लिप्ती कोळंबी

Submitted by अवल on 3 June, 2012 - 11:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोठी कोळंबी १/२ किलो
कांदे ३
लसूण १५ पाकळ्या
तिखट २ चमचे
हळद १/२ चमचा
मीठ चवी प्रमाणे
तेल २ चमचे
चिंचेचा कोळ (एका लिंबा एव्हढी चिंच पाण्यात भिजवून काढलेला घट्ट कोळ)

क्रमवार पाककृती: 

६-७ पाकळ्या लसून बाजूला ठेऊन बाकीचा लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्यावा.
कोळंबी निवडून स्वच्छ करून; फार मोठी असेल तर त्याचे ३-३ तुकडे करून त्याला हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावी.
कोशे असतील तर तेही स्वच्छ धुवून त्यालाही हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावे. ( कोशे म्हणजे कोळंबीचे तोंड. खवय्यांना त्याचा रस फार आवडतो. शाकाहारी लोकहो क्षमस्व ! )
कांदे बारीक चिरावेत.
चिंचेचा कोळ काढून ठेवावा.
कढईत तेल तापत ठेवावे. त्यात ६-७ पाकळ्या लसूण ठेचून टाकावा. लसूण काळा झाला ( हो काळा झाला कीच ) त्यात आधी कोशे टाकावेत. चांगले परतावे.
आता त्यात कोळंबी टाकावी छान परतावी. गॅस मोठाच ठेवावा.
कोळंबीला सुटलेला रस कोरडा झाला की त्यात चिरलेला कांदा टाकावा. आता चांगले परता.
आता त्यात चिंचेचा कोळ घालावा. परत थोडे परतावे.
1338734474464.jpg
मग त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की गॅस बारीक करून ५ मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. तयार आहे लिप्ती कोळंबी ! चला बसा जेवायला Happy
1338734492655.jpg

वाढणी/प्रमाण: 
चौघांना पुरावी.
अधिक टिपा: 

फुलक्या, किंवा भाताबरोबर मस्त लागते. यात फक्त लसूण अन चिंच असल्याने कोळंबीचा स्वतःचा स्वाद खुप छान लागतो.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक सीकेपी पदार्थ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

ओ ते राहिलच की लिहायचं Happy सॉरी. अगं हळद, तिखट, मीठाबरोबर वाटलेला लसूणही लावून ठेवायचा. करते वरती बदल. धन्यवाद Happy

कालवणात कोलंबी अलिप्त असते. कोलंबी आणि कालवणाचा रस्सा वेगवेगळा राहतो. त्याउलट या दाटसर रश्श्यात ती मिसळून जाते म्हणून लिप्ती. Happy (हा माझा शोध)

लिप्त शब्दही लिपटना = लपटणे यावरून आला असणार. माझ्या साबा बटाटे, मटार, टोमॅटोचा एक दाटसर रस्सा बनवतात त्याला लिपिटमा म्हणतात. Happy

स्लर्र्र्र्र्प्प..मामी शोध पटतोय..:);)

पुढ्च्या वेळी ही पद्धत करून पाहणार्‍ ... कोशे हा माझ्यासाठी नवीन शब्द...आणि त्याच्यामुळे कालवणाला मस्त चव येते ते बाकी एकदम खरय....

मागच्या आठवड्यात दाखवलेल्या ज्युनियर मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या एका भागात या कोशांपासून आणि इतर कवचापासून प्रॉन ऑईल करण्यात आलं. http://www.masterchef.com.au/recipes/prawn-tortellini-with-sauteed-marro...

दिनेशदा, नाही हं हा आमचा सीकेपी पारंपारीक शब्द Wink
मामी छान स्पष्टीकरण Happy
लोला, अरे वा मस्त. मला बोलवशील ना जेवायला ? Happy

वॉव.. तोंपासु..
मामी.. थांकु गा.. लिप्ती, आलिप्त्,लिपटी... Happy

लोलाची लिप्ती पण मस्त..
प्लीज नोट.. दिनेश दा नी नेहमीचा परश्न इथे उपस्थित केला नाहीये.. कोळंबी च्या ऐवजी काय वापरायचं???

छळ मांडला...मांडला....मांडला...........छ अ अ अ ळ.... मां....ड....ला.

अवल, आम्ही याला भुजणं म्हणतो. यात आम्ही आले +लसुण वाटण,कोथींबीर चिरलेली आणि चिंचेऐवजी कोकम असते. किंवा कधीतरी टोमॅटो घालतो. अहाहा.. कोशे खाताना मधे गाभोळी मिळाल्यावर तर बघायलाच नको. आणि कोशे चोखतानाचा तो रस.... आठवण काढुन तोंपासु!!!!!!!!