जाऊ नकोस नं!

Submitted by निंबुडा on 5 June, 2012 - 06:28

तू येतोस ते जाण्यासाठीच हे माहीत असूनही
दर वेळी तितक्याच आतुरतेने
तुझी वाट पहायची!

आलास की आपल्या अस्तित्वाचा दरवळ
उमटवत राहतोस
मनभर....आसमंतभर..........

तुझा तो उधाणलेला मोहर
मग भिनतो माझ्याही नसानसांत
आणि मी झेलत राहते त्याचा बहर
मनसोक्त....

आणि जाताना तू ठेवून जातोस खुणा
अमीट तृप्तीच्या
अपूर्व समाधानाच्या..
.
.
.
आताही तू जाण्याची वेळ जवळ येत चालली
म्हणून जीव कासावीस...
तुला मात्र परतीचे लागलेले वेध
आणि माझं मन उदास!
.
.
.
नेहेमीच तर असं होतं
तरीही दर वेळी तुझ्या येण्याची
तितक्याच आतुरतेने वाट पाहण्याचं कारण काय माहितीये?
.
हसत निरोप देतानाचं तुझं एकच वाक्य-
"सब्र का फल मीठा होता है..!" Proud

Alphonso Mango.jpg

प्लीज! जाऊ नकोस नं!

--दीवानी-ए-आम
(प्रचि आंतरजालावरून साभार!)

गुलमोहर: 

निंबे स$$$$$$$$ही आहे Lol

एक पावसाचेही चित्र टाक.. म्हण्जे एका पानात दोन कविता होतील Wink

ए वेडे, अजून पाऊस आलाच नाहीये तर 'जाऊ नकोस' चा राग कसा आळवू? पाऊस जायला निघेल तेव्हा त्याला निरोप द्यायला शेपरेट कविता पाडेन! आंब्याचा मान आंब्यालाच! Happy

पाऊस जायला निघेल तेव्हा त्याला निरोप द्यायला शेपरेट कविता पाडेन! >> नवि कशाला हिच चालेल की Proud
पण कविता मस्तचे Happy

अशा पद्धतीने फोटो टाकून जळवण्याचा आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा झायिर णिशेद Proud

कविता मात्र रसदार झालीय , त्याच्यासारखीच Wink

तो जाणार आहे माहितेय म्हणुन तर नको जाऊ म्हणण्यात असोशी आहे ना...
पण असा निरोप देणारं कोणी आहे कळलं तर पुढच्या वर्षी येइलच की लवकर Happy

आताही तू जाण्याची वेळ जवळ येत चालली
म्हणून जीव कासावीस...
तुला मात्र परतीचे लागलेले वेध
आणि माझं मन उदास!>>>>>> उदास न होता साखरेच्या पाकात त्याला बुडवून ठेव थोडे दिवस आणखी मनाला शांती ca002.gif

भुंगा +१ Lol
निंबे ते प्रचि अ फ ला तू न तुझ्या कवितेसारखेच!
ते प्रचि पाहता, अशी रसरश्शीत कविता न सुचली तर नवलच Wink

ही तर, आम्पोयम्म! Biggrin

आय हाय.......... सही Happy
तू म्हणजे ना............ !!
पण कल्पना एकदम खासच Happy

उदयन

पुरुष कधी ओळखणार... एका झुरणा-या बाईस.
ती आंब्यामुळे मोहरलीये आणि तु गळ्यात मारतोयेस स्लाईस ?? Proud

ती आंब्यामुळे मोहरलीये आणि तु गळ्यात मारतोयेस स्लाईस ?? >>>
धन्यवाद मित्रा, माझ्या भावना ओळखल्याबद्दल Happy

उदयन च्या प्रतिसादाला मी कधीच माफ करून टाकलं! Proud

निंबे शप्पथ सांगत्ये मलाही सुरूवातीला पावसाला उद्देशून लिहिलीयेस असं वाटलं Proud
नंतर माझी ट्यूब पेटली की पाऊस अजून आला नाही तर ही त्याला ''जाऊ नकोस'' असं कसं म्हणेल ब्वा Happy
आणि हो ते रसरशीत का खसखशीत आंब्याचं चित्र काय मला दिसंना ब्वा Proud

निंबादेवी _/\_ Happy
तो रसरशीत आंबा आणि त्यावर तुझी अशी गोडमिट्ट कविता.................. 'माझा' आ गया Happy

ती आंब्यामुळे मोहरलीये आणि तु गळ्यात मारतोयेस स्लाईस ?? >>> Lol

ए कसं सुचतं तुम्हाला.....
एकद्म गोडमिट्ट....;)
हे मी वाचेपर्यंत गेला ना पण हा....

Pages