पुस्तकात नामोल्लेख!

Submitted by नीधप on 24 June, 2012 - 01:50

दिल्लीस्थायिक रिता कपूर या गेली अनेक वर्ष भारतीय साड्यांच्या संदर्भात संशोधन, दस्ताऐवजीकरण याचे काम करत आहेत.

'सारीज ऑफ इंडीया' या नावाने हे सर्व काम त्यांनी दोन खंडांमधे प्रकाशित केले आहे. दुसरा खंड नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या खंडा महाराष्ट्रातील साड्यांबद्दल विवेचन आहे.
मराठी साड्यांच्या विविध प्रकारच्या नेसण पद्धतींबद्दल विवेचन असलेल्या भागामधे माझा उल्लेख आहे.

सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी नऊवार साडी नेसायच्या पद्धतींबद्दल बरीच माहिती मी त्यांना दिली होती. प्रात्यक्षिके दाखवली होती जी त्यांच्या फोटोग्राफरने शूट केली होती. त्यांना माझ्या ओळखीच्या कातकरी आणि ठाकर वस्त्यांमधे घेऊन जाऊन तिथे आम्ही त्या साड्या शिकलो होतो. त्या स्त्रियांच्या मर्यादेला धक्का न लावता जेवढे फोटो काढणे शक्य होते तेवढे काढले होते. ओळखीच्या कोळी आणि आगरी समाजातल्या स्त्रियांकडे जाऊनही त्यांची साडी नेसण्याची पद्धती शिकलो होतो, फोटो काढले होते. मला खूप मजा आली होती हे सगळं करताना. माझ्याकडची माहिती/ ज्ञान देताना मीही खूप शिकले होते.

या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्या पुस्तकात आलेला माझ्या नावाचा उल्लेख.

मला कल्पना आहे की इथले जे दणदणीत यश मिळवणार्‍यांबद्दल सांगणारे जे बाफ आहेत ते बघता हे काहीच नाहीये. पण एखाद्या संशोधनात्मक पुस्तकात आपली नोंद एका छोट्याश्या गोष्टीत का होईना एक्स्पर्ट म्हणून केली जाणे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच झाले आहे आणि त्यामुळेच बहुतेक मला महत्वाचे वाटते आहे. Happy

ह्या बाफची योग्य जागा जिथे असेल तिथे अ‍ॅडमिनने हलवावे. बाफच योग्य न वाटल्यास उडवून टाका. काही हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरजा, मनापासून अभिनंदन Happy कल्पना / अपेक्षाही नसताना रिकग्निशन मिळणे याचा आनंद काही औरच असतो.

अभिनंदन नीरजा!

त्यांची परवानगी असेल तर तुझ्या नामोल्लेखाचा (थोडासा तरी) भाग इथे स्कॅन करून टाकता येईल का?

पहिला भाग इथे विकायला ठेवलेला दिस्तोय. दुसराही कदाचित इथे येईल.

अरे सहीच !
मनापासून अभिनंदन. Happy आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
कलेची दखल घेतली जाणं याचा आनंद तो कलाकारच जाणे..>> +१

मृण, माझ्या हातात अजून कॉपी आलेली नाहीये. काल रिता कपूर यांचा फोन आला होता. होपफुली येत्या ८-१५ दिवसात हातात येईल. नंतर त्यांना विचारून स्कॅन करून टाकेन.

नीरजा, अभिनंदन... मनापासून अभिनंदन.
तुझ्या नावाचा उल्लेख हा बोनस आहे... तुझा त्या संशोधनातला वाटा, तू घेतलेले परिश्रम... त्यासाठी तुझं अभिनंदन.

Pages