जाऊ नकोस नं!

Submitted by निंबुडा on 5 June, 2012 - 06:28

तू येतोस ते जाण्यासाठीच हे माहीत असूनही
दर वेळी तितक्याच आतुरतेने
तुझी वाट पहायची!

आलास की आपल्या अस्तित्वाचा दरवळ
उमटवत राहतोस
मनभर....आसमंतभर..........

तुझा तो उधाणलेला मोहर
मग भिनतो माझ्याही नसानसांत
आणि मी झेलत राहते त्याचा बहर
मनसोक्त....

आणि जाताना तू ठेवून जातोस खुणा
अमीट तृप्तीच्या
अपूर्व समाधानाच्या..
.
.
.
आताही तू जाण्याची वेळ जवळ येत चालली
म्हणून जीव कासावीस...
तुला मात्र परतीचे लागलेले वेध
आणि माझं मन उदास!
.
.
.
नेहेमीच तर असं होतं
तरीही दर वेळी तुझ्या येण्याची
तितक्याच आतुरतेने वाट पाहण्याचं कारण काय माहितीये?
.
हसत निरोप देतानाचं तुझं एकच वाक्य-
"सब्र का फल मीठा होता है..!" Proud

Alphonso Mango.jpg

प्लीज! जाऊ नकोस नं!

--दीवानी-ए-आम
(प्रचि आंतरजालावरून साभार!)

गुलमोहर: 

कै.आंबा >> Sad
कै. नका हो म्हणू! हृदयाला घरं पडतात! Sad

आम्ब्याच्या अशा फोडी करायला यंत्र कोणतं वापरलयं ?
>>
(प्रचि आंतरजालावरून साभार!) लिहिलंय ना मी!
मी काढलेला प्रचि नाही तो!

महेश...

असा आंबा कापायला यंत्र नाही, तंत्र लागत . ...

आंबा कापुन दोन भाग करायचे. प्रत्येक अर्ध्या भागाच्या गरावर धारधार सुरीने चौकटी कापायच्या पण सुरी अगदी खाली सालीपर्यंत पोचु द्यायची नाही. चेक्स कापुन झाल्या की अंतर्वक्र साल खालुन पुश करुन बहिर्वक्र करायची... की अश्या मस्त चौकोनी फोडी तय्यार Happy मग चमच्याने गट्टम किंवा सुरीने अलगत तळाला कापुन बशीत ठेवायच्या/फ्रुट सॅलड,आयस्क्रिम मधे घालायच्या.... Happy

लाजो एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... आगदी कोय पांढरी होईस्तोवर..... त्यातच खरं टेक्निक आहे राव Wink

एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... कोय पांढरी होईस्तोवर..... त्यातच खरं टेक्निक आहे राव
>>> प्रचंड अनुमोदन रे.. Happy

लाजो एवढे सोपस्कार करण्यापेक्षा आंबा चोखून खाण्यातच मजा....... आगदी कोय पांढरी होईस्तोवर..... >>>
अगदी अगदी. :आंब्याच्या नेक्स्ट सीझन ची वाट पाहणारी बाहुली:

४ वर्षांमागे ऊटी-कोडाईकॅनल ला गेलो होतो मे महिन्यात. तिथे गाडीवर आंबे विकायला ठेवलेले असायचे ते अशा पद्धतीने कापून ठेवलेले पाहिले होते. पण टेक्निक काय कळले नव्हते. लाजो, तू स्वतः असे ट्राय केले आहेस का?

हो Happy

आमच्याकडे ऑक्टोबर मधे आंबे यायला लागतिल. आंबे आले की करुन फोटो टाकेन Happy

पन आमच्याकडे हापुस नाही मिळत Sad

Pages