Submitted by निंबुडा on 5 June, 2012 - 06:28
तू येतोस ते जाण्यासाठीच हे माहीत असूनही
दर वेळी तितक्याच आतुरतेने
तुझी वाट पहायची!
आलास की आपल्या अस्तित्वाचा दरवळ
उमटवत राहतोस
मनभर....आसमंतभर..........
तुझा तो उधाणलेला मोहर
मग भिनतो माझ्याही नसानसांत
आणि मी झेलत राहते त्याचा बहर
मनसोक्त....
आणि जाताना तू ठेवून जातोस खुणा
अमीट तृप्तीच्या
अपूर्व समाधानाच्या..
.
.
.
आताही तू जाण्याची वेळ जवळ येत चालली
म्हणून जीव कासावीस...
तुला मात्र परतीचे लागलेले वेध
आणि माझं मन उदास!
.
.
.
नेहेमीच तर असं होतं
तरीही दर वेळी तुझ्या येण्याची
तितक्याच आतुरतेने वाट पाहण्याचं कारण काय माहितीये?
.
हसत निरोप देतानाचं तुझं एकच वाक्य-
"सब्र का फल मीठा होता है..!" 

प्लीज! जाऊ नकोस नं!
--दीवानी-ए-आम
(प्रचि आंतरजालावरून साभार!)
गुलमोहर:
शेअर करा
आम्ब्याच्या अशा फोडी करायला
आम्ब्याच्या अशा फोडी करायला यंत्र कोणतं वापरलयं ?
कै.आंबा (२०१२) धन्य झाला.
कै.आंबा (२०१२) धन्य झाला. :p
कै.आंबा >> कै. नका हो म्हणू!
कै.आंबा >>

कै. नका हो म्हणू! हृदयाला घरं पडतात!
आम्ब्याच्या अशा फोडी करायला यंत्र कोणतं वापरलयं ?
>>
(प्रचि आंतरजालावरून साभार!) लिहिलंय ना मी!
मी काढलेला प्रचि नाही तो!
कै. म्हणजे कैरी.
कै. म्हणजे कैरी. :p
अहाहा, काय तो रसाळ फोटो. आणि
अहाहा, काय तो रसाळ फोटो.
आणि कविता तर कहर
कै. म्हणजे कैरी.
कै. म्हणजे कैरी. >>
अरारा!
अर्थाचा अनर्थ झाला की मग
खूप छान आहे कविता....
खूप छान आहे कविता....
महेश... असा आंबा कापायला
महेश...
असा आंबा कापायला यंत्र नाही, तंत्र लागत . ...
आंबा कापुन दोन भाग करायचे. प्रत्येक अर्ध्या भागाच्या गरावर धारधार सुरीने चौकटी कापायच्या पण सुरी अगदी खाली सालीपर्यंत पोचु द्यायची नाही. चेक्स कापुन झाल्या की अंतर्वक्र साल खालुन पुश करुन बहिर्वक्र करायची... की अश्या मस्त चौकोनी फोडी तय्यार
मग चमच्याने गट्टम किंवा सुरीने अलगत तळाला कापुन बशीत ठेवायच्या/फ्रुट सॅलड,आयस्क्रिम मधे घालायच्या.... 
लाजो एवढे सोपस्कार
लाजो एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... आगदी कोय पांढरी होईस्तोवर..... त्यातच खरं टेक्निक आहे राव
भुंग्या, तेच तर खरं सुख रे
भुंग्या, तेच तर खरं सुख रे
'पहिला' प्रेफरन्स तोच 
पण वर महेश ने विचारलं म्हणुन आपलं ज्ञान पाजळलं
फारच छान
फारच छान
ए लाजो मी करुन पाहिलं जमल
ए लाजो मी करुन पाहिलं
जमल नाही पण मला
तंत्रज्ञानाबद्दल धन्यवाद !
तंत्रज्ञानाबद्दल धन्यवाद !
एवढे सोपस्कार करण्यापेक्षा
एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... कोय पांढरी होईस्तोवर..... त्यातच खरं टेक्निक आहे राव
>>> प्रचंड अनुमोदन रे..
फारच सही.......खुप आवडली
फारच सही.......खुप आवडली
लाजो एवढे सोपस्कार
लाजो एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... आगदी कोय पांढरी होईस्तोवर..... >>>
अगदी अगदी. :आंब्याच्या नेक्स्ट सीझन ची वाट पाहणारी बाहुली:
४ वर्षांमागे ऊटी-कोडाईकॅनल ला
४ वर्षांमागे ऊटी-कोडाईकॅनल ला गेलो होतो मे महिन्यात. तिथे गाडीवर आंबे विकायला ठेवलेले असायचे ते अशा पद्धतीने कापून ठेवलेले पाहिले होते. पण टेक्निक काय कळले नव्हते. लाजो, तू स्वतः असे ट्राय केले आहेस का?
हो आमच्याकडे ऑक्टोबर मधे
हो
आमच्याकडे ऑक्टोबर मधे आंबे यायला लागतिल. आंबे आले की करुन फोटो टाकेन
पन आमच्याकडे हापुस नाही मिळत
तू स्वतः असे ट्राय केले आहेस
तू स्वतः असे ट्राय केले आहेस का? >> आमच्याकडे मुलाला असाच कापुन हवा असतो. मस्त दिसतो कापला की
हे बघ असे कापायचे
http://www.youtube.com/watch?v=lvLdPjpELyU
Mast bhannat..khup chan
Mast bhannat..khup chan
वर्षे, लिंक वरचा व्हीडीओ खूप
वर्षे, लिंक वरचा व्हीडीओ खूप मस्त आहे
मँगो स्लाईसर छान आहे. आपल्याकडे अॅपल कटर मिळतो त्या धर्तीवरचा!
परत एकदा त्याच फेज मधून जात
परत एकदा त्याच फेज मधून जात आहे.
ये फल कोई आम नहीं बल्की बहोत
ये फल कोई आम नहीं
बल्की बहोत खास है
मी माझी घरची आंब्याची अढी गेली कित्येक वर्षे मिस करतोय!
Pages