नाणेघाट व्हाया घाटघर

Submitted by जिप्सी on 19 June, 2012 - 01:01

माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".

निळेशार आभाळ आणि सर्वत्र पसरलेलं सोनसळी गवत, मित्रांची संगत अन् पावसाची रंगत. दोनच दिवसात अनुभवलेले तीन ऋतु. नाणेघाटाची घळ आणि भन्नाट पावसाळी वातावरण. शिवनेरी, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, या पंचदुर्गाचे "दूरदर्शन" :-), कांदाभजी, मिसळपाव, गरमागरम मक्याचे कणीस आणि उकडलेल्या शेंगा. भिमाशंकर येथे पाहिलेला पहिल्याच पावसाचा रौद्रावतार, परतीच्या प्रवासात माळशेज घाटातील ओसंडुन वाहणारा सीझनचा पहिला धबधबा. "छोटीसी कहानी से बारीशोंके पानी से" भरलेली आणि भारलेली माळशेज, भीमाशंकरची वादी.

"कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है.....बहने दो........"
थोडक्यात काय तर या वर्षीच्या पहिल्या पावसाळी भटकंतीची सुरुवात जोरदार झाली. Happy
=======================================================================
=======================================================================
नाणेघाटात वैशाखरेहुन दोनदा जाउन आल्यामुळे यावेळेस घाटघर मार्गे गेलो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२
किल्ले जीवधन आणि खडा पारशी
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
<

नाणेघाट
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
जकातीचा दगडी रांजण
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
नानाचा अंगठा
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
आमची स्विफ्टुकली. Happy Happy
प्रचि ३१

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वॉव... जिप्स्या.. क्या सीन्स हैं!!!आँखोंकी ठंडक..
दुसर्‍या फोटोतल्या पक्ष्यांना जोरदार पाऊस आगामी सूचना मिळालेली दिसतीये..
प्रचि २८ चं एक सुंदर पोस्टकार्ड ,ग्रीटिंग कार्ड बनू शकेल..
सर्वच प्रचि अति सुंदर!!!

जिप्सी मस्तच फोटो.. Happy
दुसर्‍या फोटोत तुझ्या नावाच्या वरचा ढग एका पक्ष्यासारखाच दिसतोय.. तो फोटो मला खुप भावला. सेवला Proud

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

दुसर्‍या फोटोत तुझ्या नावाच्या वरचा ढग एका पक्ष्यासारखाच दिसतोय>>>>रूपाली Happy तो अगदी अँग्री बर्डसारखा दिसतोय मला. Happy

मस्त प्र. चि.! आणि तुम्ही केलेले वर्णनही फारच सही!! असे वाटतेय आत्ता लगेच भटकायला बाहेर पडावं... Happy

प्र.ची. सुंदर ! पावसाळी भटकंती सुरु झालीये तर, हे क्रमशः लिहायच राहिलय ना ? बाकिचे पण येउदेत भिमाशंकर अन इतरही !<<<आमची स्विफ्टुकली>>>> छान आहे Happy

मस्त... रस्ता इतका चांगला केला आहे हे पाहुन डोळे भरुन आले.

त्या जाळ्या लावल्याने काही फरक पडला आहे काय आत? आणि तो दगडांचा पक्का रस्ता कुठे बनवला आहे? रांजणासमोर?

व्वा! फोटो आणी वर्णन नेहमीप्रमाणे अफलातून. Happy
चला, आता पावसाळ्याचे नवीन नवीन फोटो पहायला मिळतील. Proud

फोटो नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
पण या वेळी मला बरेच फोटो एकसारखे (रिपीट) वाटले. (हे मा वै म कृ गै स न) Happy

तो अगदी अँग्री बर्डसारखा दिसतोय मला. >>> नाय रे तो फिनिक्स पक्षीच आहे
अप्रतिम प्रचि तो २७ वा प्रचि जरा अजुन मोठा करना भन्नाटच आहे तो Happy

जिप्सी.. मस्तच प्रचि.. नाणेघाट छानच.. प्रचि ८ मध्ये उभे राहून उडीचा फोटो घ्यायचा आहे.. सो चल परत.. ! Proud

मस्त फोटो............
ऑफीस मध्ये सर्वाना आवडले............या वर्षी पावसाळ्यात इकडेच जायचे ठरले आहे....
पण .......मुंबई हून कसे जायचे ते सांगा ...........किती लांब आहे.

सह्ही. यंदाच्या पावसाळ्याचे पहिले फोटो. मस्त. पावसाळी वातावरण पहिल्या फोटोत मस्त चित्रित केलंयस. मला २, २७ फारच आवडले. खडा पार्शीही सह्हीच आहे. Happy

आणि सुरवातीलाच लिहिलंय महाभारी.
>>>>माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात". >>>> _____/\_____

स्विफ्टुकलीही गोड आहे. Proud

मस्त प्रचि Happy

माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".>>> खरा रसिक आहेस Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

रस्ता इतका चांगला केला आहे हे पाहुन डोळे भरुन आले.>>>>>:फिदी:

पण या वेळी मला बरेच फोटो एकसारखे (रिपीट) वाटले. (हे मा वै म कृ गै स न)>>>>>अरे ते सगळे वेगवेगळे आहेत Happy पण सारखे वाटत असेल तर मग माझी चूक. Happy

प्रचि ८ मध्ये उभे राहून उडीचा फोटो घ्यायचा आहे.>>>>>>तुझ्या उडीबाबाची आठवण झालीच होती रे Happy

कार मध्ये सायकल पण नेली होतीस ?>>>:-) Happy

स्विफ्टुकलीही गोड आहे>>>>>:फिदी:

धन्स, अके Happy

Pages