तुला कधी मिशा फुटणार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2012 - 11:27

तुला कधी मिशा फुटणार?

पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर

पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर

काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?

राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर

तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच
तरी वेळ येते कधीकधी, डोक्यात भूत शिरल्यावर

तुमची चर्चा चालू ठेवा, अशी, जशी वाटेल तशी
मी मात्र शब्दांना माळेत गुंफतो मला स्फुरल्यावर

निष्कारण वार केलास तू म्हणून फणा उचलला, पण;
जा तुला मी ’अभय’ देतो तू आता मागे हटल्यावर

                                                   - गंगाधर मुटे
------------------------------------------------------

गुलमोहर: 

मिशा फुटणे या बाबीचा एकी करणे या बाबीशी काही संबंध नाही>> एकदम बराबर. आणि आम्हा बायाना मिशा फुटत नाय म्हणुन आमच्यात एकी नसते होय ? की इथ पण बाप्यवाद आला ? पुरुषसत्ताक...
कविला अस म्हणायच आसल की माणसाला मिशीफुटली तरी तो एकी का करत नाही ? प्राण्याना शिंग फुटली तरी ते एकी करत्यात. आणि माणस डोस्की फुटली तरी एक होत न्हायत. मुगाला मोड फुटले की त्यान्च्यात एकी होते आणि मस्त आमटी बनते.
तरी एक बाब नाय कळली.. कवीला कोणती माणस म्हणायचीत ? गावाकडची, शरातली, झोपड्यातली ? माराठी ? बापे ? बाया ? या अक्ख्या विश्वातली ?
आजकाल बापेतरी कुठं मिशा ठेवतात ? तर एकी कशी होयल ? म्हणून म्हण्ते बाप्यानू मिशा वाढवा.. एकी वाढवा.. एक चिमनी अनेक चिमन्या.. एक एक अनेक. म्हणून भरपुर मिशा अनेक मिश्या.. मिश्याच मिश्या.. मग मिशीला साजूक तूप लावा.. पुर्ण मिशीत एकी होईल..
बायकांच्या एकीवर पण होवदे एक कविता (गझल)..

pradyumnasantu,

आपण दिलेला दोनोळीचा भावार्थ/सारांश/तात्पर्य अगदी बरोबर आहे.

पण त्या दोनोळीचा शब्दशः अर्थ काढणे अजून बाकी राहिलाच आहे.

"दगडांच्या देशा" असे गोविंदाग्रजांनी लिहिल्यावर त्याचा अर्थ मराठी रसिकांना समजला होता.
किंवा
प्र. के. अत्र्यांनी "हिमालयाच्या मदतीला सह्याद्रि धावला" असे म्हणताच मराठी भाषिकांना चटकन त्याचा मतितार्थ कळला होता. एवढा आपला मराठी माणूस प्रगल्भ आणि समृद्ध आहे.

त्यामुळे माझ्यासारख्या पामराच्या दोन ओळींना समजून घेणे त्याला फारसे कठीण जाणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे.

कुणितरी अधिक सविस्तर अर्थ लिहिण्याची वाट पाहतो आहे. Happy

कुणितरी अधिक सविस्तर अर्थ लिहिण्याची वाट पाहतो आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.


आतातर तुम्ही सगळ्याच प्रतीसादकांची टर उडवीताहात सर.....हद्द झाली !!!

असं काय सोनं लागलंय का त्या ओळीना की तुम्ही इतक्या कवटाळून बसलाहात त्या ....

बाकीची कविता "फाडली" नाही कुणी ते बाकी बरं झालं.............. नैतर तुम्ही अख्ख्या माबोला त्राहीमाम करून सोडलं असतंत नै!!
................ तसाच आविर्भाव आहे तुमचा अगदी .........अवघडय बुवा !!

(.............की झालेला अपमान सहन होतनाहीय अजून म्हणून एकट्यानेच उगाळताय तो केन्व्हापासून्चा..........
सर राहुद्या आता ............ बुंद से गई वो हौज से नाही आती !!)

(जावुन्द्या सर सरळ सान्गून टाका ना ....."मलाच अर्थ माहीत नाही" म्हनून ..आमी नाय कुनाला सान्गनार बर्का आपलं शीक्रेट !!)

वैवकु,

अहिर्‍याने गहिर्‍याला बहिरा म्हटले तरी तो बहिरा नसलेला गहिरा बहिरा ठरत नाही आणि गहिर्‍याने अहिर्‍याला सहिरा म्हटल्याने तो बहिरा असलेला अहिरा सहिरा ठरत नाही. Happy

नाचता येईना अन्गण वाकडे.............(अन्गणला पर्यायी शब्द आहे पण तो अश्लील आहे म्हणून सान्गत नाही )

वैवकू,

ज्याला नाचता येत नाही आणि अंगणाला दोष देतो, त्याला फारतर दहा-पाच माणसे खपवून घेतील. सर्वसाधारण निष्पक्ष आम माणूस नाही. प्रत्येक कृतीचे महत्व त्यामागील वास्तविकतेवरच अवलंबून असते. Happy

>> कुणितरी अधिक सविस्तर अर्थ लिहिण्याची वाट पाहतो आहे. <<

अरे काय, हे तर अगदि सोप्पं आहे. बहुतेक कवि आपल्या रचना प्रेयसी, निसर्ग, वगैरे वगैरे (मुच्छ्ड अशोक नांदगांवकर नाहि) वर करतात. मुटे साहेबांनी हि कविता आपल्या परमप्रिय मित्राला उद्धेशुन केलेली आहे, असा मला दाट संशय आहे. Happy

तो मित्र कोण, हे त्या मित्राला आणि मुटेसाहेबांना पक्कं माहित आहे. Happy

थोडक्यात, तुला मिशा कधि फुटणार = तुला अक्कल कधि येणार... Happy

.

तुला मिशा कधि फुटणार = तुला अक्कल कधि येणार.. सहमत.

मी हा मतला आपल्या परमप्रिय मित्राला उद्धेशुन लिहिलेला नाही. शेतकरी समाजाला उद्देशून लिहिलेला आहे. Happy

Pages