्या असे कुठेतरी वाचले होते, माझ्या वहीनीच्या आईला तशी साडी नेसवता येते, अशाप्रकारे नऊवारी साडी लढाईवर जाताना नेसली जायची का..? याबाबत मला शंका आहे. तुला काही कल्पना आहे का..? Happy

सारिका, मला मिळालेल्या माहितीप्रमाणे युद्धावर जाणार्‍या स्त्रियांची नऊवार साडी नेसण्याची पद्धत त्यांच्या त्यांच्या जातीच्या नेसण पद्धतीप्रमाणे ठरे. बहुतांशी स्त्रिया या तथाकथित निम्न वर्णातून आलेल्या असत (अर्थातच याला अपवाद असत). महाराष्ट्रातील कष्टकरी जमातींमधे नऊवार नेसायच्या पद्धतीत बारीक बारीक फरक आहेत पण निर्‍या न काढता, साडीचा बराचसा भाग कमरेवर पट्ट्यासारखा घट्ट गुंडाळून नेसणे हे कॉमन आहे.
या सर्व जमातींमधे सणासुदीला, लग्नासंमारंभात मात्र निर्‍या काढून नऊवार नेसली जाते. असो.

तुझ्या वहिनींच्या आईंना कश्या प्रकारची साडी येते हे मला सांगितलेस तर मी ते योग्य आहे का ते सांगू शकेन. माहित नसेल किंवा खात्री नसेल तर तसेही सांगेन. इथे किंवा विपु मधे.

अरे वा वा वा वा! मनःपूर्वक अभिनंदन. Happy

(अवांतर - आपल्या नियोजित साडी-ड्रेपिंग-वर्कशॉपची - आणि मला जी बंगाली साडी ड्रेप करायला शिकायची आहे त्याची - पुन्हा एकदा आठवण झाली. Wink )

अरे वा. मस्त. निधप तुझा या विषयात इतका अभ्यास आहे तर तूच मराठी मधे एक नऊवार आणि महाराष्ट्रातील साड्यांवरचे पुस्तक लिहून काढायचे मनावर घे.

नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेंद्रता ॥

धाग्याला आलेल्या प्रतिसादांची संख्याही तुमची पॉप्युलारिटी दाखवितात. अभिनंदन.

अभिनंदन.. Happy
यावर्षी बरीच अभिनंदनं स्वीकारत आहेस, अशातच कथेसाठी केलं होतं, त्याआधी पण कशासाठीतरी केलं होतं ना.. Happy

Pages