नाणेघाट व्हाया घाटघर

Submitted by जिप्सी on 19 June, 2012 - 01:01

माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".

निळेशार आभाळ आणि सर्वत्र पसरलेलं सोनसळी गवत, मित्रांची संगत अन् पावसाची रंगत. दोनच दिवसात अनुभवलेले तीन ऋतु. नाणेघाटाची घळ आणि भन्नाट पावसाळी वातावरण. शिवनेरी, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, या पंचदुर्गाचे "दूरदर्शन" :-), कांदाभजी, मिसळपाव, गरमागरम मक्याचे कणीस आणि उकडलेल्या शेंगा. भिमाशंकर येथे पाहिलेला पहिल्याच पावसाचा रौद्रावतार, परतीच्या प्रवासात माळशेज घाटातील ओसंडुन वाहणारा सीझनचा पहिला धबधबा. "छोटीसी कहानी से बारीशोंके पानी से" भरलेली आणि भारलेली माळशेज, भीमाशंकरची वादी.

"कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है.....बहने दो........"
थोडक्यात काय तर या वर्षीच्या पहिल्या पावसाळी भटकंतीची सुरुवात जोरदार झाली. Happy
=======================================================================
=======================================================================
नाणेघाटात वैशाखरेहुन दोनदा जाउन आल्यामुळे यावेळेस घाटघर मार्गे गेलो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२
किल्ले जीवधन आणि खडा पारशी
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
<

नाणेघाट
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
जकातीचा दगडी रांजण
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
नानाचा अंगठा
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
आमची स्विफ्टुकली. Happy Happy
प्रचि ३१

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जिप्स्या - तोडलंस मित्रा...एकसे एक कडक फोटो

प्रचि ३, ६, ७ मस्त....

सायकलचा फोटो तर अगदीच जमलाय....ब्राव्हो..एक काम करता आला तर पहा...त्याला क्रॉस प्रोसेस करून किंवा बॅकग्राऊंड ब्लॅक अँड व्हाईट करून सायकल फक्त कलर मध्ये असा काहीतरी इफेक्ट दे..अजून भारी वाटेल
प्रचि २५ मध्ये उजव्या कोपर्यातले टॉवर खटकतायत...ते क्रॉप कर किंवा फोटोशॉप करून गायब कर
नानाचा अंगठा, प्रचि २८, २९ सुरेख
स्विफ्टचा फोटो मारूती वाल्यांना पाठव...जाहीरातीसाठी वापरायला...
अर्थात त्यात पण टॉवर नसता तर अजून वाईल्ड फिल आला असता..
रच्याकने प्रचि १ ला सॅच्युरेशन जास्त झाले आहे.

धन्स आशु Happy
अर्थात त्यात पण टॉवर नसता तर अजून वाईल्ड फिल आला असता..>>>>>सेम पिंच
प्रचि २५ मध्ये उजव्या कोपर्यातले टॉवर खटकतायत...ते क्रॉप कर किंवा फोटोशॉप करून गायब कर>>>तु सांगितल्यावर लक्षात आल. Happy
रच्याकने प्रचि १ ला सॅच्युरेशन जास्त झाले आहे.>>>>>ह्म्म्म. Happy

जीप्स्या आता गुहेत राहता येत का रे मागच्या डिसेंबर मधेच खडा पारशी rappel down केला होता. त्यात जी मजा आहे ती ट्रेकर सोडून दुसऱ्या कुणाला कळणार रे?. अस एकूण आहे कि जुन्या काळी तो दगडी रांजण दिवसातून जवळपा २५ ते ३० वेळा रिकामा व्हायचा. रेलिंग लावून नैसर्गिक फिल गेला रे गुहेचा. नाहीतर तिथ पाय सोडून रात्रभर गप्पा मारायला काय मजा यायची
बाकी प्रची चाबुकच
शेवटी काय
आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र Happy

अरे! गुहेला लोखंडी दार! रेलिंग ! आत राहायला देतायत ना ? घळीला फर्शा ? मुळ शोभा गेल्यासारखी वाटते रे! पण प्रचि मस्त Happy

व्वा!! मस्त फोटो Happy नेहमीप्रमाणेच! Happy

माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात"<<< हे खुप आवडलं Happy

आता पाऊस आणि धबधबे दाखव लवकर Happy

<< माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".>> हे सहीच. Happy
प्रचि ३ , २८ आणि ३० खूप आवडले.

जीप्स्या आता गुहेत राहता येत का रे
अरे! गुहेला लोखंडी दार! रेलिंग ! आत राहायला देतायत ना ?मुळ शोभा गेल्यासारखी वाटते रे >>>>>आता गुहेत रहायला देतात कि नाही ते माहित नाही पण रेलिंग आणि लोखंडी दार यामुळे खरोखर नाणेघाटाची मूळ शोभा गेल्यासारखी वाटते. आतातर वर पठारावर हॉटेलपण सुरू झालंय. Sad

नाहीतर तिथ पाय सोडून रात्रभर गप्पा मारायला काय मजा यायची>>>>>>+१

घळीला फर्शा ? >>>>हो, घळीच्या सुरुवातीला, दगडी रांजणासमोरच्या भागात फरशा बसवल्यात. Sad

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र>>>>>क्या बात है!!!!

आता पाऊस आणि धबधबे दाखव लवकर>>>>>नक्कीच Happy

कित्ती दिवसात बाहेर पडली नाहीये मी अन क्लिकक्लिल्क केलं नाहीये>>>>अवल, आता पावसाळा सुरू झालाय तेंव्हा "क्लिकक्लिकाट" सुरू होऊ दे. Proud

पुन्हा पुन्हा बघितले Happy
रच्याकने तू ढगांशी कसे सेटिंग करतोस Wink तो तिसरा फोटो कसला अफलातून घेतलायस.
५ मधली डेफ्त भारी !
८ ला पोटात गोळाच आला रे Happy
१० थोडा क्रॉप कर ना
अन १२ ला पायात गोळे Proud
१६ ला तुझा वॉमा त्या तारांवर पर्स्पेक्टिव्ह करून टाकलास तर ?
१८, १९ अप्रतिम सुंदर !
२२ सायकल उलट्या दिशेने असती तर अगदी टांग मारता आली असती Wink
नानाचा अंगठा अन त्या पुढचे ते तळे अफलातून !
२७ स्वप्न
२८ सत्य
३० रंगबिरंगी दुनिया
३१ स्वप्न सत्यात उतरवणारी परी Happy

काय नशीब आहे .....किति फिरायला मि ळ ते ( आम्हाला पण)...ऑफीसमध्ये बसुन......अप्रतिम फोटो....

Pages