तुझं नसणं....की असणं?

Submitted by निंबुडा on 23 April, 2012 - 06:02

वीणेचे ध्वनी विरले तरी
कंपनं मागे रेंगाळावी
अस्तित्वाच्या खुणा मिटल्या तरी
चाहुल मागे सळसळावी
तसं तुझं भरून राहणं!

समुद्राच्या लाटा लोपल्या तरी
गाज मागे रहावी
पाव्याची धुन थांबली तरी
रुंजी मनात उरावी
तसं तुझं उरून राहणं!

चंदन झिजून संपलं तरी
गंध मागे दरवळावा
मैफिलीतलं गाणं सपलं तरी
सूर मागे रेंगाळावा
तसं तुझं पुरून राहणं!

ब्लॉग वर पूर्वप्रकाशित

गुलमोहर: 

विदिपा, Happy

अर्धवट वाटते आहे, घाईगडबडीत आटोपती घेतल्यासारखी.
>>
नाही रे. तशीच आणि तेव्हढीच सुचली होती. Happy

लहानपणी सुचली असणार निंबुडे..... मोठेपणी तुझ्या जाणीवेच्या कक्षा अधिक रुंदावल्यात Proud Wink

पण का कोण जाणे अर्धवट वाटते आहे, म्हणजे घाईगडबडीत आटोपती घेतल्यासारखी.
>>
मंदार,
माझ्या एका मैत्रिणीनेही ही कविता वाचून तुझ्या सारखीच प्रतिक्रिया दिली. तिच्या मते "कविता अर्धवट कधी वाटते....म्हणजे कोणतीही कलाकृती.....अगदी निबंधसुद्धा....जेव्हा त्याचे काहीतरी सार किंवा 'कहानी मे ट्विस्ट' असे काहीतरी नसते तेव्हा....तेव्हढेच या कवितेत नव्हते, म्हणून ती तशी वाटली....पण नाहीतर कविता छान आहे तुझी!"

पुढे तिने लिहिले की

"तुझ्या कवितेला मला एक आर्त शेपूट सुचले.....आपोआप....

कसा विश्वास ठेवू मी तुझ्या नसण्यावर?
खरेच.....असणे-नसणे असे काही असते की
सगळे माझ्या मनाचे भास?
"

तिची ही प्रतिक्रिया वाचून मला तुझ्या वरील प्रतिसादाचा अर्थ उमगला आणि कळले की तुला कविता अर्धवट का वाटली ते! Happy

तसं तुझं भरून राहणं!
तसं तुझं उरून राहणं!
तसं तुझं पुरून राहणं!
>>>>>>>>>>>>>>>

निंबे, आधी भरलास तरीही उरला म्हणून शेवटी "पुरलास" Proud Biggrin

देव त्याच्या आत्म्याला शांती देवो Wink